पुन्हा एकदा श्री रतन टाटा यांची भारतीयांना मोठी भेट

1,298 Views

इलेक्ट्रीक गाडी घेताय दिमतीलां?तर TATA आहेत मदतीला.

भारतात इलेक्ट्रीक गाड्यांची विक्री आता कुठे सुरू झालीये,अजूनही अनेक जण साशंक असतील, कारण एकच प्रश्न मोठा आहे कि
,चार्जिंग रस्त्यातच संपली तर काय ?

बघा,उद्योजक आणि बिजनेसमन मध्ये एक बेसिक फरक असतो कि, उद्योजक सगळं सेटअप नव्याने डिजाईन करुन उभं करतो, तर बिजनेसमन मार्केटमध्ये सिद्ध झालेल्या प्रॉडक्टची निर्मिती अथवा विक्री करतो.

तर, या चार्जिंगच्या प्रश्नावर उत्तर घेऊन आलेत,आपल्या सर्वांचे आदर्श उद्योजक श्री रतन टाटा सर.

भारतात एक असं सूत्र बनत चाललंय कि,,,, “जिथे प्रॉब्लेम मोठा तिथे रतन टाटा” !

आणि या प्रॉब्लेमसाठी रतन टाटांनी अगोदरच विचार करून ठेवलाय.

TATA पॉवर,ही इलेक्ट्रीक क्षेत्रातली एक मोठी कंपनी आहे, त्यांचं भारतभर मोठ्ठं नेटवर्क आहे, त्यातच EV charging हा एक नविन पार्ट केला गेलाय .

टाटा पॉवरने भारताच्या 100 शहरांमध्ये 500 च्या वर चार्जिंग स्टेशनसाठी भारत सरकार बरोबर करार केलेला आहे,त्याचबरोबर HPCL बरोबर देखील, टाटांचा करार झालेला असून,HP च्या प्रत्येक पेट्रोलपंपावर TATA Power चं state of art. असं हायटेक चार्जिंग स्टेशन असणार आहे, याचा अर्थ?जिथे जिथे HP petrol pumpतिथे तिथे चार्जिंग स्टेशन.

वेगवेगळ्या EV वाहनांसाठी वेगवेगळी चार्जिंग कॅपीसिटी लागणार हे गृहीत धरुनच कर्मशियल वाहने,बसेस, टू व्हिलर यांचे करिता नॉर्मल ते अल्ट्राफास्ट अशी वेगवेगळी रचना असणार आहे.

हे सगळं काम इतकं सोप्पं असणार नाही,पण अवघड काम सोप्पं करणे टाटांना शक्य असतं.

त्यांच्या दूरदृष्टीने याची तयारी केलेली असते,यासाठी TATA Power EZ charge नावाचे एक ऍप देखील लाँच करण्यात आहे,या ऍपवर जवळचे चार्जिंग स्टेशन कोठे आहे? तुमची गाडी किती चार्ज झाली आहे? याची इत्यंभूत माहिती या ऍपवर आहे (हे ऍप Google Play Store वर आहे,जेण आजही डाऊनलोड करू शकता )

आता जेंव्हा टाटा मदतीला आहेत म्हणल्यावर,इलेक्ट्रीक गाडी घेताना वाटणारी चिंता करायचं काम नाही.

ही EV charging स्टेशन्स 2026 पासुन फुल्ल कॅपिसिटीने काम देतील.

तो पर्यंत आपण या भारतमातेच्या रत्नाला धन्यवाद देऊया.

थँक्स रतन टाटा सर !

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *