तुम्हाला स्वतःला डिप्रेशन मधून बाहेर काढायचंय ? तर हा लेख पूर्ण वाचा .

42 Views

Magic_of_Thinking_Big

लेखक_डेवीड_श्वाटर्झ

पुस्तके ही जर श्रद्धापूर्वक हातात धरून वाचली आणि अनुसरली तर या जगात कोणाचेही पाय धरण्याची गरज पडणार नाही ! असं म्हणलं जातं .

📌 मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हे सन 1965 साली प्रो.डेवीड श्वार्टझ यांनी लिहिलेलं अत्यंत प्रभावी सेल्फ हेल्प बुक आहे,सेल्फहेल्पचा अर्थ “स्वतःची मदत स्वतःच करणे ” .

📌 आजच्या युगात अनेक जणं स्वतःच्या मदतीसाठी दुसऱ्याकडे बघतोय , बघतोय हे कि,समोरचा खिशात हात घालून देतोय का काही ?

अरे जनावराला जखम झाली ना ? ते सुद्धा त्या जखमेला चाटून चाटून बरं करतं , त्याच्याकडे फक्त बघत रडत नाही किंवा कोणाची उद्धारकर्त्याची वाट बघत नाही !

📌 असो,ज्यांना स्वतःचा उद्धार स्वतः करायचा आहे अशांसाठी असतात ही चांगली पुस्तके .

डेवीड श्वाटर्झ यांनी या पुस्तकात 13 points सांगितले आहेत जे आपल्याला चांगला आणि स्वयंप्रकाशित माणूस बनायला मदत करू शकतात .

डेव्हिड या पुस्तकामध्ये म्हणतात आपण किती यशस्वी व्हायचंय? हे आपल्या लवकर यशस्वी होऊ ? आपण कोणाच्या घरी जन्म घेतला आहे? याच्यावर किंवा आपला मेंदू किती मोठा आहे? याच्यावर अवलंबून नसतं.

📕[1] #Believe_you_Can_Succeed_and_you_Will!

📌 मी किती यशस्वी होणार आहे? याचे उत्तर मला माझ्याकडून मिळणारेय .पण ते कसं मिळेल?

या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांकडे त्याच व्यक्तीला मिळतं ज्या माणसाला स्वतःवर प्रचंड विश्वास आहे.

जो स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करतो ,की मी ही नक्की करू शकतो !

प्रॉब्लेम काय माहितेय का आम्हाला स्वतःवर विश्वास नाहीये आपल्याला स्वतःलाच वाटत नाही की मी करोडपती बनू शकतो.

जर एखादी गोष्ट आपल्या स्वतःलाच वाटत नाही की मी करू शकतो तर काय जादू होणार आहे का ?

लेखक सांगतात स्वतःवर पक्का विश्वास पाहिजे ,की मी हे नक्की करू शकतो !

आपला प्रॉब्लेम कुठे होतो आहे की आपल्या मनामध्ये कुठेतरी छोटासा का होईना डाउट राहतोय आणि तो छोटासा डाऊट आपल्याला यश मिळू देत नाही.

📘 #CURE_Yourself_Of_Excusites

📌 यशस्वी होणारे व्यक्तीमध्ये आणि अपयशी होणाऱ्या व्यक्तींमध्ये एक फार मोठा आणि ठळक दिसून येणारा फरक असतो तू म्हणजे “बहाने” बनवायचा .

डेव्हिड सांगतात खरं काय तर हा एक मानसिक रोग आहे !

आपण कधीही एखाद्या निराशावादी व्यक्तीला विचारा हे तुला का बर हे जमलं नाही?

तर त्याच्याकडे एक फार मोठी लिस्ट तयार असते की या या गोष्टी होत्या म्हणून मला हे करायला जमलं नाही, सध्या का जमू शकत नाही आणि पुढे पण का जमू शकणार नाही ? अरेरे !
छी sss !

📌जोपर्यंत आपण ही लिस्ट काढून टाकत नाही जोपर्यंत आपण दुनियाला दाखवायला कारण देत बसू !

एक लॉ आहे ज्याचं नाव आहे ,, “Cause and Effect Law ‘…. हा नियम दोघiनाही लागू पडतो , यशस्वी आणि अपयशी माणसांना

आपली कर्म जशी असतील तशी फळं मिळणारंच हे तर आपल्या ग्रंथांनी पण सांगितलंय ना ?

📌डेवीड लिहितात,जसं बाळाचे पायं पाळण्यात दिसतात,तसे उद्या ज्यांना यशस्वी व्हायचंय ते अगोदर यशस्वी झालेल्या लोकांच्या कामाला कॉपी करतात,त्यांचा हात धरून चलतात आणि ज्याला जिंदगीत काही करायचंच नाही ती लोकं फक्त काड्या करतात बाकी काही ते करूच शकत नाहीत .

📕 #Dont_Sell_yourself_short:

काही लोकांमध्ये आत्मसम्मानाची कमतरताच असते,ते स्वतःला एका लेवलच्या पुढे मानीतच नाहीत् .

पण तेच दुसरीकडे काही लोक असे असतात कि ते कधी डिप्रेस होतच नाहीत,काहीही असो ते कशातूनही रस्ता काढतील म्हणजे काढतील , विचार असा करायला पाहिजे .

📘#Use_big_bright_positive_words :

शब्दाचं फार जास्त महत्व आहे ,
“ध चा मा” केल्याने इतिहास बदलला,तसं स्वतःशी आणि दुसऱ्याशी पण बोलताना पौजिटीव, उत्साहवर्धक शब्द वापरायला पाहिजेत .

ही गोष्ट वाटते छोटी पण तशी नाहीये .

समजा आपण दोघाला विचारलं …. “काय चाललयं “? त्यावर एक जण म्हणतो फक्त . “बरंय” म्हणतो आणि दुसरा म्हणतो … “मस्त आहे..नंबर एक ” …

आपल्याला कोणाला जास्त बोलावं वाटेल ? साहजिक आहे जो उत्साही आहे त्यालाच , मेलेल्या मुडदयाला कोण बोलतंय ?

📕#Look_important_it_helps_you_think_important:

एका चांगल्या उद्योजकाचे बाहयरूप सुद्धा खूप काही सांगून जातं ,म्हणून चांगल्या उद्योजकांनी नीट आणि क्लीन शेव करुन राहाव ,जेणेकरून एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो.

आपले चांगले कपडे ,चांगली पर्सनैलिटी आपल्याबद्दल खूप काही सांगून जात असते,साधी गोष्ट लक्षात घ्या,छपरी पोरासारखी कपडे घातलेल्या,पांढरी,पिवळी हेअर स्टाईल केलेल्या व्यक्ती बरोबर आपण सिरीयस चर्चा करून का?नाही ना !

एकंदरीतच जेव्हा समोरच्याची आपली ओळख नसते तेव्हा तो आपली पारख आपले बाह्यरूप ,आपली बॉडी लँग्वेज, आपली सर्व स्टाईल स्टेटमेंट यावरूनच करत असतो त्यामुळे ची गोष्ट महत्त्वाचीच आहे.

📘#Build_a_Sell_On_Yourself :

📌खूप लोकांची वाईट सवय असते की ती स्वतःलाच “खाली_वर” बोलत असतात,स्वतःची स्तुती करणे तर सोडाच ,स्वतःला होईल तेवढं कोसत असतात.

ही बाब जरी छोटीशी वाटली तरी याचा परिणाम फार मोठा आहे. आपण स्वतः , स्वतःला वाईट म्हणाल ,तर आपल्याला चांगला मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो

म्हणून डेविड म्हणतात की, “आपण आपल्या स्वतःची इज्जत करायला शिकले पाहिजे”,आपण स्वतःदेखील काही महत्त्वाचे आहोत, अशी जाणीव स्वतःला करून दिली पाहिजे.

याचा अर्थ “गर्व करणे” असा नसून, स्वतःचा स्वाभिमान जागृत करणे असा आहे,आपण लक्षात घेतले पाहिजे की आपण जे स्वतःला बोलू ते होत असतात,स्वतःच्या बद्दल स्वतः विचार करणे,याचा सुद्धा आपल्या मनावर परिणाम होत असतो म्हणून नेहमी स्वतःबद्दल पॉझिटिव बोला स्वतःबद्दल चांगलाच विचार करा हे अतिशय आवश्यक आहे

📔#Ask_Yourself_is_this_the_Way_Successful_people_think_to_upgrade :

जगात यशस्वी अशा लोकांनी खूप काही चांगलं यश संपादन केलेय ,त्या लोकांची विचार करण्याची एक विशेष पद्धत असते .

ते लोक कधीही रस्ता सोडून चुकीचा विचार करत नाहीत, त्या लोकांची वैचारीक बैठक फार पक्की असते,

आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं आत्मचरित्र वाचत असतो त्याचवेळी त्यांचे विचार आपल्याला लक्षात येतात आणि अशा विचारांना आपण कॉपी केलं पाहिजे जी गोष्ट चांगली आहे त्याला कॉपी करण्यात काय वाईटय?

📕#Make_Your_Enviornment_Work_for_You
आपल्या आजूबाजूची लोकं कशी आहेत ?

आपण कोणाबरोबर बसतो उठतो?

आपण कोणाबरोबर फोनवर बोलतो?

आपण कोणाचे लेख वाचतो?

आपण कोणाचे व्हिडिओ बघतो

या सगळ्या गोष्टींचा आपल्या वर परिणाम होतो , एकंदरीतच आपण कोणत्या लोकांची संगत करतो? कोणते टीव्ही शो बघतो , कोणते चॅनेल बघतो ? सगळ्या गोष्टींचा आपल्या यशावर फार मोठा परिणाम होतो !म्हणून तर जुनी लोक म्हणायचे नेहमी चांगल्या संस्कारी लोकांवर उठबस असायला पाहिजे.

या पुस्तकामध्ये लेखक हेच सांगतो की आपली स्वतःची “कंपनी” ही आपल्याला नेहमी उत्कर्षाकडे नेणारी असावी ,आपल्याला निराशेच्या गर्तेत ढकलणारी नसावी ,

एकदा चेक करा आपल्या सभोवतालची माणसं कशी आहेत? जर चांगले असतील तर त्यांची संगत कायम ठेवा आणि जर आपल्या लक्षात असेलच की ही लोकं निराशावादी आहेत तर यांची संगत लगेच सोडा !

📕#Blend_Persistance_with_Experimentation :

एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, आपल्याला जमत नाहीये मग आपण वारंवार ती गोष्ट करत जातो , पण तरिही यश काही येत नाही .

मग वाटतं सोडून दयावं,ही नॉर्मल बाब आहे कारण ते सोप्पं आहे , पण न थकता सातत्याने प्रयत्न करणे याला Persistance म्हणतात , थॉमस एडिसनचं उदाहरण आपल्या सगळ्याला माहितच आहे ,

पण इथे एक कॅच आहे,सारखं सारखं सेम तसाच प्रयत्न करून काही होईल का ? नाही ना ! लेखक म्हणतात आपण दरवेळी वेगळे प्रयोग केले पाहिजेत , त्यामुळे वेगळे रिजल्ट येतील ना ?

आणि यश मिळवायला हेच पाहिजे .

📘#Use_goals_to_help_you :

ही गोष्ट महत्त्वाची आहे .
कित्येक लोकांना हेच माहीत नसतं की त्यांना नेमकं काय मिळवायचे आहे? त्यांना जे पाहिजे आहे ते कसं असेल हेच माहित नसुन कसं जमेल ?

म्हणजे हे असं झालं कि ,गावाला तर जायचंय रस्त्यावर तर गाडी काढलीय पण नेमक्या कोणत्या गावाला जायचं? हेच माहीत नाही !

हे असं जमेल का ? म्हणून सगळ्यात अगोदर आपली ध्येय निश्चिती केली पाहिजे आपले ध्येय हे अतिशय स्पष्ट आपल्या डोळ्यासमोर असायला हवं,

तेव्हाच “ओम शांती ओम” मध्ये शाहरूख खान म्हणतो तसे,”सारी कायनात हमे ऊससे मिलाने कि कोशीश करती है !

📕#Learn_to_think_like_a_Leader :

आपण बघितले का एखाद्या दुकानदार ज्याप्रमाणे आपल्या ग्राहकाला बोलत असतो त्याचे नोकर देखील त्याच टोनमध्ये ग्राहकांना बोलतात, पक्षाचा नेता जसे लोकांना वागवतो तसेच कार्यकर्ते वागतात !

याचा आपल्याशी काय संबंध आहे? असे विचाराल,पण आपण आपल्या व्यवसायामध्ये लिडर असतो आणि इथे आपण पक्के लीडर बनले पाहिजे जेणेकरून काही दिवसानंतर आपले कर्मचारी आपले सहकारी आपली कार्बन कॉपी करतील आणि सगळाच्या सगळा व्यवसाय एकाच मार्गाने ग्राहक सेवा देऊ,नाहीतर काय होतं कि आपली इच्छा असते एक़ आणि आपली माणसे वागतात भलतच !

त्यामुळे आपले विचार हे पॉजिटीव पाहिजेत ! एका दणकट नेत्या सारखे !कारण ही संसर्गजन्य गोष्ट आहे,कोरोनासारखी !

📌 या पुस्तकात् डेवीड श्वाटर्स म्हणतात,ध्येये मोठी ठेवा , सातत्याबरोबर वेगवेगळे प्रयोग करा , स्वतःवर सगळयात जास्त विश्वास ठेवा,स्वत:ला मान दया, म्हणजे आयुष्य सुंदर होईल .

तेंव्हा हे पुस्तक मिळवा,वाचा,यावर विचार करा,तसंच वागा म्हणजे यश दुर रहाणार नाही .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क, औंध , पुणे
9518950764

Office: 9145 101 663

Previous Post Next Post

One thought on “तुम्हाला स्वतःला डिप्रेशन मधून बाहेर काढायचंय ? तर हा लेख पूर्ण वाचा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *