फक्त CCTV नाही,ही गोष्ट लावा,कर्मचारी चांगला रिजल्ट देतील

1,253 Views

फक्त CCTV नाही,ही गोष्ट लावा,कर्मचारी चांगले रिजल्ट देतील.

आपल्या व्यवसायात दोन लोक विक्री घडवून आणतात,एकतर आपण स्वतः आणि दुसरा म्हणजे आपला स्टाफ .
दोघेही ज्यावेळी आपापल्या परिने प्रयत्न करतोय त्यावेळी असं दिसतंय कि,आपण वैयक्तीक पणे प्रयत्न केले तर जास्त ग्राहक होतात, पण तेच जर आपण स्टाफच्या जीवावर सोडले तर तितके ग्राहक होत नाहीत .

मग का होतंय असं ?
दरवेळी अवघड परिस्थितीत आपणच उभं राहीलं पाहिजे का ?

“आपण आपल्या व्यवसायातले टॉप सेल्समन असायला हवंय”

हे मान्यय ” ! पण शेवटी आपल्या जवळ सुद्धा चोवीसच तास आहेत आणि लिमिटेडच एनर्जी आहे तर मग कसं साध्य करायचं मोठ्ठ यश ?

हा प्रश्न आज आपल्या पैकी अनेकांना पडला असेल किंवा येत्या काळात पडेल ,जेंव्हा तुमच्याकडे स्टाफ असेल काम करायला !

जेंव्हा जेंव्हा कर्मचाऱ्यांना असं वाटतय कि तुमच्याकडे त्यांची ग्रोथ होणार नाही,तेंव्हा ते आपल्याला सोडून पळू लागतात,कर्मचाऱ्यांचा टर्न आऊट रेशो वाढतो आणि ही चिंता करायचीच गोष्ट आहे.

त्यामुळे मग त्यांचं उत्तर शोधण्यासाठीच या शब्दप्रणालीचा वापर केला गेला !

ज्याला Business systems म्हणलं जातं.

पूर्ण स्क्रीप्टच तयार करून घ्या !
त्या स्क्रीप्टच्या बाहेर जायचच नाही ,
“Airtel च्या कस्टमर केअरची नुकतीच सुरुवात झाली होती “आणि आमच्या ग्रामीण भागातील पोरांनी नवीनच पद्धत डेवलप केली होती , बोअर झाले कि कस्टमर केअरला फोन लावायचे आणि काही बाही बोलायचे , आता एअरटेलने सिस्टीम स्क्रीप्ट दिले असेल कर्मचाऱ्यांना त्यामुळे ते उलढुन बोलत नसतं:आपण काहीही बोला , पण ते त्यांची धारा सोडत नसतं,, गंमतीचा भाग जर सोडला , तर त्यांनी एक लिखीत स्वरुपातील स्क्रीप्टेड सिस्टीम डेवलप करवून घेतली त्यामुळे ते यशस्वी राहीलेत ,
MLM वाले , Lic एजंट्स , MR ,ही लोकं बघा ,यांना त्यांच्या क्षेत्रात हरवणे सोप्पय का ? हरवणं तर सोडा त्यांना बोलण्यात सुद्धा मागे पाडणं शक्य होत नाही , कारण त्यांची वागणूक,, ही पूर्ण एकादया स्क्रीप्ट सारखी सिस्टीमॅटीक असते.

यश कसं मिळतं ? ग्राहक कसा हो म्हणतो ? काय विचारल्यावर काय सांगायचं ? ऑब्जेक्शन दुर करवून विक्री कशी घडवायची ? ग्राहकाला कसं खुश करायचं ? या प्रश्नांची उत्तरं लिखीत आणि स्क्रीप्ट स्वरूपात आपल्या स्टाफला दया ! आणि त्यांना त्या बाबी काटेकोर पणे फॉलो करायला सांगा ! मग बघा कसा फरक पडतो ते .
त्याचं समोरासमोर असणारं उदाहरण घ्या ! एक म्हणजे स्टीव जॉब्सच्या ऍपलचं ,आणि दुसरं म्हणजे MLM मधल्या लोकांच .
स्टीव जॉब्स वारले त्याला आता कितीतरी वर्ष झाली,पण आयफोनची प्रसिद्धी कणभर सुद्धा कमी झाली नाही.ती स्क्रिप्टेड डॉक्युमेंटमुळे.

MLM मध्ये काम करणाऱ्यांचा मला फार राग यायचा ! पण आजकाल कौतुक वाटतं ,भलेही त्यांचा रस्ता चुकीचा असेल पण ते सेल्स ट्रेनिंग फारच सिरीयसली घेतात , सतत – सतत च्या ट्रेनिंग्ज मुळे ते फार हार्डकोअर बनतात , आणि हाच त्यांच्या यशाचा पाया आहे .

s-y-s-t-e-m ला असं म्हणता येईल
Saves
your
stress
time
Energy,
Money .

अशी काम करण्याची पद्धत ज्यामुळे आपल्याला ताण होत नाही आणि आपला वेळ , पैसा आणि उर्जा वाचते .

या systems आपण दोन प्रकारांनी standardise करू शकतो .

1) Hard systems
2) soft Systems

यात Hard म्हणजे , लोगो , युनिफॉर्म , फर्निचर , बोर्ड सगळं ठरवून टाकायचं आणि व्यापाराला सुरूवात करायची ,
Swiggy चा डिलीवरी बॉय ज्यावेळी आपण रस्त्यावर बघतो , तेंव्हा त्याचं टी शर्ट,कॅप, बॅग बघून आपण लगेच ओळखतो कि हा swiggy चा माणूस आहे . कारण ?
स्विगी ने ती हार्ड सिस्टीम लावलीये !

आता

2) soft system :

वर सांगितल्या प्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाशी कसे वागावे ?कसे बोलावे ? हे बहुतांशी व्यावसायिक प्रतिष्ठाने सांगतच नाहीत,त्यांच्यासाठी कधीही अशी ट्रेनिंग नसते,पण आपण अगदी पुण्यातल्या सुद्धा सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या मोठ्या कंपन्या बघा, तिथे या अशा सॉफट स्किलच्या ट्रेनिंग सातत्याने होतच असतात .

आपलं वागणं कसं असतंय? कि आहे ना कर्मचारी? मग तो हँडल करेल ग्राहकाला!

अरे ss,असं कसं जमेल बाबू ?
इथे एक व्यवस्थित प्रक्रिया पाहिजे !
मग.

कर्मचाऱ्यांनी किंवा स्टाफने ग्राहकाशी कसं वागलं पाहिजे?याची पण ट्रेनिंग त्यांना दयायला हवीये,ज्या व्यवसायात ही ट्रेनिंग दिली जाते, तिथे एक सिस्टीम तयार होते
आणि रिजल्ट सातत्याने चांगले येतात.

तेंव्हा या सातत्याने भयंकर स्पर्धा असणाऱ्या व्यावसायिक वातावरणात आपल्या व्यवसायाला सिस्टीमाईज करा !

म्हणजे आपण व्यवस्थित यश मिळवू !

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

शुभेच्छा
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे
9518950764.
ऑफीस ;9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *