फेसबुकग्रुप वरून व्यवसाय वाढवायचाय?मग पुढील गोष्टी वापरा

फेसबुकग्रुप वरून व्यवसाय वाढवायचाय?मग पुढील गोष्टी वापरा.

www.nileshkale.com

📌 सोशल मीडिया नेटवर्कचा वापर व्यवसाय वाढीसाठी करणे ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही,आजवर कित्येक छोटे-छोटे स्टार्टअप्स फक्त,आणि फक्त सोशल मीडियाचा तुफानी वापर केल्यामुळे मोठे झालेले आपण बघू शकतो.

ज्या गोष्टींना आपण सोशल मीडिया म्हणतो( जसं Twitter,Facebook , Whatsapp, instagram,) या गोष्टी सुद्धा एकेकाळी छोटेसे स्टार्ट होते,पण त्यांनी स्वतःला मोठे केलं आणि त्यांचा वापर करून आज इतर लोक मोठे होत आहेत.

फेसबुक हे त्यापैकी सगळ्यात प्रमुख आणि मोठं असणार सोशल मीडिया नेटवर्क आहे,

फेसबूकवर अनेक ग्रुप असतात एक फेसबुक ग्रुप लाखो लोकांचा असू शकतो आणि अशाप्रकारे सोशल मीडियावर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून एक इकोसिस्टीम तयार झालेली असते.

वैयक्तिकपणे मी साधारण दहा ते बारा ग्रुपचा ऍडमिन आणि मॉडरेटर असल्यामुळे या ग्रुप वर अनेक छोटेउद्योग मोठे झालेले स्वतःच्या डोळ्याने बघितलेले आहेत.

तर आपण देखील या टिप्स वापरा.

1) शक्यतो भरपूर मेंबर संख्या असणारे ग्रुप सगळ्यात अगोदर जॉईन करून घ्यावेत,

2)ग्रुपला जॉईन केल्या केल्या लगेचच जाहिरातींचा भडिमार करू नये अगोदर ग्रुपचे सगळे नियम कायदे समजून घ्यावेत ग्रुप कसा चालतो? मॉडरेटर, ॲडमिन यांनी कोणत्या प्रकारचे नियम घालून दिलेले आहेत याचा अभ्यास करावा.

3)सुरुवातीला इतर लोकांच्या जाहिरातींना लाईक आणि चांगल्या कमेंट केल्या की लोक ऑफ रिसिप्रोसिटीच्या नियमानुसार जेव्हा आपली जाहिरात जाईल तेव्हा त्या ग्रुपमध्ये आपल्या जाहिरातीला देखील लाईक आणि कमेंट यायला सुरुवात होऊ शकतात.

4)शक्यतो इतर कोणाचाही जाहिरातीचा कमेंटमध्ये आपली जाहिरात करू नये.

5)ग्रुपचे ॲडमिन आणि मॉडरेटर यांच्याशी मेसेंजरवर संपर्क साधता आला तर ते उत्तम असतं त्यामुळे आपली जाहिरात अप्रूवल होण्यासाठी मदत मिळू शकते,
आपण चांगल्या influencer लोकांशी फेसबूक मैत्री करुन त्यांच्या संपर्कात रहावं,याचा फायदा होतो.

6) ग्रुपमध्ये ऍक्टीव रहावं,एकदा का आपण त्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह मेंबर मेंबर म्हणून सहभागी झालो कि ईतरांच्या पोस्टला लाईक करा आणि सातत्याने चांगल्या कमेंट करत राहिलो की आपली पण जाहिरात सहजपणे चालायला सुरू होते, मग त्या ग्रुपमध्ये जर आपल्या व्यवसायाविषयी कधी कोणता प्रश्न विचारला गेला, तर इतर लोक सुद्धा आपल्या व्यवसायाचा रेफरन्स देऊन आपल्याला ग्राहक मिळवून देऊ शकतात.

7) इतरांचा रेफरन्स द्यायला चालु करावं याने आपली ईज्जत वाढते.

8) शक्यतो आपली प्रोफाईल ओरिजनल असावी,फेक प्रोफाईलवरून केल्या जाणाऱ्या जाहिरातींना लोक रिस्पॉन्स देत नाहीत, दुसरं महत्वाचं विक्रेत्याची प्रोफाईल ओपन असावी, आपल्या फ्रेंडलिस्ट मध्ये मोक्कार लोकं नसावेत !

9) आपल्याला फारसे माहित नसलेले प्रॉडक्ट विकत बसू नये, लोकांची फसवणूक होईल अशी उत्पादने पण विकू नयेत, “मला माझे पैसे भेटण्याशी मतलब” या विचाराने काहीही पोस्ट कराल तर उद्या कोणीही विचारत नाही.

10) ग्रुपमध्ये सभ्य रहावे, विशेषतः महिलांशी संपर्क करताना, कारण?फेसबुक पोस्ट आणि कमेंटसला इलेक्ट्रॉनीक इवीडन्स म्हणुन एखादया खटल्यात वापरता येतं, सरळ सरळ केस पडू शकते.

बघा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण सोशली वागणे अपेक्षित असतं ! हे व्यवसाय वाढीचं सुंदर साधन आहे.

मुळात मानवी स्वभावच एकमेकांना समजून घेऊन मदत करण्याचा असल्यामुळे,एखाद्या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून देखील आपण फार मोठी उलाढाल करू शकतो.

अशाप्रकारे फेसबुक ग्रुपवर जाहिराती करण्यासाठी आपण चांगलं कन्टेन्ट/ चांगल्या प्रतीचा इमेजेस /चांगल्या क्वालिटीचे शोर्ट व्हिडिओ याचा सुबक वापर केला तर व्यवसाय नक्की वाढतो.

शेवटी,आपण या ग्रुपचा वापर फ्री मध्ये करू शकतो, त्यामुळे येथे आपल्यातील उथळपणा समोर येऊ देऊच नये ! ग्रुप मध्ये महिला असतील ?तर अतिशय सभ्यपणे इतर कमेंट कराव्या( हे डबल सांगतोय ),अशाप्रकारे सभ्यतेचे प्रदर्शन करून आणि फक्त आणि फक्त आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी लक्षात देऊन आपण या सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो.

व्यवसायवाढीसाठी शुभेच्छा.

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंदपार्क,औंध,पुणे.
9518950764

आपल्याला पर्सनल बिझनेस कोचिंग हवीये तर संपर्क करा :
ओमकेश मुंडे सर : 9146101663.

तेंव्हा या प्लॅटफॉर्मला व्यवस्थित वापरा फायदा होईल.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *