फक्त interest आहे,म्हणून धंदे उभे रहात नसतात, हे पण हवंय

1,021 Views

फक्त इंटरेस्ट आहे म्हणुन व्यवसाय उभे रहात नाहीत,तर हे पाहिजेच.

एखादं दिवशी कुणीतरी उठतो आणि फोन करतो .

xx : ” सर माझ्या डोक्यात दुनियेला चेंज करणारी जबरदस्त बिझनेस आयडीया आलीये ,याचं जर स्टार्ट अप केलं? तर एका वर्षात दहा करोड कमवू शकतो, फक्त थोडी फंडिंग पाहिजे” !

हुड …..

असं काही पण कसं असेल रे दादया ?

असे लोकांच्या फेसबुक प्रोफाईलला आदल्या दिवशी काहीतरी असतेत आणि दुसऱ्या दिवशी

“डायरेक्ट उद्योजक “………

कुछ भी ???????

📌 आजकाल सगळ्यांना instant Gratification (तात्काळ यश )पण मित्रांनो असं चालत नाही.

खूप जणांची तक्रार असते कि ,

बँक/वडिलं/ नातेवाईक / मित्र पैशाची मदत करीत नाहीत,म्हणुन धंदा करता येत नाही,

पण ज्याना वडिल पैसा ,सुविधा,सगळं सगळं पुरवतात त्यांना का मग दणदणीत यश मिळत नाही ?

📌 तर त्याचं सर्वात मुख्य कारण आहे कि , “तुम्हाला इंडस्ट्री कळत नाही”
किंवा “तुम्ही इंडस्ट्री समजुन घेतलीच नाही ”

📌 इंडस्ट्री = म्हणजे काय बरं ?

तर याचा साधा अर्थ आहे ..
मोठा व्हयु !

आपण ज्या क्षेत्रात काम करणारेत त्या क्षेत्रातली खालपासून वरपर्यंतची सगळी साखळी !

याला इंडस्ट्री म्हणतात.

📌 असं आहे कि ,समजा मला एखादी गोष्ट चांगली जमते, म्हणजे मी त्यात यशस्वी उद्योजक होईलच असं काही नाही ,म्हणून तर अनेक जण दोन – चार वर्षात धंदा बंद करतात.

आपल्याला माहितीये ना ? कि ,चांगला स्वयंपाक बनवणारा प्रत्येक शेफ,हा यशस्वी हॉटेल व्यावसायिक होऊ शकत नाही,त्याचं मुख्य कारण हेच असतंय ! कि त्यांना कुकींगचं टेक्नीकल नॉलेज तर असतंय, पण “इंडस्ट्री कळतेय का”? हे महत्वाचं आहे .

📌 साधारणपणे ज्याला हॉटेल इंडस्ट्री समजुन घ्यायचीये आणि मग व्यवसाय चालु करायचाय, तो कसा विचार करील ?

1) माझा रेंट किती असेल.?
2 ) माझे बिझनेस मॉडेल कसे असेल ?
3 ) माझे स्पर्धक कोण आहेत ?
4 ) आजुबाजुच्या लोकॅलिटीत कोणते लोक राहतात ?
5) त्यांच्या खाणपाणाच्या सवयी कशा आहेत ?
6) आपले हॉटेल कोणत्या प्रकारचे फुड serve करणारंय ?
7) आपला ROI कसा असेल ?
8 ) मार्केट मधले बदलते ट्रेन्डस काय आहेत ?
9) पुढे जाऊन आपण कोणत्या बिझनेसला इंटिग्रेट करू शकतो ?

जो व्यक्ती वरिल पॉईंटचा अभ्यास करील ! हो अभ्यासच ,,, तो इतरांच्या तुलनेने जरा जास्त लवकर ग्रिप घेईल …… कारण? नुसत्या चौकशा करण्याने माहिती मिळते, आणि अभ्यास केल्याने ज्ञान.

📌 आमच्या कडे जे कोणी बिझनेस कन्सलटिंग घेण्याकरिता येतात, त्यांना आम्ही तेच करून देतो,इंडस्ट्रीचा मोठा व्हयु दाखवतो आणि प्रॉडक्ट वॅलिडेट होतंय का नाही?या गोष्टी बघतो.

📌 उगाचच कोणी म्हणलं …

” कि मला याच्यात इंटरेस्ट आहे ” !
“अमुक अमुक गोष्ट मला जमते ” !
किंवा , ” माझ्याकडे X लाख रुपये आहेत” ! तर त्याला काही मतलब नाही !

📌 त्यामुळे,
मित्रांनो /भावांनो/तायांनो थोडक्या पायावर बिल्डींगी बांधु नका,खोलवर जा, साधनं उपलब्ध आहेत , इंटरनेट उपलब्ध आहेत ,बिझनेस कोचेस उपलब्ध आहेत, तुमचंच नुकसान होणार नाही !

📌 आम्ही उद्योगनितीकडून कन्सल्टिंग घेणाऱ्या उद्योजकांना याचा वापर करूनच नुकसानीत जाऊ देत नाही !

📌 या प्रकारचे लेख देण्याचं कारणच हे आहे कि, समाजात व्यवसाय साक्षरता वाढली पाहीजे, जे काम आम्ही नेटाने करतोय, आपल्या पेजला बाहेर शेअर करून या कामी आपण पण मदत करू शकता !

तेंव्हा , असे लेख बाहेर शेअर करा ! इतरांना पेज लाईक करायला लावा ! त्यांचाही फायदा होईल .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

शुभेच्छा.

निलेश काळे ,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764

ओमकेश मुंडे सर : 9146101663

Default image
Nilesh Kale
Articles: 83

One comment

 1. अमोल अनिल कहाणे
  अमोल अनिल कहाणे

  सर एखादा चांगला व्यवसाय सुचवा
  भांडवल कमी आहे
  पण तीव्र इच्छाशक्ती आणि मेहनत मी कितीही करू शकतो
  सध्या 2 हॉटेल चालू आहेत

Leave a Reply