दोन जगप्रसिद्ध मार्केटिंग कॅम्पेन,ज्यांनी इतिहास घडवला.

अशा दोन मार्केटिंग कॅम्पेन ज्यांनी इतिहास घडवला.

Think different

कधी कधी मार्केटमधे परिस्थिती अशी बनते की,आपल्याला आपलं स्थान कायम करायचं असतं,आपली इज्जत पणाला लागलेली असते किंवा आपलं अस्तित्व पणाला लागलेलं असतं असं म्हणा,

त्या वेळेला आपण जाहिरातीवर जोर देतो बघा.

ज्या वेळेला आपण एखादी डिजिटल जाहिरात करतो,त्यावेळेला पण काही शब्द /काही चित्र /याचा वापर करून आपला मार्केटिंग मेसेज सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

परंतु ति,जी इमेज बनवलेली आहे, या सारख्या अनेक इमेजेस बनवून एक पॅटर्न कायम राखून,ज्यावेळेला आपण अनेक ठिकाणी अनेक प्रकारे अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये त्याच मेसेजला घेऊन वेगवेगळ्या जाहिराती करतो.

त्यावेळेला या प्रक्रियेला मार्केटिंग कॅम्पेन असं म्हटलं जातं.

जगातलं सगळ्यात सक्सेसफुल मार्केटिंग कॅम्पेन हे सन 1997 ते 2002 या काळात केले गेले.

आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, आज Apple ही सर्वात व्हॅल्युएबल अशी कंपनी आहे,परंतु एका असा एक काळ होता की ,या कंपनीने स्टीव जॉबला बाहेर केलं होतं आणि मग कंपनीची मार्केटमधील व्हॅल्यू ढासळायला लागली होती, परंतु ज्या वेळेला स्टीव्ह जॉब्स 1997 मध्ये परत आले, त्यावेळेला त्यांनी कंपनीला पुनर्जीवित करण्यासाठी हे कॅम्पेन आखलं,ज्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट बॅकग्राऊंड ,वर जगातील वेगवेगळ्या नामवंत व्यक्तींचे फोटो ठाकून फक्त THINK different हे शब्द आणि एप्पल चा लोगो*एवढीच माहिती दिली गेली.

आणि याचा परिणाम असा झाला की, Apple तिथून जे सुसाट सुटली ते आज आपल्याला तिची आर्थिक परिस्थिती काय आहे? ते माहित आहे,

ज्यावेळी जॉब्स वापस आले होते, त्या वेळेला त्यांनी जे आपले इंजिनियर साठी आणि आपल्या कर्मचाऱ्यांसाठी भाषण दिलं, त्या भाषणांमध्ये त्यांनी NIKE की या सुप्रसिद्ध ब्रँडला आपला आदर्श मानत, तिच्या पावलावर पाऊल ठेवत मार्केटिंग कॅम्पेन आखण्याचा निश्चय केला ,आणि ते त्यामध्ये यशस्वी झाले.

NIKE हा ब्रँड कशाप्रकारे आपल्या स्पर्धकांना तोंड ,स्वतःचं नाणं खणखणीत आहे?हे जगाला सांगतो याचं उदाहरण म्हणजे आपण वर बघत असलेला व्हिडीओ.

हि स्टोरी आहे 2012 झालेल्या लंडन ऑलिम्पिकची.

ऑलम्पिक कमिटीने आपल्या टायटल्स Sponsorship साठी जाहिरात दिली, त्यावेळेला वेगवेगळ्या कंपन्या टायटल स्पॉन्सर करण्यासाठी सामील झाल्या,परंतु शेवटी विजय झाला तो Adidas चा.

आता लंडन ओलंपिक 2012 साठी Adidas ही कंपनी ऑफिशियल टायटल स्पॉन्सर होती.

यावेळेला Adidas आणि ऑलिम्पिक कमिटी यांनी नियम इतके कठोर बनवले होते की दुसरी कोणतीही कंपनी कोणत्याही प्रकारे Olympic, Olympic logo, London UK, याचा वापर करून जाहिरात करू शकत नव्हती.

त्यामुळे इतर स्पर्धकांना बाहेर ठेवायची नामी शक्कल Adidas ने लढवली.

आता तुम्ही म्हणाल ,सर एखाद्या खेळाच्या इवेंटचे टायटल स्पॉन्सरशिप इतकी महत्त्वाची असते का ?तर हे समजून घ्या,2019 साली झालेल्या IPL मध्ये Vivo या कंपनीने BCCI ला,2200 रुपये इतकी फीस मोजली होती, फक्त IPL बरोबर Vivoचं नाव जोडण्यासाठी.

तर Nike समोर एक प्रश्न उभा राहिला होता, की “ऑलम्पिकचा वापर ते आपल्या ऍड कॅम्पमध्ये कसं करतील? आणि Nike एक अशी स्टेटर्जी घेऊन आलं, ज्यामुळे या ऑलम्पिकमध्ये Adidas पेक्षा Nike ची चर्चा जास्त झाली आणि तिला जास्त फायदा झाला.

तर ही कॅम्पेन अशाप्रकारे राबवली गेली

Nike या कंपनीने लंडन जे की इंग्लंडची राजधानी आहे ,याचं नाव तर वापरलं नाही, परंतु इतर लंडन जे पूर्ण जगभरात उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी जाऊन मुद्दामहून शूटिंग केलं.

मग ते नायजेरियातील लंडन असो आफ्रिकेतले लंडन असो किंवा लंडन रोड असो . लंडन रेस्टोरंट असो, लंडन पिझ्झा असो ,अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी जाहिरातीची शूटिंग केली.

दुसरी गोष्ट ऑलम्पिक कमिटीने कोणत्याही ओलंपियन खेळाडूला इतर कोणाची जाहिरात करण्यापासून प्रतिबंधित केले होतं म्हणून Nike ने अतिशय सामान्य खेळाडूंचा त्यातल्यात्यात रस्त्यावर खेळणाऱ्या खेळाडूंचा वापर या जाहिरातींमध्ये केला आणि असा मेसेज दिला की ग्रेटनेस हे कोणा एकाचं क्षेत्र नसून, ते सर्वांसाठी खुला असलं पाहिजे

Nike ने तिसरी गोष्ट अशी केली की, ऑलम्पिक मध्ये खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना त्यांनी स्वतःच्या ब्रँडचे बूट दिले .

आता हा एक लुपहोल, त्यांच्या एग्रीमेंट मध्ये होता आणि याठिकाणी Nike मुद्दामऊन असे शूज डिझाईन केले, त्यांचा कलर पिवळा ठेवला कारण ते बूट ऑलिम्पिकच्या ट्रॅकवर असणाऱ्या रंगाला विरोधी रंग असणारे होते.

अशाप्रकारे Nike ने एक जबरदस्त अशी स्टेटर्जी लावली/ मार्केटिंग प्लान केला आणि कोणत्याही कायद्याची चौकट न मोडता त्यांनी ॲड कॅम्पेन केली.

आता आपण ज्यावेळेला वरची जाहिरात बघाल, त्यामध्ये तुम्हाला कुठेही ऑलम्पिकचा लोगो वापरलेला दिसणार नाही, कुठेही लंडन ऑलिम्पिकच्या उल्लेख दिसणार नाही, परंतु तुम्हाला हे दिसेल, की Nike ने किती इम्प्रेसिवली ही जाहिरात केलेली आहे.

Apple कंपनीचे Think different कॅम्पेन असो की Nike ने 2012 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये Adidas च्या विरोधामध्ये उभे केलेले कॅम्पेन असो, ज्या कंपन्या वेगळा विचार करतात,वेगळं मार्केटिंग मेसेज देतात आणि स्वतः प्रमोशन हे मोठ्या प्रमाणावर करू शकतात, त्या मोठया होतात.

इतरांपेक्षा वेगळा विचार करणे, ही प्रक्रिया जर आपण लावली, आणि जाहिरात फक्त जाहिरात एवढं न ठेवता, त्याला आपला मार्केटिंग मेसेज पोहोचवायचं साधंन असं केलं ,तर आपल्याला यश मिळवण्यापासून कोणी अडवू शकत नाही.

फक्त त्यासाठी लागते थोडीशी कल्पकता आणि थोडंसं सचोटी.

तेंव्हा पैसे वाचवायचे म्हणुन मार्केटिंग करणे थांबवू नका, ते फार महागात पडतं.

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764.

Office 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *