पुढच्या 100 वर्षातही बंद पडणार नाहीत,अशा 9 इंडस्ट्रीज

1,343 Views

21 व्या शतकात खूप प्रगती साधतील अशा 10 इंडस्ट्रीज*

मित्रांनो,सध्या जग ज्या स्पीडने बदलत आहे,त्या काळात काय चालेल ? काय नाही ? याचा भ्रम होतोय.

दर तीन महिन्याला मोबाईलचे अपडेटेड वर्जन येणाऱ्या काळात ,, एकाअख्ख्या पिढीसाठी व्यवसाय निवडायचे म्हणले तर विचार जरा जास्तच करावा लागतो .

तरिही कित्येक बाबी या त्रिकालबाधीत सत्य आहेत ( काही अपवाद सोडला तरी) खालील ! इंडस्ट्रीजचा नीट अभ्यास करा,आणि मगच क्षेत्र निवडा ! हे असं क्षेत्र निवडणं अगदी क्रिटीकल असतं, त्यामुळे पश्चात्ताप करण्याची वेळच येणार नाही .

1) Financing :

कर्जपुरवठा करणे, इतरांना पैसे देऊन त्यावर पैसा कमावणे हा व्यवसाय प्रकार खूपच पुरातन आहे ,
बघा जस जशी लोकसंख्या वाढणार , उद्योग वाढणार , गरजा वाढणार त्या त्या प्रमाणे खर्च वाढणार , कर्ज मागणारी माणसं वाढणार ,
त्यामुळे या क्षेत्राला मरण नाही, पद्धतीत,कार्यशैलीत बदल होतील मान्य आहे ,पण हा व्यवसाय, ही इंडस्ट्री वरचेवर वाढतच आहे . यात कशीच कमतरता आलेली नाही .
या इंडस्ट्रीमध्ये ब्रोकरेज फर्म्स , इन्शुरन्स सेक्टर सगळंच येतं .

2) Technology सर्वीसेस :

सध्या सर्वच क्षेत्रात बदल घडतायेत जुन्या चालू व्यवसायांना बदल करावे लागत आहेत , Artificial intelligence , Automation , softwares , याचा वापर प्रचंड वाढतोय ,
लोक Automation साठी खुप पैसा खर्च करायला तयार आहेत , आणि ही प्रोसेस थांबणारी नाही .
त्यामुळे जर आपण अशा प्रकारे स्पोर्टींग रोल मधील . व्यवसाय निवडला तर खरंच या प्रकाराला प्रचंड डिमांड आहे .
त्यामुळे फक्त उद्योजक होण्या पेक्षा
Technology Entrepreneur व्हा !
चांगले दिवस आहेत याला .

(3) Healthcare:

वैद्यकिय क्षेत्र हे प्रचंड मोठ्ठ आहे , परत परत तिथेच एक मुद्दा येतोय कि , कोणालाही मरायला आवडत नाही , मृत्यू लांबवण्यासाठी आपण कितीही खर्च करायला तयार असतो , ना ?
जिथे आपण खर्च करायला मागे पुढे पाहत नाही,तशाच प्रकारे . इतर लोक देखील या क्षेत्राला भरपूर कमाई करून देतात . त्यामुळे MBBS शिकून डॉक्टर बनता नाही आले तरिही यात कित्येक बाबी आहेत ज्यामध्ये आपण एखादं उद्योगाची उभारणी करता येऊ शकते .

4) Real Estate & Construction :

आपण जसे गुहेतून बाहेर पडलोय , त्या दिवशी पासून घरे बांधतोय , या पृथ्वीवर फक्त माणूस एकच प्राणी आहेय जो,,, कि पक्की घरं बांधतोय .
लोकसंख्या फुगतेय तशी _ तशी , घरांची , बांधकाम साहित्याची मागणी वाढतेच आहे , मध्यंतरी त्यात काही काळासाठी मंदी आलेली आहे , पण एक सांगा ,सगळं निर्माण करता येतं पण जमीन कशी निर्माण करावी?
म्हणून उद्याच्या दृष्टीने ही महत्वाची इंडस्ट्री आहे , यात निर्धोक पणे सुरुवात केली तरी काहीही हरकत नाही .

(5) Education :

सध्या पालक लोकांचा मुलांवर सर्वात जास्त खर्च होतोय,तो शिक्षणावर .
अगदी Nursery पासून सुरू झालेला खर्च फायनल इअरपर्यंत चालतच जातो,चालतच जातो .
गेल्या काही दिवसांमध्ये Biju’s सारख्या ऑनलाईन ट्युशन स्टार्ट अप्सनी सुद्धा हजारो कोटी रूपयांचा टप्पा गाठलाय … ते काही उगाचच नाही .
या इंडस्ट्रीत पैसा खर्च करायला लोक तयार आहेत,त्यामुळे यात जर आपण स्टार्ट अप करणार असू तर या पालकांनी केलेल्या खर्चात आपण वाटा घेऊ शकतो.

(6) Entertainment :

मनोरंजन हा उद्योग खूप पूर्वीपासून चालत आलाय,सध्या सुद्धा वातावरण/ मोड बदलला असला तरी,आपण दिवसाचे 8 तास काम केल्यानंतर खूपसा वेळ मनोरंजनासाठी घालवतो.

बरं असं आहे का आज? कि,तुम्हाला सिनेमात नाटकात काम करावं लागेल ,मगच प्रसिद्धी मिळेल ?
नाही!
लक्षात घ्या Amazon Prime , Netflix,हे नवीन प्रकार मनोरंजनाचे आलेत,
कार्टून्स क्रिएटर, इमेज क्रिएटर्स , डिजायनर्स,विनोदी व्हिडीओज बनवणारे युट्युबर्स,Tik Tok युजर्स प्रसिद्ध ही होतात आणि पैसेही कमावतात ..
एक काळ असा होता कि लोक सर्कस,तमाशा फड बघायला जायचे,जमाना बदलला आज लोक Amusement Park ला जातात , शे पाचशे रुपये /टिकीट खर्च करून मल्टीप्लेक्स मध्ये जातातच ना ?

मूळ समजावून घ्या,
लोकं कामं केल्यावर थकणार,आणि त्यांना थकवा घालवायला मनोरंजन पाहिजे,
जर आज तुम्ही या क्षेत्रात काम करताय तर,बिनधास्त रहा,
हे क्षेत्र कधीही थंड पडणार नाही .
लगे रहो !

(7) Transportation :

ज्या दिवशी चाकाचा आविष्कार झाला,त्या दिवसापासून मनुष्य स्पीडने प्रवास आणि सामानाची ने आण करू लागलाय .
जग चालतच … वाहतुकीवर .

एक असा विचार करून बघा कि , जगातली सर्व वाहने ठ्प्प झाली , तर काय होईल या जगाचं ?

म्हणून ट्रान्सपोर्टेशन मग ते मालाचं असो,माणसांचं असो वा कुरीयर किंवा zomato Delivery सारखं .

लोक इंटरनेटवर जग बघतात आणि मग प्रत्यक्ष तिथे जाण्यासाठी निघतात,

चाकं चालतच रहाणार,भलेही मग , वाहनाचा प्रकार बदलेल,पेमेंट मोड बदलेल पण वाहतुक हा उद्योग नॉनस्टॉप चालत आलाय आणि चालत राहील .

(8) We Need … POWER :

राजकारणाच्या अर्थाने घेऊ नका .
पण उर्जा,ही आपली प्राथमीक गरज बनलीये.
आज आपलं एनर्जी शिवाय पान देखील हलू शकत नाही .
जेंव्हापासून बेंजामीन फ्रँकलीनने एनर्जी च्या वापराचा शोध लावलाय , तेंव्हापासून एनर्जीचा वापर वाढतच गेलाय .
कोळसा जाळून ,डिझेल जाळून , आपण लाईट बनवून काम चालूच आहे,पण आजकाल रिन्यूवेबल एनर्जी बद्दल चर्चा ऐकतोय ना ?

यातच उद्याचं भविष्य आहे लक्षात घ्या,सध्या जास्तीत जास्त इंजिनिअरींग कॉलेजमधील एक्स्पोत या प्रयोगालाच बक्षीसे मिळतात .

जर आपण,सोलर,विंड एनर्जी किंवा तत्सम व्यवसायात आहात,काळजीच करू नका .

तुमचा बिझनेस ऑनच राहील .
ऑफ करणे जगालाच परवडणारे नाही .

(9) Food industry :

अन्न, वस्त्र,निवारा,या तीन मुलभूत गरजांपैकी सर्वात पहिली गरज हीच आहे,वैयक्तीक मी याच इंडस्ट्रीत काम करतो, त्यामुळे अनुभवासहित सांगु शकतो,ही ला मरण नाही .
लोकांना तीन वेळा खायला लागतं .
आठ अब्ज लोकसंख्या आहे पृथ्वीची .
कितीतरी वेळा लोक परत परत खातात .
खायची माती तयार करा,लोकं खातील .
मार्केटचा हा सेगमेंट फारच मोठ्ठा आहे छोटया टपरी वजा दुकानापासून सेवन स्टार हॉटेल पर्यंत लोकं खातच असतात,त्यामुळे फुड इंडस्ट्रीत आहात ? चिंताच नको .

बघा,वरिल सांगितलेल्या इंडस्ट्रीज चा परफॉर्मन्स त्यांच्या स्वतःच्या उपयोगीतेवर आहे .
फक्त त्या भरवशावर तुम्ही यशस्वी व्हाल याची गॅरंटी ब्रम्हदेव पण घेऊ शकत नाही .
त्यासाठी मार्केटची तत्वे,बिझनेस फंडा,अनुभव,व्यवसाय शिक्षण लावावेच लागेल नाही का ?

तो लावा आणि यश मिळवा .
एवढंच सांगणे .

असे लेख आवडतात ? तर लाईक करा आमचे फेसबुक पेज
लिंक खाली आहे .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

शुभेच्छा
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध, पुणे.
व्हाट्स अप : 9518950764 .

उद्योगा/ व्यवसायाविषयी वैयक्तीक कन्सलटिंग हवी असेल तर,कॉल करा
उद्योगनिती पुणे ऑफीस :
9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *