ब्रॅन्डनेम असं निवडावं,6 वैज्ञानिक प्रकार .

ब्रँड नेम कसं असावं?

दोन दिवसापूर्वी एका उद्योजकाचा फोन आला .. “सरबैग्जचे उत्पादन चालू केलेय प्रमोशन कसं करू? ” बॅग्ज अगदी उत्तम क्वालिटीच्या बनवलेल्या,सुंदर आणि आधुनिक डिजाईनच्या,पण मोठ्ठा प्रॉब्लेम प्रत्येकच बॅग आणि सॅक वर दिसला ,,नाव_Redmi
सहज म्हणून,त्याला विचारलं का ठेवलस हे नाव ? त्याचं उत्तर ,, चलती आहे म्हणून .
कप्पाळ,
इथे तर चुकतो आपण,त्या मोबाईल कंपनीचे नाव जशास तसे उचलून , भामटेगिरी करून आपल्या प्रॉडक्टसाठी वापरणे हा चोट्टेपणा आहे,तसेच हा कायद्याने गुन्हा ठरतो , बरं हे सगळं करून काय साध्य होईल ? तर काहीच नाही , मेहनत आपण करायची आणि नाव त्या कंपनीचं टाकायचं , त्याला मोठं करायचं म्हणजे तेल ही गेले तूपही गेले,हाती आले धुपाटणे .
त्याकरिताच हा प्रपंच .
समजून घ्या ब्रॅंडिंगची काही तत्वे .
Jonathan Bell या ब्रँडींग एक्सपर्ट ने ब्रॅंडींग चे सात विभागात वर्गीकरण केले आहे .

जगातले सर्व जे काही ब्रॅण्डस आहेत , ते यापैकीच कुठल्या तरी कॅटेगिरीत येतात

1) Eponymius : ही कॅटेगिरी भारतीयांची आवsती कॅटेगरी आहे ,
आपले नाव , आडनाव , अथवा संपूर्ण नाव यालाच ब्रँड नेम करतात . जसं
TATA,
KESARI,
Lakhani,
वामन हरी पेठे,
किर्लोस्कर,
Adidas,
Godrej,
वगैरे,अशी पावलं उचलायला फार हिम्मत लागते,कारण प्रॉडक्ट अथवा सर्विस जर खराब निघाली तर डायरेक्ट नाव खराब होते,
म्हणून या कॅटेगिरीत येणारे ब्रॅण्डस हे उच्च मुल्ये बाळगणारे असतात . आणि शक्यतो याची कॉपी करता येत नाही . पण शेवटी कॉपी करणारे कशाचीही करतात म्हणा पण ही कॅटेगिरी सर्वोत्तम मानली जाते,म्हणून तर कित्येक मोटीवेशनल स्पीकर बघा,त्याचे फेसबूक पेज,वेब साईट,अथवा युट्युब चॅनेल त्यांच्या पूर्ण नावानिशी असते , जसे विवेक बिंद्रा , संदीप माहेश्वरी , डॉ . उज्जवल पटनी
त्यामुळे ही कैटेगिरी वैयक्तीक पणे मी सुचवतो,माझे फेसबुक पेज असेच येते Nilesh Kale’s Udyogniti . पण हे ब्रँडनेम पुढील कॅटेगिरीत येते .

2) Descriptive :

या कॅटेगिरीतील ब्रँडनेमचे दोन पार्टस असतात,कोणाचे आहे?आणि काय उद्योग आहे .
जसे
indian Airlines,
जोशी वडेवाले,
नांदगावकर सराफ,
अयुबभाई चाबीवाले,
आबांचा ढाबा,
हा प्रकार पण उत्तम,यात पण पर्सनलायजेशन करता येते,म्हणून तर कधी मार्केट यार्ड मध्ये जा , अशीच नावे दिसतील.

3) Acronymes :

हा जरा मॉडर्न प्रकार . यामध्ये मोठया नावांची फक्त आद्याक्षरे घेऊनच ब्रँण्ड नेम बनवतात,
जसे
DSK,L&T,AT&T,KFC, GE .
या प्रकारचे ब्रॅण्डींग पण प्रभावी आहे , पण प्रमोशन फारच मोठया प्रमाणावर करावे लागते तेंव्हा ब्रॅण्ड व्हायरल होतो .

4) suggestive :

या प्रकारात ब्रॅण्डच सांगतो,त्याच्या वैशिष्टयांना म्हणजे विशेष काही सांगायची गरजच नाही.
जसे Ray-Ban (या ब्रॅण्डचा गॉगल सूर्याची किरणे चांगली अडवतो) , Facebook (दोन चेहऱ्यांना जोडतो) वगैरे वगैरे ,

5) Associative :

या प्रकारात त्या कंपनीचे अथवा ब्रॅण्डची फिलॉसॉफी आणि निसर्गातली एखादया बाबीची फिलॉसॉफी एकत्र करून नाव निवडलेलं असतं .
जसं Amazon याच्या ब्रॅण्ड नेमचं नाव ऍमेझॉन या नदीवरून घेतलेलं आहे,जी प्रचंड मोठी नदी आहे,परत यांच्या लोगोत A पासून Z पर्यंत एक बाण दाखवतात,तो सर्व वस्तू मिळतील असे दाखवतो .

6) NonEnglish :

ब्रॅण्डस म्हटलं कि,इंग्लिश मध्येच असावं असं काही नाही,
इतर भाषांमधील शब्दांचा वापर पण ब्रांड म्हणून करतात,

SAMSUNG,LEGO,Hitachi , Suzuki,Huwai,आर्शिवाद पतंजली,हे सगळे नॉन इंग्लीश ब्रॅण्ड ता आहेत .

Abstract : काही ब्रॅण्ड नेम अक्षरशः कसलाच अर्थ नसलेले असतात,जसे Rolex,Kodak,Rin या प्रकारच्या ब्रॅण्ड नेम ला कसलाही अर्थ नसतो , पण ते चालतात .

वरिल बाबी लक्षात ठेऊन,ब्रॅण्डनेम बनवा .
अजून काही मुद्दे पण अभ्यासा,

1) आपण ठेवतोय त्या ब्रॅण्ड नेम चा कोणत्याही भाषेत विचित्र,अश्लील , अर्थ निघत नसावा.

2) आपण ठरवतोय ते नाव अगोदर कोणीही रजिस्टर केलेले नसावे, दुसऱ्याचे ब्रॅण्ड नेम वापरणे महागात पडू शकते.

3) लोगो हा फार महत्वाचा घटक असतो,तो ब्रॅण्ड नेम बरोबर मॅच होत असावा.

4) शक्यतो ब्रॅण्ड नेम रजिस्टर करून घ्यावे,

5) टॅगलाईन हा प्रकार फार प्रसिद्ध होतोय,ती पण ब्रॅण्डनेमला पूरक असावी .

अशा प्रकारे ब्रॅण्डींग नीट केल्यास आपला ब्रॅण्ड प्रसिद्ध होऊ शकतो .

एवढं सगळा विचार करून आपल्याला नामकरण करावं लागतं, आणि लोकांना काय वाटतं ?
“नावात काय आहे” ?

Happy Branding

लेख आवडला तर शेअर करा .

आमचे फेसबुक पेज लाईक करा

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
office :9146101663.

Previous Post Next Post

One thought on “ब्रॅन्डनेम असं निवडावं,6 वैज्ञानिक प्रकार .

  1. खुप छान माहिती दिली सर आपण आपल्या लेख मधुन मी व्यवसाय सुरु करत आहे
    आणि ब्रँड नेम मुळे थोडी अडचण जात होती.
    पण आपण लिहिलेल्या लेखा मधून बरच कन्फ्युजन दूर झाल.
    धन्यवाद…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *