फुड फ्रँचायजीचा “one dish meal” हा प्रकार माहितेय का ?

#One_dish_meal :

©निलेश काळे .

📌लहानपणी पासुन आपल्याला शिकवलं गेलंय , माणसांच्या मुलभूत गरजा तीन .. अन्न ,वस्त्र,आणि निवारा , जेंव्हा मग व्यवसाय उभा करायचा असतो तर यापैकीच एखादी गरज बघुन त्यावरच केला तर मस्त नाही का ?

📌 आज बघुया मग अशाच एका गरजेवर उभं करता येण्या सारखं स्टार्टअप .

📌 हॉटेल्स अनेक प्रकारची असू शकतात , अगदी बाजारू खाणावळी पासुन सेवन स्टार रेस्टॉरंट पर्यंत , तर यातलाच एक प्रकार आज बघूया !

📌#Single_dish_meal : भूकेल्या पोटाला दोन घास पाहिजेत , ते भेटले कि आत्मा शांत होतो , मग ताम झाम नसला तरी चाललय , फॅन्सी फर्निचर नसलं तरी चालतय , असेच अनेक स्टॉल्स आपण आपल्या अवतीभोवती बघतो जे फारच भन्नाट चालतात ,
फक्त मिसळ स्टॉल , पोहे सेंटर , बिर्याणी हाऊस , कचोरी वाले , वडापाव सेंटर , only पावभाजी, ऑम्लेट स्टॉल , मच्छी फ्राय वाले , किंवा स्पेशल चिकन वगैरे देणारे ! अशा लोकांवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडलेल्या कथा मोठया चवीने सांगितल्या आणि ऐकल्या जातात , तर एवढे यशस्वी होऊ शकतात का हे प्रकार ?आणि त्याची कारणं काय असू शकतात .

📌#Hungry_Crowd:

आपला देश हा लोकांनी ठासून ठासून भरलेला ज्याला densely crowded म्हणता येईल असा देश आहे , आजही आपल्याकडची मानसिकता ही कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कॅलरीज मिळवण्याची आहे , त्यामुळे तळलेले पदार्थ , रस्त्यावर तयार झालेल्या पदार्थांना मागणी आहेच , कारण थोडाफार श्रीमंताचा टक्का सोडला तर 90- 95% जनतेला असं खायला काही प्रॉब्लेम नाहीये ! त्यामुळेच ही इंडस्ट्री वरचेवर वाढतच आहे .

📌#Low_Operational_Cost:

जेंव्हा आपल्याला खूप सारे पदार्थ बनवून विकायचे असतात तेंव्हा त्याचा खर्चही वाढतोच , एक्सट्रा कारागीर आला , एकस्ट्रा कच्चं मटेरियल , एक्स्ट्रा गॅस खर्च, आगाऊची मेहनत आणि दिवसाच्या शेवटी फेकून दयावं लागणारं नुकसान पण जरा जास्तच असतं .

#Unique_Taste_attainment:

कर्नल सँडर्स ने चिकनचा फक्त लेगपीस तळण्याऐवजी , सगळा स्वयंपाकच करून बघीतला असता तर KFC आज आलं असतं का ? त्यामुळे एकच आयटम निवडून फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करा ! त्याच्या क्वालिटीतच एक्सपर्ट बना ! इतकं कि कोणी आपला हातच धरला नाही पाहिजे ! इथे आपल्याला प्रयोग करायला स्वातंत्र्य असते त्यामुळे आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू शकतो .

📌 #Learn_Basic_and_Launch:

जेंव्हा असं काही सुरू करायचयं तेंव्हा पहिल्या दिवसापासूनच क्लासिक चव असली पाहिजे असं काहीच नाही ! अगदी सामान्य आणि बेसिक गोष्टी जरी आल्या तरी सुरुवात होऊ शकते , तसंच करायचं कोणत्याही गोष्टीत मास्टरी मिळवायला वेळ लागतो तोवर कुठे वाट बघता ?, हरीचं नाव घ्यायचं आणि चालु करुन दयायचं !

📌 #Dont_go_Cheap:

खरंच नाव आणि पैसा कमवायचा असेल तर हलक्या क्वालिटीचा माल वापरूच नका ! जास्तीत जास्त क्वालिटी दया ! कारण पैसा एक क्षण विचार करायला लावतो पण लोकं क्वालिटीला कायम लक्षात ठेवतात , आजपर्यंत तुम्ही आठवा सर्वात बेश्ट भेळ कुठे खाल्ली होती , लगेच आठवेल !

📌 #Volume_Sale:

जास्तीत जास्त वन डीश मिल हॉटेलमध्ये 30 ते 40 रुपयांपर्यंतचा एक पदार्थ असतो जे कि ओक्के आहे , हा आकडा फार जास्त नाही त्यामुळे अशा गाडयांवर , फुड ट्रक वर कायम गर्दी असते ज्यामुळे विक्रीचा volume वाढतो आणि एकदा का विक्रीचा आकडा वाढला कि कमी प्रॉफीटवर सुद्धा काम करणे परवडतं .

📌 #Look_for_USP:

पैसा तो पर्यंत येत नाही, जोवर आपली एखादी खासियत बनत नाही , त्यामुळे काही होऊ दे पण आपला एक unique selling preposition असलाच पाहिजे , अशी युनिक बाब आपल्याला स्पर्धकापासुन वेगळं करते , मग ती एखादी चटणी असू दे किंवा सॉस , गरमागरम देणे असू दे कि मसाले .
एखादया विशिष्ट व्यक्तीच्या हातचे नुडल्स खायचेत म्हणुन पोरं 30-40 km प्रवास करून पण जातात .

📌 #Low_operational_Cost:

अशा प्रकारचे फुड पौईट एक सिंगल व्यक्ती सुद्धा सुरू करू शकतो कारण पदार्थ एकच बनवायचंय आणि विकायचाय त्यामुळे झंझट नसते , कामगाराचा खर्च अंगावर पडत नाही !

📌 #mobility_and_Location :

असे फक्त एक पदार्थ विकणारे हॉटेल्स शक्यतो हातगाडा किंवा फूडट्रक असतात, फक्त एकदाच प्रॉपर लोकेशन शोधून , कागदपत्रे नीट घेऊन चालु केलं की नंतर टेन्शन रहात नाही,

📌#chances_Of_Growth:

मार्केटमध्ये जेवढया काही फ्रँचायजीज आहेत त्यांच्याकडे एकदा नीट बघा ! सगळ्या फ्रँचायजीज सिंगल डिश मीलमॉडेल मधल्याच आहेत !
मिसळ,वडापाव,भेळ ,बिर्याणी,काहीपण एकच ……………….
आम्ही सगळंच विकतो म्हणणाऱ्याची फ्रँचायजी होत नाही , त्याला आयुष्यभर स्वतःच विकणंय, पण जो व्यक्ती एका कोणत्याही एका प्रकारात मास्टर बनला कि पुन्हा मागे वळून बघायची गरजच पडत नाही , कारण पुन्हा फक्त एक्सपरटाईजचे पैसे मिळतात ते पण खूप ……

म्हणून .. रस्त्यावर उतरून,एकच आयटम घेऊन धंदा चालु करावा लागला तरी वाईट वाटून घेऊ नका,याच्यातच चांदी आहे .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा
©निलेश काळे ,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट ‘
9518950764 .

Office: 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *