तुम्हाला यशस्वी व्यावसायिक व्हायचंय ना? मग ही मंडळी तुमच्या फ्रेंडलिस्ट मध्ये हवीतच

व्यवसाय करताय?पण तुम्हाला हे माहितेय कि, व्यवसाय हा अनेकांना सोबत घेऊन करायचा संसार असतोय.

म्हणुन असं म्हटलं जातं कि, व्यावसायिक छोटा असो कि मोठा,त्याच्या कॉन्टक्ट सर्कलमध्ये खालील प्रोफेशनल्स असायलाच हवेत.

ते असणे का गरजेचं आहे? कोण असतात असे प्रोफेशनल्स आणि त्याचा काय फायदा खाली वाचा !

📌 प्रॅक्टीसिंग वकिल:

कोणत्याही व्यावसायिकाला अनेक कायदेशीर बाबींचा सामना कधीही करावा लागू शकतो, कधी सप्लायर्स, तर कधी ग्राहक, कधी कामगार तर कधी स्पर्धक.

कोणीही तुम्हाला कायदेशीर अडचणीत आणु शकतात, तर मग अशावेळी कोण बाहेर काढू शकतो?तर चांगला वकिल मित्र.
त्यामुळे बाकी कोणीही असो किंवा नसो, एक चांगला वकिल मित्र असायलाच हवाय,आणि तो सुद्धा प्रॅक्टीसिंग वकिल पाहिजे.

📌 प्रॅक्टीसिंग कर सल्लागार :

व्यवसायिक आणि करदाता,या दोन्ही नाण्याच्या दोन बाजू आहेत.
रोज नवनवीन करप्रणाली येत आहेत, त्यामुळे एखादया व्यवसायिकाला कर प्रकरणा संदर्भात अपडेट रहाणं गरजेचं असतं.
त्यामुळे एखादा चांगला कर सल्लागार आपल्या फर्स्ट सर्कल मधे असायलाच हवाय.

📌 ग्राफिक डिजाइनर/ एजन्सी :

आजचा व्यवसाय हा जोरदार मार्केटिंगशिवाय चालुच शकत नाही,
आणि अशाप्रकारे मार्केटिंग करायची असेल?तर मार्केटिंग मटेरियल हवे असते,हे मटेरियल म्हणजे काय?तर डिजिटल इमेजेस किंवा प्रोफेशनल व्हिडिओ.

अगदी वेळेवर आणि योग्य क्वालिटीचे डिजिटल कन्टेन्ट हवे असेल?तर चांगली एजन्सी आपल्या inner friend contact मध्ये हवीच आहे .

📌 बिजनेस/सेल्स कोच :

आजही अनेक व्यवसायिकांना वाटतं कि,ते स्वतः आपल्या बिजनेसला पुढच्या स्टेजला नेऊ शकतात… पण हे बिलकुल खरं नाही,मनुष्य आपल्या स्वतःच्या चुका निट निटक्या बघण्यासाठी बनलेलाच नाहीये.
समाजामध्ये दिसणारे टॉप परफॉर्मर बघा! खेळाडू बघा ! किंवा नेते बघा ! प्रत्येकाला पुढे नेणारा एक चांगला कोच असतो.
कारण? जे बिझनेस कोचला दिसतं? ते प्रत्यक्ष व्यावासिकाला दिसूच शकत नाही .
म्हणून तर यशस्वी व्हायचं असेल? तर चांगला बिजनेस/सेल्स कोच हा गरजेचाच आहे .

📌 फिटनेस कोचः

तुम्ही हे बघितलंय का? चांगले यशस्वी व्यावसायीक आपल्या व्यवसायाबरोबरच आपल्या शरीराची पण तितकीच काळजी घेतात आणि घेतली पाहिजे !
म्हणुन तर व्यावसायिकांनी योगा असो कि योग्य जिम, योग्य ट्रेनर बरोबर केलीच पाहिजे.

📌 पर्सनॅलिटी डेवलपमेंट कोच :

एखादा व्यवसाय हा हार्ड स्कीलवर उभा राहतो,पण आज समाजात वावरताना,चांगली पर्सनॅलिटी आवश्यक आहे.

आता ही करण्याकरिता चांगले लाईफ कोच मदत करू शकतात.

त्यामुळे आपल्या मित्र यादीत ही मंडळी असलीच पाहिजे.

📌 पॉलिटिकल कनेक्टर :

आपल्या समाजात पौलिटिक्स हे खूप खोलवर रुजलेलं आहे?त्यात काही वाईट पण नाहीये,त्यामुळे आपण आपल्या एरियातील पॉलिटिकल लोकांशी संपर्कात असलंच पाहिजे.
जरी तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नको ! वाटत असेल !तरिही किमान अशी व्यक्ती आपल्या जवळची असली पाहिजे,जी आपल्याला वेळेवर कनेक्शन करून देईल.

📌 फॅमिली डॉक्टर :

ज्याप्रमाणे पर्सनल बिजनेसकोच ना आपल्या व्यवसायाचे बारकावे माहित असतात,ते आपल्याला योग्य सल्ला देतात,

तसंच एखादया व्यावसायिकाच्या मित्र यादीत पर्सनल डॉक्टर असलेच पाहिजेत, त्यांना आपल्या शारिरीक स्थितीची, ऍलर्जी वगैरे गोष्टींची माहिती असते,ते योग्य सल्ला देऊन आपल्याला ठणठणीत राखतील.

ही वरिल मंडळी आपल्या तब्येतीची, आर्थिक बाजुची,व्यवसायाची चांगली काळजी घेतात, त्यामुळे व्यवसाय हा कुठल्या अडथळ्याशिवाय प्रगती करत रहातो.

तेंव्हा आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये ही मंडळी असतील?तर त्यांना जपा.
नसतील?तर आवर्जुन ऍड करा.
तुमचा आणि तुमच्या व्यवसायाचा फायदाच होईल.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *