ब्रिटिशांनी अर्ध्या जगावर राज्य करून सुद्धा,अमेरिकेचा डॉलर ही जागतिक करंसी कशी झाली?

ब्रिटिशांनी अर्ध्या जगावर राज्य केलं,तरिहीअमेरिकेचा डॉलर ही ग्लोबल करंसी कशी काय झाली?

प्रत्येक देशाला त्याची करंसी प्रिय असते, मध्यंतरी चीनने डॉलरच्या वापराला बंदी घातली आणि त्याच्या युआनचाच वापर व्यापारासाठी करण्याचा निर्णय घेतला

पण खरंचच चालेल का हे?

📌 मग दुसरा प्रश्न,आपल्या भारतात सगळे व्यापार रूपयात होत असताना मग बाहेरुन काहीही import करण्यासाठी डॉलरच का लागतात ? जगात सगळे देश एकमेकांशी व्यवहार करण्यासाठी डॉलरच का वापरतात ? ब्रिटीशांनी अर्ध्या जगावर राज्य करून सुद्धा त्यांच्या पौंडला हे स्थान का नाहीये?
डॉलर इतका महत्वाचा का आहे ?कि ज्याचा साठा करावा लागतो ज्याला आपण विदेशी चलन गंगाजळी ( foreign Reserve Currency ) म्हणतो .

याचं उत्तर शोधण्यासाठी चला जरा इतिहासात जाऊ , आपल्याला हे माहितय कि एकेकाळी इंग्लंडचं अर्ध्या पृथ्वीवर राज्य होतं,त्यांचं चलन पाऊंड होतं , पण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये इतका खर्च झाला कि जगातल्या 70% देशाची अर्थव्यवस्था मोडीत निघाली .

📌या वेळी अमेरिकेचं लक असं कि , एवढया महायुद्ध काळात अमेरिकेच्या जमिनीवर कधीच हल्ला झाला नाही , तिथे त्यांचं उत्पादन नियमित सुरू राहिलं , आणि ते इतर सगळ्या देशांना सोन्याच्या बदल्यात हत्यारं , वाहने आणि इतर सामान पुरवत राहीले .

📌याचा परिणाम असा झाला कि , पृथ्वीवर जेवढं सोनं उपलब्ध आहे त्याच्या 75% सोने अमेरिकेकडे जमा झालं ! आजही आहे !

📌 ज्यावेळी युद्ध संपलं , कित्येक देश बेचिराख झाले , त्यांची अर्थव्यवस्था कोलमडली , त्यांना परत कसं उभं करायचं ? या प्रश्नाचं उत्तरं शोधण्यासाठी , सन 1944 मध्ये अमेरिकेच्या हॅम्पशायर मध्ये 144 देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली ,

📌या बैठकीतच World Bank , International Monetary fund (IMF) ची स्थापना करण्यात आली , ज्यामुळे सदस्य देशांना कर्ज देऊन उभं करता येईल अशी कल्पना होती .

📌 मग मुद्दा आला कि कशा स्वरूपात आणि कोणत्या चलनात कर्ज दयायचं ?

📌तर त्यावेळी सगळ्यात स्थिर आणि मजबूत अर्थव्यवस्था अमेरिकेची होती , त्यामुळे अमेरिकेचे डॉलर हे चलन सगळ्या जगातील देशांची रिजर्व करन्सी म्हणून वापरायचे या निर्णयाला सगळे देश तयार झाले !

पण दोन अटी होत्या
1) अमेरिका प्रचंड प्रमाणात डॉलर छापणार नाही ,
2) जेंव्हा कधी कोणता देश अमेरिकेला त्याचे डॉलर परत करेल तेंव्हा त्याला त्या डॉलरच्या किंमतीचे सोने परत देईल … या कराराला …
“BRETTON WOODS SYSTEM म्हणतात !

अशा प्रकारे डॉलरला सोन्याच्या मूल्याशी लिंक करून ,, देशा देशातील व्यवहार डॉलर मध्ये चालू झाले , अशा प्रकारे डॉलरला सोन्याबरोबर लिंक करण्याला Gold Standard म्हणतात .

📌त्यामुळे झालं असं कि एकूण छापलेल्या डॉलरच्या नोटांपैकी 65% नोटा अमेरिकेच्या बाहेरच साठून राहू लागल्या .

📌 सन 1970 पर्यंत सगळं ठीक चालू होतं , पण त्यानंतर अमेरिकेचं आणि व्हिएतनामचं यूद्ध पेटलं.

📌 आता अमेरिका बाहेरच्या देशांना डॉलर देऊन सामान इंपोर्ट करू लागली , आणि मग इतर देशांना शंका आली कि , अमेरिका इतर देशांबरोबर धोका करायला लागलीये का काय ?

📌 त्यात अमेरिकेने वर्ल्ड बँकेकडून त्याच्या नोटा छापणाऱ्या प्रेसचं ऑडीट करून घ्यायला नकार दिला ! आणि मग फ्रान्सने … ” दुध का दुध पाणी का पाणी ” करण्यासाठी , एका जहाजात डॉलरच्या पेटया भरल्या आणि त्याच्या बदल्यात सोनं घेण्यासाठी अमेरिकेकडे जायला निघाले .

📌 हा काळ होता 1975 , जगाची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या डॉलरला बांधल्या गेल्याने आणि वर्ल्ड बँक तसेच IMF ला देणगी देणाऱ्यात अमेरिकाच सगळयात पुढे असल्याने , अमेरिका मजबूत होती , त्यावेळचे त्यांचे राष्ट्रपती Richard Nixon यांनी 3 April 1975 ला जाहीर केले , कि इथून पुढे Bretton Woods system आम्ही मानणार नाही , डॉलरच्या बदल्यात सोने मिळणार नाही.

📌 झालं का सही ? बँकेचा मॅनेजरच कॅशचा मालक होऊन बसला !

📌 जगातल्या इतर देशांकडे डॉलरचा प्रचंड साठा रिजर्व करन्सीत होता , त्याचं मूल्य तर शून्य झालं ना ?

📌 त्याच्या पुढे जाऊन अमेरिकेने सौदी अरेबीया बरोबऱ एक सौदा केला कि , तुम्ही इतर देशांकडून फक्त डॉलर घेऊन पेट्रोल दयायचं , त्या बदल्यात अमेरिका त्यांचं संरक्षण करेल !

📌 सौदी अरेबिया ची पण मजबूरी होती म्हणून त्यांनी हा करार मान्य केला ! आणि अशा प्रकारे अमेरिकेच्या एका चालीमुळे “पेट्रो-डॉलरचा ” जन्म झाला आणि डॉलरचं महत्व वाढलं ,

📌 पुढे अमेरिकेने सुद्धा IMF बरोबर करार करून त्यांच्या करन्सी प्रिंटींग प्रेसचं ऑडीट करवून घेतलं , आणि आम्ही विश्वासार्ह आहोत हे सिद्ध केलं .

📌 त्यावेळेपासून आजपर्यंत ,,,
जगातले इतर सगळे देश एकमेकांबरोबर आर्थिक व्यवहार करताना डॉलर मध्येच करतात , स्वतःच्या करन्सीत नाही !

📌 खरं तर युरो,पाऊंड यांची व्हॅल्यू डॉलरपेक्षा जास्त असूनही जगातले फक्त 20% देशच त्यात व्यवहार करतात .

📌 सध्या चीनचा प्रयत्न असा आहे कि त्यांच्या युआन ला जगाची रिजर्व करन्सी बनवावे,पण ते सध्या तरी शक्य होईल असे वाटत नाही कारण अमेरिकेच्या डॉलरला आणि अर्थव्यवस्थेला पूर्ण जगात जास्त स्थिर मानलं जातं .

📌मध्यंतरी रशिया,चीन आणि युरोपीय देशांनी … “बीटकॉईन ” सारखी एखादी डॉलरला वगळून एखादी वेगळी रिजर्व करन्सी असावी असा प्रयत्न केला,पण ते शक्य झालं नाही !

📌 आजही अमेरिकन डॉलरलाच तो मान आहे,उद्या बघूया कोण ठरतोय नवा हिरो !

📌 माहिती कशी वाटली ? कमेंटमध्ये सांगा ! आणि अशाच प्रकारे बिझनेस रिलेटेड कन्टेन्ट वाचण्यासाठी अiमचे फेसबूक पेज लाईक करा !

लिंक खाली आहे .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

© निलेश काळे .
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663 .

लेख आवडल्यास नावा सहित शेअर करा !

Previous Post Next Post

2 thoughts on “ब्रिटिशांनी अर्ध्या जगावर राज्य करून सुद्धा,अमेरिकेचा डॉलर ही जागतिक करंसी कशी झाली?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *