“प्रदर्शनामध्ये सहभाग घेताना,या टिप्स वापरा”.

884 Views

#Expo_मध्ये_सहभाग_घेताना.

#Mamagement_at_Expo

© निलेश काळे.

📌 बरेच लोक एखाद्या व्यवसायिक प्रदर्शनांमध्ये भाग घेतात, अशा प्रदर्शनांमध्ये व्यवसायिकांनी त्या ठिकाणी आपला व्यवसाय कशाप्रकारे केला पाहिजे? कशाप्रकारे तिथे जास्तीत जास्त लीड मिळवल्या पाहिजेत ?आणि जास्तीत जास्त विक्री कशी घडवून आणली पाहिजे? याच्यासाठी खालील काही टिप्स फॉलो करा.

📌 (1) #Put_Clear_Objectives:

आपण एखाद्या व्यवसायिक प्रदर्शनांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव भाग घेतो,आपण नेमका कोणत्या कारणासाठी भाग घेतलेला आहे? मग मग मार्केटिंग करणं असो, विक्री मिळवणं असो किंवा इतरांपर्यंत फक्त माहिती पोचवण्याचा भाग असो, आपला नेमका उद्देश काय आहे? हे एकदा पक्के ठरवून टाका आणि त्यानंतरच कोणत्याही प्रदर्शनांमध्ये भाग घ्या.

📌 (2) #Dont_go_alone

समजा एखादा एक्सपो तीन किंवा चार दिवस चालणार आहे, अशा वेळेला त्याची तयारी म्हणून आपल्याबरोबर दोन किंवा तीन माणसं हवीत, जी आपल्याबरोबर पुर्ण वेळ थांबू शकतील,

प्रदर्शनांमध्ये लावलेला स्टॉल सोडून आपण कुठेही जाऊ शकत नाही, मग अशा वेळेला जर आपल्याला कुठे जाण्याची इमर्जन्सी आली, तर आपल्या ऐवजी कोणी ना कोणीतरी स्टॉलवर उभा हवा.

याकरिता आपण आपल्या कुटुंबीयांपैकी कोणाला/मित्राला/ विद्यार्थ्याला किंवा कोणत्याही नातेवाईकाला बरोबर ठेवू शकतो.

हे अत्यावश्यकच आहे

📌 (3) #Chat_with_Organiser

जे कोणी लोक प्रदर्शनामध्ये भाग घेतात अशानी आयोजकांबरोबर आपला सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे, बऱ्याच वेळेला एक्सपो दरम्यान ही आयोजक मंडळी जास्त बिझी असतात, परंतु त्यांच्या टीम पैकी कोणाशी ना कोणाशी तरी आपला सुसंवाद असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या गरजेच्या वेळेला काही बदल करायचे असल्यास,त्यांची आपल्याला मदत मिळू शकते.

📌 (4) #Tell_the_friends:

आपण पण ज्या कोणत्या प्रदर्शनांमध्ये भाग घेणार आहोत ?त्या प्रदर्शनामधील आपला स्टॉलचा नंबर/ त्या प्रदर्शनाचे नाव /लोकेशन/गाव हे सगळं आपण आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून इतरांना सांगितलं पाहिजे, जेणेकरून आपले मित्र किंवा आपले परिचित अथवा नातेवाईक आपल्याला प्रदर्शनाच्या ठिकाणी भेटू शकतील,अशाप्रकारे ऑटोमॅटिक आपल्या स्टॉलकडे विक्री वाढेल.

📌.(5) #Have_the_checklist:

समजा ,प्रदर्शन आपल्या गावांमध्येच आहे तरीदेखील प्रदर्शनाच्या ठिकाणी अनेक गोष्टी घेऊन जायच्या असतात, जसं पोस्टर्स / बॅनर / स्टँडी/मार्केटिंग मटेरियल /भरपूर विजिटिंग कार्ड / पेन/ रजिस्टर या सगळ्या गोष्टींची ऐनवेळेला गरज पडू शकते आणि त्याची तयारी ही आपल्याला अगोदरच करावी लागते.

आपण जर इतर गावाहून प्रदर्शनाच्या गावी घेऊन जात असाल ,तर मुक्कामाची वेळेला आपल्याला अनेक गोष्टींची गरज पडू शकते, याची लिस्ट अगोदरच तयार करा आणि त्या लिस्ट नुसारच सामान पॅक करा.

📌 (6) #Go_Creative:

एक्सपोमध्ये आपला स्टॉल हा जास्तीत जास्त चार दिवस असतो आणि चार दिवसांमध्ये आपल्याला ग्राहकांना आपल्याकडे जास्तीत जास्त आकर्षित करायचं आहे, त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करायला मागे पुढे बघू नका ,आपला स्टॉल हा जास्तीत जास्त आकर्षक असला पाहिजे, यासाठी संयोजकाची परवानगी असेल तर लाइटिंग इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले वगैरे लावता येईल

📌 (7) #Sales_Process

एक्स्पोमध्ये आपल्याला वेळ फार कमी असतो,म्हणून करता तिथे सेल्स प्रोसेस ही जास्तीत जास्त 6 मिनिटांमध्ये पूर्ण झाली पाहिजे.

त्याच्या स्टेप्स खालील प्रमाणे असू शकतात

#Engage_Greet : (30 Sec)
एखाद्या व्यक्तीला आपल्या स्टॉलवरील प्रॉडक्टमधे इंटरेस्ट असेल तरत्याला नमस्कार करून ओळख करून घेण्यामध्ये फक्त 30 सेकंद खर्च करा.

(2) #Qualify: (90 sec)

एखादा व्यक्ती आपला ग्राहक बनू शकतो किंवा नाही? याच्या करता जे प्रश्न-उत्तरे करायचे असतात,त्यामधून आपल्याला ओळखू येऊ शकतो,की हा व्यक्ती टाईमपास करण्यासाठी आलेला आहे?का खरेदी करण्यासाठी आलेला आहे? मग या क्वालिफाईग प्रक्रियेसाठी फक्त दीड मिनिट खर्च करा.

#Dismiss_timewasters : (15 sec)

जर समोरचा व्यक्ती खरेदी करणार नाही ,असे आपल्या लक्षात आलेलं असेल तर तो व्यक्ती आपला टाईम वेस्ट करत असतो.
त्याला डिसमिस करा याच्यासाठी 15 सेकंद पुरतात.

#if_Qualified : (2_4 min)
समजा एखादा व्यक्ती आपल्याकडून नक्की खरेदी करणार आहे असा आपल्या. लक्षात आलं तर,त्यासाठी पुढचे 4 मिनिटे खर्च करा

#close: (90 sec)

क्वालिफाईड ग्राहकाला माल देऊन पैसे मोजून घेण्याकरता 90 सेकंद पुरतात, तेवढेच खर्च करा.
जा ग्राहकांची खरेदी झालेली आहे, त्याच्याबरोबर सुद्धा बडबड करत बसू नका,अशाप्रकारे आपण जर 6 मिनिटामध्ये एखादी विक्री प्रक्रिया पूर्ण केली, तर एका तासामध्ये आपण पाच ते दहा ग्राहक करू शकतो ,याचा अर्थ 8 तासांमध्ये साधारण 70 ते 80 ग्राहक करू शकतो, आपण जर 5 लोक असलो तर एका दिवसांमध्ये साधारण 200 ग्राहक आपल्याकडून खरेदी करून जाऊ शकतात.

📌 (8) #Use_tactics:

आपण आपल्या व्यवसायाची दोन तीन प्रकारे वाढ करू शकतो ,त्याच्यासाठी मार्केटिंग टेक्निक वापरल्या जातात, किंवा मग tactics वापरल्या जातात.

Offer काढणे, डिस्काऊंट देने याला टॅक्टीक्स म्हणलं जातं,त्या वापरा, कारण ?इथे आपल्याकडे मार्केटिंग करायला वेळ नाहीये.

📌 (9) #Dismiss_People:

आपल्या स्टॉलवर गर्दी असणे,ही चांगली गोष्ट आहे ,परंतु प्रदर्शनांमध्ये अनेक वेळेला आपले स्पर्धक/उगाचच इकडे तिकडे फिरणारे लोक/ आजूबाजूच्या स्टॉलवरचे लोक इ.गर्दी करतात, त्यामुळे आपला स्टॉल झाकला जाऊ शकतो , तेंव्हा गोड बोलून लोकांना आपल्या स्टॉलवरून बाजूला काढा, जेणेकरून आपल्याला विक्री वर फोकस करता येईल.

📌 (10) #Keep_data_give_away_business_Cards;

अनेक प्रदर्शनांमध्ये खूप लोक फक्त काय चाललंय ?हे बघण्यासाठी आलेले असतात ,पण तरीही हे लोक पुढच्या वेळेला आपल्याकडे खरेदी करता यावेत म्हणून आपल्याजवळील बिझनेस कार्ड प्रत्येक व्यक्तीच्या हातात दिलं गेलं पाहिजे.

एक्स्पो संपल्यानंतर देखील आपल्याला बिझनेस करायचा असतो, त्यामुळे पुढच्या रेफरन्ससाठी आपल्याजवळील बिझनेस कार्ड फार उपयोगी पडतं , त्यामुळे आपण एक्सपोला जात असतानाच भरपूर विजिटिंग कार्ड छापून घ्यावी, त्याचा फायदा होतो.

व्यवसायिक प्रदर्शनांमधून अनेक ब्रांड उभे राहिले आहेत, त्यामुळे जिथे जिथे उद्योगी प्रदर्शने असतील त्या ठिकाणी नक्की सहभागी व्हावं, चार दिवसांमध्ये आपण खूप काही विक्री जरी करू शकलो ,तरी हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो ,हे मात्र खर आहे.

📌अनेकजनांना प्रदर्शनाचा अनुभव असु शकतो,त्यांनी कमेंटमध्ये त्यांच्या टिप्स सांगाव्या 🙏🙏

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

शुभेच्छा

©निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क, औंध ,पुणे.
9518950764
office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *