फार मोठा खर्च न करता विक्री वाढवण्याची जगप्रसिद्ध पद्धत,जी 90% कंपन्या वापरतात

784 Views

फार मोठा खर्च न करता,विक्री वाढवण्याची जगप्रसिद्ध पद्धत जी 90% कंपन्या वापरतात.

आपण खूप वेळा वेगवेगळ्या टॅक्टिक लावून विक्री वाढवण्याचा प्रयत्न करतो

आज जी थेअरी सांगतोय ती,सिद्ध थेअरी आहे , याचा आणि कोणत्याही टॅक्टीकचा विशेष संबंध नाही, पण तरिही ग्राहकाने आपल्या कडून जास्त वेळा आपल्याला पाहिजे तोच माल खरेदी करावा अशी ही प्रॉडक्ट ऑफरिंगची थेअरी आहे.

समजा आपल्याकडे एखादया उत्पादनाची एकच दोन Variety उपलब्ध आहे,तर ग्राहकासमोर दोनच चॉईस असतात म्हणजे खरेदी करू? का नको ? म्हणजे तो किमतीचा विचार करत बसतो , माझ्याकडे या साठी बजेट आहे का नाही ?हा विचार करत रहातो .

समजा आपण त्यांना दोन चॉईस दिल्या Large आणि Small, आता इथे 80% लोक small घेतील आणि 20 % लोक Large घेतील , म्हणजे आपलं नुकसानच होतय.

याचं कारण असं आहे कि,खूप लोकांना सेफ खेळायला आवडतं.

पण आता काय करायचे ? कि वरच्या दोन चॉईस बरोबर तिसरा चॉईस दयायचा त्याला नाव दयायचं “जंबो”

आता काय होईल ?तर पुर्वीचा जो Large होता,तो प्रकार मेडियम होऊन जाईल ज्याला आपण “रेग्युलर” हे नाव देऊन टाकायचं.

आता आपल्याकडे तीन variety झाल्यात,तीन प्रकारची प्राईसिंग झालीये ,म्हणजे ग्राहकाला तुलना करता येऊ शकते,याला contrast Pricing म्हणायचं.

📌 आता इथे काय होईल?

20% : लोकं small निवडतील.
60% : लोकं मेडियम घेतील.
20% : लोकं जंबो घेतील.

📌 याचा अर्थ असा झाला कि , पुर्वीचा जो Large होता , त्याचा ग्राहक 20% वरून 60% वर गेला आणि जंबो साठी 20 % ग्राहक एकष्ट्रा भेटला

📌 याचा सरळ सरळ अर्थ असा की, फक्त ऑफर तीन प्रकारात देऊन आपण ग्राहकाला जास्त माल विकला.

📌 एकदम सिंपल आहे सगळं

📌 आपण कोणत्याही मोठया कंपनीची स्ट्रॅटर्जी बघा,त्यात जास्त नाही फक्त तीनच variety असतात, Car कंपन्या, कोल्ड्रींक कंपन्या, FMCG कंपन्या, क्लासेस, DTH कंपन्या, सगळ्या सगळ्या कंपन्या 3 पॅकेजच देतात, जास्त नाही,कमी नाही.

📌 मारुती सुझुकी हेच करते Lxi, Vxi ,Zxi , किंवा LDi ,VDi ,ZDiया प्रकारात गाडया काढते,आणि VDi किंवा Vxi गाडया जास्त विकतात.

आता तुम्ही म्हणाल,कि तीन च्या ऐवजी 5- 10 option दिले तर फायदाच होईल ना? तर नाही…इथे परत गडबड होईल.
कारण जास्त ऑप्शन.. जास्त कन्फ्युजन आणि कन्फ्युज ग्राहक खरेदी करत नाही.

तो टाईमपास करून निघुन जातो

तेंव्हा आपली ऑफर पण 3 प्रकारामध्येच काढा आणि जास्त विक्री मिळवा सिंपल.

पोस्ट आवडली असेल तर मित्रांबरोबर नक्की शेअर करा,त्यांचा पण फायदाच होईल.

धन्यवाद.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंदपार्क, औंध,पुणे.
9518950764

तुम्हाला सेल्स वाढवायचाय?मग आपली बिझनेस कन्सल्टींग घ्या,डिटेलसाठी कॉल करा, ओमकेश मुंडे सर : 9146101663.

Default image
Nilesh Kale
Articles: 83

One comment

  1. Want to know more Please call or whats app on 9892093482

Leave a Reply