तुमच्या व्यवसायात विक्रीला ब्रेक लागलाय का ?

29 Views

व्यवसायात अचानक विक्रीला ब्रेक का लागतो?

📌 काल एका विद्यार्थ्याचा फोन आला.

” सर आमचा व्यवसाय 35 वर्ष जुना आहे,अगदी गरिबीतून मेहनत करुनमोठा करत करत आणलेला,पण आज 35 वर्षानंतर अशी एक स्टेज आली आहे की विक्रीत वाढ होत नाहीये , ग्राहक कमी झालेत, स्पर्धक त्रास देतात आणि वडील चिडचिड करताहेत ,एकूणच व्यवसाय अशा एका स्टेजला पोहोचला आहे की जिथून काही नविन घडत नाहीये, प्रगती होतच नाहीये, मग अशावेळी काय करायला पाहिजे?

📌 हा प्रसंग मी नवीन व्यवसायासंदर्भात सांगत नाहीये, तर त्या व्यवसायाबद्दल सांगतोय जो चालू होऊन पाच /दहा/पंधरा वर्षे झाली आहेत,ज्यांना सुरुवातीच्या काळात चांगले यश भेटलय त्यांनी तो काळ एन्जॉय पण केलाय आणि आता तो व्यवसाय एका सपाट प्रदेशावर आलाय त्याला भूगोलाच्या भाषेमध्ये प्लेटो असं म्हटलं जातं ! वाढच होत नाहीये !

ही स्टेज आपण अनेकांची पाहिली असेल , या स्टेजला platue stage म्हणायचं , इथे अनेक व्यावसायिक हताश निराश हतबल होऊन जातात, काहीजण तर एवढे डिप्रेशन मध्ये जातात कि बघायचं कामच नाही ,
याचं कारण ??? गल्ल्यांमध्ये Xyz अमाऊंट येण्याची सवय असते, ग्राहकाने कसलीही कुरकुर न करता खरेदी करून निघून जाण्याची सवय लागलेली असते, ते यशाचं वारं इतकं डोक्यात गेलेलं असतंय कि ,कोणीही काहीही बोललं तर ते मनाला लागायला लागतं आणि याचा एकंदरीत परिणाम आपल्या खिशामध्ये येणाऱ्या पैशांवर होतो.

एकूणच काय तर दहावीच्या मेरिट लिस्टमध्ये आलेल्या पोराला, बारावी मध्ये 35% भेटल्यानंतर जसं वाटेल असा हा प्रकार आहे.

असं जर घडायला लागलं तर त्याच्यासंबंधी काय केलं पाहिजे? जेणेकरून ही परिस्थीती सुधारेल आणि परत एकदा या जुन्याच व्यवसायाला नवीन भरारी घेता येईल?

या प्रकरणावर अनेक मॅनेजमेंट गुरुंनी आपले मत मांडून ठेवलेले आहेत ,हा विषय मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो, या परिस्थितीची जाणीव अगोदरच करून दिल्या जाते, त्यामुळे व्यवसाय शिक्षण घेतलेला विदयार्थी यासाठी ट्रेन्ड असतो.

यातील काही ठळक मुद्दे इथे देत आहे, याचा वापर आपल्याला आपला व्यवसाय परत एकदा वरच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी होईल, तेव्हा हे वाचा ,यावर विचार करा आणि याच्यावर कृती करा.

1) #They_Do_not_spend_time_on_sale_and_marketing:

ज्या वेळेला आपल्याला यश मिळायला लागते , एका दुकानाचे चार दुकान होतात ,व्यवसायाचा ग्राहक बांधील होऊन जातो, प्रसिद्धी व्हायला लागते लोक कौतुक करायला लागतात !

अशावेळी प्रसिद्धीची डोक्यामध्ये हवा जायला लागते .

तो व्यवसायिक ॲडवटाईजींग आणि मार्केटिंग याच्यावरचा खर्च कमी करायला लागतो , मित्रांनो मार्केटिंग हा प्रकार व्यवसायाचा प्राण आहे आणि जोपर्यंत प्राण नाही तोपर्यंत ते शरीर जसं निर्जीव असतं ,या प्रकारे मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग विना व्यवसायाचं होऊन जातं

📌 गाडीच्या पेट्रोल टाकीमध्ये जर आपण पेट्रोल टाकलं नाही, तर गाडी चालू शकते का? तुम्ही म्हणाल धक्का मारून चालू शकते !

धक्का मारून चालू शकते, परंतु तिला ती स्पीड येईल का ? ….. नाही म्हणून जसं गाडीला पेट्रोल आवश्यक आहे, तसेच व्यवसायाची जाहिरात होणे आवश्यक आहे.

म्हणून तर बघा ना ते व्यवसायिक जे गेली शंभर दीडशे वर्ष व्यवसाय करता आहेत ते सुद्धा स्वतःची जाहिरात रात्रंदिवस टीव्हीवर चालवतात (पु.ना.गाडगीळ,वामन हरी पेठे वगैरे)
तेव्हा कुठे त्यांच्या दारामध्ये ग्राहकांची रांग लागायची शक्यता तयार होते नाहीतर ते व्यवसायसुद्धा कधीच थंड पडले असते.

📌बऱ्याचदा एका व्यवसायामध्ये दोन पिढ्यांचा विचारांचा वाद होतो आणि त्यामुळे व्यवसाय उतरणीला लागतो.

*********************”””””

2) #Doing_everything_by_CEO :

📌 पैसा येईना झाला कि , व्यवसाय मालक सर्वात अगोदर नौकर काढतात आणि एकटे काम करायला चालू करतात ! तेवढेच पैसे वाचतील हा विचार असतो त्या पाठीमागे !
पण असे एकटयानेच “मीच सगळे कामं करतो ”म्हणून बिल्कुल चालत नाही.

इथे पाय जास्तीचा खोलात जातो.

*********************************

3) #Not_having_perfect_product_fit :

📌 आम्ही अमुक-अमुक वस्तु सर्वोतम बनवतो,यामुळेच आमचं नाव आहे यासाठीच आम्ही प्रसिद्ध आहोत, असं एकटया हत्याराच्या जिवावर लढाईत पराक्रम करता येत नसतो,आपले उत्पादन जर समाजाच्या गरजेनुसार बदलले नाही, तर मार्केटच्या बाहेर फेकले जाण्याची शक्यता वाढते म्हणून,मार्केटमध्ये टिकून रहायचंय तर कायम बदल करत रहावं लागेल, आज समाजाला काय पाहिजेय? काय डिमांड आहे ?हे बघत रहा !

आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचा फायदा आज होत नसतोय,आपली लढाई आपल्यालाच लढायाचिये | त्यामुळे ही चुक करूच नये !

आता साधी गोष्ट लक्षात घ्या , ज्याप्रमाणे टेपरेकॉर्डर / रेडिओ काळाच्या पडद्याआड गेले, त्याप्रमाणे ही दुरुस्ती करणारी मंडळी सुद्धा बेरोजगार झालीत , हे लोक तेच दुरुस्त करतो म्हणून मार्केटला बसले असते पण त्यांच्याकडे एक जण तयार असता का? नाही ना ? म्हणुन आपल्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये फिट्ट बसेल असा बनवा !

*************************************

4) #CEO_is_thinking_incremental_growth :

📌 incremental वाढ म्हणजे नेमकं काय ???

समजा आपण या वर्षी 10 लाखाचा व्यवसाय केला पुढच्या वर्षी 12 लाखाचा व्यवसाय करूया/मग त्याच्यापुढे 15 लाखाचा असा विचार करणे आणि त्यानुसारच प्लानिंग आखणे याला incremental growth ची प्लानिंग म्हणतात,

साध्या शब्दात #लहान_विचार !

📌 आपला व्यवसाय दहापट कसा वाढेल ? यावर काम करायला चालु करा बरं! फक्त अशा पक्क्या विचारानेच,परिस्थिती वेगळ्याच प्रकारे बदलते , सगळी ताकद विचाराची आहे.

📌 पण आपल्याला वेगळा विचारच करायचा नाहीये? तर मग, आपल्यासाठी विचार करायला कोण ?

*********************************

5) #Lack_of_in_depth_commercial_thinking_and_planning :

📌 काम चालु आहे ना सध्या?
धकतंय ना ?
काही बिघडतंय का ?
पुढचं पुढे बघु या !
ही जी वेळ टाळून नेणारी आणि स्वतालाच आधार देणारी वाक्यच पुढे जाऊन जास्त त्रासदायक ठरतात !

एकदा वेळ गेली कि , मग पुन्हा त्याचा उपयोग नाही !

त्यामुळे वर वर नाही,तर खोलात जाऊन व्याव्हारिक विचार करायची सवय लावून घ्यावी, ही सवयच
आपल्याला बदलत्या वातावरणात टिकवुन ठेवणार आहे.

*********************************

6) #Having_mentor_ship:

📌 बिझनेस मधे शिक्षक/ कोच/ कन्सलटंट काय करायचाय?
किंवा कोणाला काय विचारायच? आपल्याला व्यवसायातलं सगळं कळतंय !

हा एक विचार सामान्यपणे कोणाच्याही डोक्यात येऊ शकतो !

पण बिझनेस कोचनां बिझनेसच्या वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव असतो,बिझनेसचे ट्रेंड कुठे चालले आहेत?कसे बदलत आहेत? याची त्यांना पूर्ण कल्पना असते.

त्यांच्या सल्ल्याने उद्योजकाचा वेळ ,पैसा, आणि श्रम सहजच वाचतात !

त्यामुळे कोणत्याही चांगल्या कोचचा सल्ला सतत घ्यावा ! तो सल्ला रोपाला दिलेल्या पाण्यासारखं काम करतो , हिरवं ठेवतो I

📌 वरिल सहा पॉईंटसचा वापर केल्यास आपला व्यवसाय मग तो कोणताही असो, कोमेजणार नाही !

शुभेच्छा
©निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
5th Floor, विघ्नहर चेंबर्स,नळस्टॉप ,पुणे .
9518950764.
Office: 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *