तुम्हीही वापरू शकता, McDonaldsने वापरलेली मार्केटिंगची सुपर आयडिया !

#Geniusmarketing

मोठे व्यवसाय उगाचच त्या लेवलला पोहचलेले नसतात,त्यांच्या प्रत्येक कृतीतुन समाजाला काही ना काही प्रत्यय येतंच असतो.

हे व्यवसाय स्वतःच्या मार्केटिंगवर शेकडो कोटी रुपये खर्च करतच असतात,कारण? या खर्चाला ते खर्च मानतच नाहीत,तर Investment मानतात.

चांगला प्रिमियम स्पॉट हा जास्त लोकांच्या समोर ब्रॅन्डचा अवेअरनेस करण्यासाठी आवश्यक असतो, म्हणुन तर या स्पॉटसाठी नेहमी मारामार असते.

पण, अतिशय प्रिमियम स्पॉट कमीत कमी पैशात/ कमी मेहनतीत मिळाला,आणि तो कोणी हटवू असंच एक उदाहरण सादर केलंय जगप्रसिद्ध फास्ट फुड जायंट,मॅकडोनाल्डसने.

📌 “McDonalds च्या मार्केटिंग टिम ने,अशा काही फुलझाडांचे बीज मिळवले,ज्या झाडांचे फुले ही, पिवळी होती,आणि कॅलिफोर्निया स्टेट मध्ये,या झाडाची तोडणी करण्यावर बंदी होती.

तर झालं, McDonalds साठी काम करणाऱ्या,ऍड एजन्सीने, कॅलीफोर्निया स्टेट हायवे शेजारील डोंगरावर या बिजांची पेरणी McDonalds च्या प्रसिद्ध M या लोगोच्या आकारात केली.

इतर मार्केटिंग कॅम्पेनप्रमाणे याचा परिणाम लगेच दिसला नाही,परंतु जसजसं ती झाडे मोठी होऊ लागली, त्याला पिवळी फुले येऊ लागली, तसतसा तो लोगो ठळकपणे दिसू लागला.

ही परिस्थिती McDonald’s साठी परफेक्ट होती, स्वस्तात काम झाले आणि या झाडांना कायदेशीर सरंक्षण असल्याने ती कोणी कापू शकलं नाही, यातू निसर्गाची देखभाल सुद्धा केली गेली Social Responsibility चं काम केलं म्हणून या कामाप्रती स्तुती देखील झाली.

आता ही Enviornmental Grafiti मोठया प्रमाणात मार्केटिंग करणार आहे, तुम्ही देखील असाच सेम प्रकार वापरू शकताच की.

आहे की नाही भन्नाट आयडिया? अशाच प्रकारे योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे मार्केटिंगची आयडिया लावली की, यश मिळतच.

तेंव्हा ऍड करत रहा, पैसा येत राहील.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क, औंध, पुणे.
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *