तुमच्या व्यवसायातील मोठ्ठ्या प्रॉब्लेनवर सोल्युशन देणारा लेख

#product_parity

मार्केटमध्ये नेहमीच एकसारख्या दिसणाऱ्या किंवा ज्याला आपण डुप्लीकेट म्हणतो, अशा उत्पादनांची रेलचेल राहिलेली आहे.
उत्पादन विकत घ्यावं ते ओरिजनलच नाहीतर घेऊच नये असं सांगणारे देखील बहुत भेटायचे पण आजकाल प्रॉब्लेम वेगळाच झालाय.

डुप्लीकेट तर म्हणता येणार नाही, परंतु सेम टू सेम फिचर आणि बेनिफिट असणारे प्रॉडक्ट आलेत आणि सेल ढासळण्याचे हेच मुख्य कारण आहे.

तुमच्या व्यवसायात तुम्हाला याची अडचण कधी जाणवलीये का ? जर तुमचं उत्तर हो असेल ? तर हे या प्रॉडक्ट पॅरिटीच्या प्रॉबलेमला दुर करणारं हे आर्टिकल खास तुमच्यासाठी

📌 lack of perfect marketing messages. :

वऱ्याचदा असं दिसून येतं कि, मार्केटिंग करायची म्हणजे ? काहीतरी लिहा ! किंवा जे इतर जण लिहीताय त्याच्यातलेच काही पॉईंट उचला अन् पाठवा मार्केटला ! झाली आपली मार्केटिंग असा अनेकांचा अप्रोच असतो.

मार्केटिंग काही फुकट होणारी गोष्ट नाहीये अन् टाईमपास म्हणुन पण करायची गोष्ट नाहीये, परत इथूनच आपल्याकडे प्रॉस्पेक्ट विचारणा करायला येणारंय .

तेंव्हा हा प्रत्येक मॅसेज परफेक्ट असायला हवाय, इतरांवर विजय मिळवाचाय तर आपला प्रत्येक मार्केटिंग मॅसेज कशा प्रकारे चांगला आणि परफेक्ट जाईल ? याची काळजी घ्यावी लागेल.

📌lack of differentiation :
असं म्हणल जातं कि, “सेम सेम एंडस द गेम”
तुम्ही मार्केटमध्ये आहात आणि अजुन कोणाला तरी तुमच्याच क्षेत्रात उतरायचय तर तो व्यक्ती सगळ्यात सोप्पा मार्ग निवडेल .
तो सर्वात आधी तुमच्या पद्धती, प्रॉडक्ट आणि ऑफरला कॉपी करायला जाईल पण आपण आपल्या मार्केटिंग मध्ये सततपणे Differntition करत असाल ? म्हणजे ” आपले वेगळेपण ” जगासमोर दाखवत असाल ? तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सतावणार नाहीच .

📌 blunt focus on marketing.. : शार्प फोकस नसणे हा अनेकांचा प्रॉब्लेम आहे आणि मार्केटिंग सारख्या पैसे कमवून देणाऱ्या गोष्टिमध्ये जर शार्प फोकस नसला तर समजुन घ्या आपलं काम तमाम होणार .
त्यामुळे उगाचच बोथट फोकस ठेऊ नका यामुळे प्रॉडक्ट पॅरिटीला बळ मिळतंय .

📌 No clear definited ICP :
आपला आदर्श ग्राहक कोण आहे ? हेच जर माहित नसेल ? तर कोणाच्या समोर जाऊन नाचुन दाखवणार आहात तुम्ही ?
अनेक व्यावसायिक उगाचच करायची म्हणून करायची या स्टाइलने मार्केटिंग करायला जातात आणि मग रिस्पॉन्स आला नाही कि मग गार पडतात.

इथे पैस वेळ आणि एनर्जी सगळंच वेस्ट होतं असं होऊ नये म्हणून ICP ( ideal customer profile) नीट निटकी डिफाईन करा अन् मगच खर्चापाणी करा.

📌 Old fashioned mindset :

“मी म्हणजे हुशार ! माझ्या सारखी क्वालिटी आणि सर्विस कुणीच देऊ शकत नाही.” हा असला जुनाट माइंडसेट असेल ? तर तो लगेच बदला .

कारण ? आजची दुनिया फास्ट आहे. तुमच्या कडून तो नं . 1 चा मुकुट कधी हिरावून घेतील ते कळणार पण नाही
सो निवांतपणाचा Old fashioned mindset तात्काळ बदला.
c
📌 Untrained Sales staff. :
कोणत्याही व्यवसायात मालक किंवा MD हा सगळ्या प्रॉस्पेक्ट शी बोलून त्यांना ग्राहक बनवू शकत नाही ,
त्याला सेल्स स्टाफचा आधार घ्यावांच लागतो अन् इथे बऱ्याचदा गडबड होते .
मिळत नाही म्हणुन अन प्रोफेशनल स्टाफ भरला जातो, त्यांना ट्रेनिंग देण्याच्या नावाने बोंब असते अन् मग अनेकजण फक्त स्टाफची अदलाबदली करत बसतात अन् याचा फायदा स्पर्धकाला होतो .

त्यापेक्षा स्टाफला ट्रेन करून , differentiation करायला शिकवा म्हणजे? ते आपल्या साठी सेल आणतील.

product parity संदर्भातील हे चॅलेंजेस दुर करा म्हणजे ? तुम्हाला चांगला सेल मिळेल.

© निलेश काळे .
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
5th floor, विघ्नहर चेंबर्स,
नळस्टॉप, अभिनव चौक, पुणे.
9518950764.

Office; 9146101663.

Previous Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *