दोनशे रूपये लिटरचं “काळं पाणी” विकणारं स्टार्टअप

*Black water काय असतंय माहितीये ?*

आपण वाचलं असेल,कि विराट कोहली 4000/lit चं पाणी पितो, एखादी नटी इतक्या रुपये लिटरचं पाणी पिते… अमकं तमकं वगैरे वगैरे.

आपल्याकडे आत्ता आत्ता कुठे ते कॅन्ड्लवाले फिल्टर जाऊन त्याच्या जागी घरोघर RO बसायला लागलेत, मग हे नवीनच खुळ काय आहे बरं?
शेवटी पाणी म्हणजे पाणीच असतंय ना?मग हे नवीन पाणी कुठून आलं?

बरं मग खरंच असतंय का इतकं महाग पाणी? आणि असलं तरी त्यात एवढं काय असतंय? कि,ते एवढं महाग असतं

दोनशे रुपये एका लिटरसाठी हे अफाट झालं ना?

हा एक नवीन फंडा आहे,ज्याला अल्कलाईन वाटर म्हणलं जातं.

गुजरात मधील वडोदरा येथील 30 वर्षीय रियल इस्टेट व्यावसायिक Aakash Vaaghela यांनी 2019 मध्ये AV organics नावाने कंपनी सुरू केली,आज ही कंपनी 1000 आऊटलेटसच्या माध्यमातून आपलं हे काळं पाणी विकते तेही तब्बल 200 रु लिटर, आणि मोठे मोठे सेलिब्रिटी याच्या बाटल्या विकत घेऊन गटागटा पितात सुद्धा.

आपण जे साधारण पाणी पितो,जे टॅप वॉटर म्हणतो,त्याचा pH साधारणपणे 7 असतो,या ब्लॅक वॉटरचा pH हा 8 च्या वर म्हणजे ? साधारण 9 पर्यंत असतो आणि याचा रंग देखील काळा असतो .

,कारण?त्यामध्ये 70 मिनरल्स ऍड केलेले आहेत,असं AV organics या कंपनीचं म्हणणं आहे.

या मिनरल्समुळेच या पाण्याचा रंग काळा होतो.

या कंपनीचं असं म्हणणं आहे कि, या पाण्याच्या वापरामुळे बॉडीचं detoxification चांगल्या प्रकारे होतं, त्यामुळे जी लोकं फिटनेस बाबतीत जास्त जागृत आहेत आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्याकरिता हा प्रॉडक्ट आहे.

AV organics च्या म्हणण्यानुसार मुख्य म्हणजे यामध्ये Anti Aging तत्वं असतात ( पण अजून हे कोणी सिद्ध केलेलं नाही )

पण त्या प्रकारे हाईप तर तयार झालेली आहे, किंवा असं म्हणा कि मुद्दाम हुन तयार केलेली आहे.

हे पाणी अर्ध्या लिटर च्या बॉटल मध्ये ऍमेजॉन आणि फलीपकार्ट वर सुद्धा उपलब्ध आहे.

Lifestyle marketing : आता विषय येतो,तो असा कि, लोक असे प्रॉडक्ट का बरं विकत घेतात?इतक्या महागाचे प्रॉडक्ट का बरं विकत घेतात? आणि मोठेपणाने मिरवतात,तर या साठी लाईफस्टाईल मार्केटिंग जिम्मेदार आहे.

लाईफस्टाईल मार्केटिंग अशी मार्केटिंग आहे, ज्यात तुम्ही तो प्रॉडक्ट वापरल्यामुळे मोठेपणा मिळवू शकता, त्यामुळे तुमचे स्टेटस वाढेल,असे पढवले जाते,त्यामुळे किंमतीचा विचारच होत नाही, आणि असे प्रॉडक्ट चालतात,चालतातच नाही तर पळतात.

तुमचा प्रॉडक्ट जर लाईफस्टाईल प्रॉडक्ट असेल ?तर मार्केटिंग पण तशीच करा, म्हणजे ? लोक देतात पैसे भरपूर पैसे.

लेख आवडला तर नक्की शेअर करा.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *