फ्रेंचायजी घेण्या अगोदर किंवा सुरू करताना या बाबी लक्षात घ्या !

773 Views

#Business_Coaching

#Franchise_Model_ची_पाच_तत्वे.

©निलेश काळे.

📌 आजकाल व्यवसायिक वातावरणामध्ये फ्रेंचायजी मोडेल बिझनेस हा अतिशय चांगला बिझनेस मानला जातो.

ज्या व्यक्तीकडे पैसा आहे /जागा आहे/ मनुष्यबळ आहे आणि काही तरी करण्याची धमक आहे ,अशा व्यक्तीसाठी एखाद्या व्यवसायाची फ्रॅंचाईजी घेणे आणि तो बिजनेस चालवणे हे सगळ्यात सोपं मानलं जातं.

आजकाल जवळपास सगळ्या व्यवसायामध्ये फ्रेंचाइजी मॉडेल बिजनेस चालवले जातात, मग तो फुड व्यवसाय असो /सर्विसइंडस्ट्री असो / शिक्षणसंस्था असो किंवा अन्य कोणताही व्यवसाय .

फ्रॅंचाईजी मॉडेल बिजनेस प्रत्येक प्रकारात करता येतो.

समजा आपण एखाद्या व्यवसायात आहात आणि आपल्याला स्वतःच्या बिझनेसची फ्रॅंचाईजी मॉडेल करायचा आहे,तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही बाबी खालील लेखात आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केला आहे ,या गोष्टी फ्रेंचाइजी मॉडेलचे बेसिक नियम मानल्या जातात, तेव्हा आपल्या व्यवसायाला मॉडेलमध्ये रूपांतरित करण्याअगोदर हे नियम वाचा आणि त्याचा अवलंब करा,,,,म्हणजे आपल्या व्यवसायिक मॉडेल…. एक यशस्वी मॉडेल म्हणून गणल्या जाईल, नाहीतर फ्लॉप जाणाऱ्या फ्रँचायजीची कमतरता नाही !

बघा……..फ्रॅंचाईजी मॉडेलमध्ये आपल्याला असं दिसतं की काही नवीन व्यावसायिक फक्त सारखा युनिफॉर्म सारखा फर्नीचर सारखे डिझाईन एवढं करूनच माझा बिजनेस फ्रॅंचाईजी मॉडेल मध्ये आलाय असं मानतात, पण ते खरं नाही…. खालील मुद्यांचा अभ्यास करा आणि ते वापरा

📌(1 ) #Consistant_Value_देणे_महत्वाचे_आहे.

McDonald’s ची कंपनी फ्रॅंचाईजी बिझनेस मोडेल मधली दादा कंपनी म्हणून ओळखली जाते,आपण जगातल्या कुठल्याही मॅकडॉनल्ड्स मध्ये जा ,काही लोकल पदार्थ जर सोडले ,तर बाकी सगळ्या पदार्थांची चव सारखे लागेल.

त्यांची सर्विस करण्याची पद्धत,ऑर्डर घेण्याची ऑर्डर डिलिव्हर करण्याची पद्धत ,सगळीकडे सारखी दिसेल, म्हणजे? इथे आपल्याला असं लक्षात येतं की फ्रॅंचाईजी बिझनेस मॉडेलमध्ये “सातत्य” या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, हाच मूळमंत्र आहे.

आपण आपल्या ग्राहकांना एक सारखी व्हॅल्यू दरवेळी /दर ठिकाणी देऊ शकलो तर आपले बिझनेस मॉडेल यशस्वी व्हायला हरकत नाही.

📌 (2) #It_Should_be_operated_by_lowest_Skill_People:

फ्रँचायजी बिझनेस मॉडेलमध्ये हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे कि यात इतकी सुलभता असावी, सगळ्या सिस्टीम इतक्या सोपे असाव्यात की, अगदी नवख्या व्यक्तीला सुद्धा तो व्यवसाय चालवायला अवघड गेलं नाही पाहिजे.

फ्रॅंचाईजी बिझनेस मोडेल ची हीच सगळ्यात मोठी विशेषता आहे की त्यामध्ये स्किलफुल वर्कर लागत नाहीत.

यामुळे पैसा वाचतो, श्रम वाचतात आणि सर्वसाधारण व्यक्ती सुद्धा ते हाताळू शकते.

आपण बघत असाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले मिळतात, आता सगळ्या मसाल्यामध्ये बघायला गेलं तर घटक पदार्थ सारखेच असतात, परंतु पावभाजी /पाणीपुरी/ छोले / बिर्याणी वगैरे मसाले, या कंपन्यांनी वेगवेगळे यासाठीच केले आहेत .

कारण???? घरातल्या कोणत्याही व्यक्तीला तो पदार्थ बनवायला सोपे जावं,त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्किल लागायची गरज पडू नये, रेडी टू कूक पदार्थ आलेच या साठी !

📌 (3) #Everything_Shold_be_documented:

हिरो /बजाज /रॉयल एनफिल्ड या सारख्या कंपन्यांमध्ये आपण जर बघितलं तर एकच असेंबली लाईन असते.

त्या असेम्ब्ली लाईनवर तेच तेच वर्कर असतात, परंतु दरवेळी असेंबल करायला येणारं वाहनाचे मॉडेल वेगवेगळं असु शकतं, तरीही ते कामगार अतिशय सुलभरीत्या ती गोष्ट करू शकतात.

याचं सर्वात मोठं कारण असं आहे की ऍक्च्युअल काम त्यांच्या हातात येण्याअगोदर, त्या कामाची प्रोसेस/ त्याचे डॉक्युमेंटेशन या कामगारांच्या समोर येतं आणि मग ते डॉक्युमेंट बघून त्यांना काम करायचं असतं.

याचा अर्थ असा की जर आपण आपला व्यवसाय फ्रँचायजी मॉडेलमध्ये करणार असू ,तर प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणे आणि त्या नोंदीनुसार सगळीकडे ती सिस्टीम फॉलो करणे हे बंधनकारक आहे.

त्यामुळे या मॉडेलसाठी छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करायला घ्या,डिटेल्स ठेवा आणि ते डॉक्युमेंटेशन पुढच्या वेळेला काटेकोरपणे फॉलो करा.

📌 (4) #Uniform_Persistant_Service_to_all_customers:

एखाद्या फ्रॅंचाईजी मॉडेल मध्ये जेव्हा आपण खरेदी करायला जातो त्यावेळेला त्या व्यवसायाची विशिष्ट पद्धत चव किंवा गुण आपल्याला माहित असते आणि एक ग्राहक म्हणून आपण त्या बिजनेस मॉडेल कडून सेम प्रकारच्या सर्विसची अपेक्षा करतो

म्हणून करता ही गोष्ट लक्षात ठेवा की, आपला ग्राहक कोणत्याही आउटलेट वर जरी गेला ,तरी त्याला एकसमान सेवा/ एकसमान गुणवत्ता आणि समान दर्जा मिळाला पाहिजे /आणि हे हे बघणं फ्रॅंचायजीच्या मालकाचं काम आहे, याचं कारण त्याने बिझनेसमध्ये नाही,तर बिझनेस

📌 (5) #Same_Dress_and_colour_code:

वर आपण याची चर्चा केली आहे की, फक्त ड्रेसकोड सारखा करून फ्रँचायझी यशस्वी होत नसतात, मान्य ! पण तरीही ही बाब बेसीक आणि महत्त्वाची आहे की आपण आपल्या व्यवसायाशी संबंधित कलरस्कीम,आपलं डिजाइन,लोगो ,आपलं फर्निचर स्टाईल हे समान ठेवायला हवं.

एक फ्रेंचायजी व्यवसायाला ओळख म्हणून तर ही बाब सर्वात जास्त महत्त्वाची आहे, कारण? कोणत्याही व्यवसायाची ओळख हे त्या व्यवसायाचं बाह्यरूप दाखवतं असतात ,

एकसमान लेबल असल्यामुळे तो प्रॉडक्ट त्याच कंपनीचा आहे हे ओळखणं सोपं जातं, त्यामुळे ही गोष्ट तर अतिशय महत्त्वाची आहेच,त्याला पर्याय नाही.

वरील काही मुद्दे हे कोणत्याही प्रकारच्या फ्रॅंचाईजी मॉडेल व्यवसायासाठी मुलभूत मुद्दे आहेत, याचा वापर करा आणि आपला व्यवसाय फ्रॅंचायजी मॉडेल म्हणून यशस्वी होऊ शकतो याची खात्री बाळगा.

आपल्याला व्यवसायासाठी शुभेच्छा !

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स.
आनंदपार्क,औंध ,पुणे.
9518950764.

आपल्या व्यवसायासाठी, आमची मदत लागत असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधा.

श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *