प्रेमात पडल्यावर एखादं प्रेमियुगुल काय करतं ? यांनी 40 billion डॉलरची कंपनी बनवली .

35 Views

Canva

आजकाल प्रत्येकाचा कल आहे तो स्टार्टअप चालु करण्यात पण कोणत्याही स्टार्टअपचा मुख्य गुणधर्म हा असतो,कि त्या स्टार्टअपमुळे जास्तीत जास्त लोकसंख्येचा एखादा छोटा का होईना प्रॉब्लेम सुटायला हवा !

आज आपण स्टोरी बघु अशा consumer facing product ची ज्याला एका ऑस्ट्रेलियन प्रेमयुगुलाने सुरु करून स्टार्टअपने 40 billion डॉलरची एक कंपनी बनवलंय.

ही स्टोरी आहे,ऑस्ट्रेलियामध्ये फुललेल्या या प्रेमप्रकरणाची आणि त्यांच्या स्टार्टअपची .

Canva हे नाव तुम्ही ऐकलं असेल किंवा मोठी शक्यता अशी आहे कि,डिजायनिंगसाठी या सिंपल सॉफ्टवेअरचा वापर केला असेल.

हे सॉफ्टवेअर जगातल्या 190 देशातले लोक वापरतात आणि दर सेकंदाला 80 डिजाईन यावर तयार केले जातात .

याचे आजचे वॅल्युएशन 4 billion डॉलर एवढे असून,याची फाऊंडर
Melanie Perkins (32) ही ऑस्ट्रेलियन महिला Canva ची co founder आणि CEO आहे .
जिने आपला बॉयफ्रेंड आणि आता नवरा + बिझनेस पार्टनर Cliff obrechit बरोबर चालु केलं .

जगातल्या फार कमी टेक स्टार्टअपची सुरुवात महिलांनी केलेली असून त्यात Canva हे सर्वोत्तम उदाहरण आहे.

Melanie Perkins ही मलेशियन आई आणि ऑस्ट्रेलियन वडिल यांची अपत्य असून तिचा जन्म 1987 पर्थ ऑस्ट्रेलियातच झाला .

काही लोकांच्या डोक्यातच बिझनेसचा आणि क्रिएटिवीटीचा किडा असतो तसा melania perkins च्या डोक्यात होता .

वयाच्या 14 व्या वर्षी तिचं पहिलं स्टार्टअप तयार होतं हाताने विणलेले स्कार्फ विकण्याचा या स्टार्टअपमधून तिला बिझनेसचे आणि विक्रीचे दिसत शिकायला मिळाले.

पुढे University of Western Australia मध्ये तिने ऍडमिशन घेतलं, आणि शिकता शिकताच काही तरी कमावलं पाहिजे म्हणून मुलांची प्रायवेट टयुटर म्हणुन ग्राफीकचे क्लास घ्यायला सुरुवात केली,

या करिता ती Adobe photoshop वापरायची परंतु तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहितीय कि, Photoshop मध्ये ग्राफ्रिक बनवणे म्हणजे काय खेळ नाही .

इथे अनेक टुल्स वगैरे वापरून इमेजेस बनवाव्या लागतात आणि एवढं शिकेपर्यंत पोरांचं अर्ध सेमिस्टर वाया जायचं.

idea : हीच्या डोक्यात अशी आयडिया आली कि, डिजाईन बनवणं इतकं सोप्पं का करू नये ?कि एकदम नवख्या माणसानं ते केलं पाहिजे आणि स्थापना झाली fusion books या वेबसाईटची .

Fusionbook.com वरून शाळेल्या मुलांचे Yearbook अतिशय सोप्या पद्धतीने प्रिंट करून काढता यायचे .

Cliff obrechit आणि malenia यांनी जवळपास 400 शाळा बरोबर याचा सेल केला आणि इथूनच सुरूवात झाली Canva च्या स्थापनेची.

📌 Funding ; यात प्रेमीयुगुलाने आपलं स्टार्टअप सुरुवात तर केलेलं परंतु यांना आता फंडिंग लागणार होती, कारण स्टार्टअप कोणतेही असो त्याला फंडिंग लागतेच .

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी यांनी हे सुरुवात तर केलं परंतु यांच्याकडे टेक्निकल असा सपोर्ट पण नव्हता .

पण एका Venture Capitalist च्या कॉन्फरन्समध्ये तिची भेट Bill Tim या इन्वेस्टबरोबर ऑस्ट्रेलियात झाली, (अशा भेटी या केवळ अशाप्रकारच्या कॉन्फरन्सेस मध्ये होऊ शकतात,पण तिथपर्यंत जायची तयारी हवीये )पण इन्वेस्टर हे इतके कच्चे नसतात,Tim ने तिला तिची आयडिया Pitch करण्यासाठी सॅन्फ्रासिस्कोला बोलावलं .

Melanie Perkins तिथे गेली आणि तिला त्याचा आर्थिक तर फायदा झालाच पण Bill Tim ने तिला सिलीकॉन व्हॅलीमध्ये काम करणाऱ्या अनेक तज्ञ लोकांशी भेटवलं,ज्यातले अनेक जण आज Canva च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये आहेत .

📌 जानेवारी 2021 मध्ये, म्हणजे ? Canva पूर्णपणे यशस्वी झाल्यानंतर melania Perkins आणि Cliff Obrechit यांनी लग्न केलं .

आज ”ऑस्ट्रेलीयातील सर्वात श्रीमंत महिला ” असं गुगलवर सर्च केलंत तर Melanie Perkins हेच नाव समोर येईल .

काय केलं तिने ? ? I एकदा रिकॅप करू !

एक प्रॉब्लेम शोधला = त्यावर उत्तर शोधलं = चांगल्या लोकाशी प्रोफेशनल पार्टनरशीप केली = योग्य ठिकाणावरून फंडींग घेतली = पर्सनल लाइफ + प्रोफेशनल लाईफ यांची नीट सांगड घातली आणि एक सक्सेस स्टोरी घडवली .

Graphic design च्या क्षेत्रात Microsoft च्या Adobe photoshop ची मक्तेदारी खोडून काढायचं काम,आज तिच्या या स्टार्टअपमुळे झालंय.

आज अनेक जण अशा प्रकारचे ऍप किंवा सॉफ्टवेअर बनवतात,पण तो जो एक ड्राइव आणि स्केलअप करायची जी इच्छा पाहिजे असते? ती अनेकांजवळ दिसत नाही !

बिजनेसेसला पुढे जायचे असेल तर गायडन्स लागतोच बिना मेंटर अनेक व्यवसाय आहे त्याच स्टेजला रखडत बसतात .

अस घडू नये यासाठी बिजनेस मेंटरशीप देणारा एक प्रोग्राम आपण उद्योगनिती मार्फत लॉन्च करतोय .

UMBA – 10th बॅच हा 60 दिवसाचा पेड कोचिंग प्रोग्राम येत्या 11 नोव्हेंबर पासून चालू होतोय, तोजॉईन करा ! ज्याचा तुमच्या व्यवसायाला नक्की फायदा होईल .

कॉल करा : श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663 .

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे .
9518950764.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *