ब्रॅन्ड ऍम्बेसिडर घ्यायला परवडत नाहीत?तर ब्रॅन्ड मॅनेजर्स वापरा ,फायदयात रहाल! कसे? वाचा !

529 Views

ब्रॅन्ड ऍम्बेसिडर घ्यायला परवडत नाही?मग Brand Managers चा वापर करा: फायदयात रहाल.

मार्केटमध्ये अनेक ब्रॅन्डस स्वतःच्या प्रमोशनसाठी खास व्यक्ती गटांना निमंत्रीत करतात आणि त्यांचे मार्फत आपले प्रमोशन करवून घेतात.

त्यामध्ये एका ठिकाणी असं सांगितलं आहे, की xxxxबुलने सुरुवातीला आपली विक्री वाढवायला चालू केली, त्या क्षणी त्यांनी प्रत्येक कॉलेजमधील लोकप्रिय विद्यार्थ्यांना गाठलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या मार्फत त्या कॉलेजमध्ये xxxxबुल ड्रिंकची सवय लावायचा प्रयत्न केला ,बघा आजकाल ब्रँडअँबेसिडर अपॉईंट करणे आणि त्यांच्या करवी एडवरर्टाइज करून घेणे हा ट्रेंड मार्केटमध्ये चालू आहे , पण हा प्रकार जरा जास्त महागडा आहे.

हे असे सेलिब्रिटी घेण्याऐवजी काही अशा सामान्य लोकांना गाठायचं, ज्यांचा मार्केटमध्ये थोडाबहुत प्रभाव आहे, आणि त्यांच्याकरवी मार्केटमध्ये आपली जाहिरात करून घेतली , तर ते जरा जास्त परवडत.

अशाप्रकारे कमी पैशांमध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना अपॉईंट करू शकतो.

📌 ही मंडळी त्यांचा प्रभाव वापरून आपल्यासाठी काम करू शकतात मराठी सध्या याचा वापर मार्केट मध्ये बऱ्याच क्षेत्रात चालू आहे या गोष्टी आपल्याला कधी लक्षात येतात किंवा नजरचुकीने राहून जातात.

📌 समजा एखाद्या व्यक्तीने धार्मिक यात्रा चालू करायचं ठरवलं ,आता एकटा व्यक्ती किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो ?

तर हे काय करतात? की आपल्या ओळखी नुसार प्रत्येक गावांमध्ये एक एक व्यक्तीला सहजच सांगून ठेवतात की आम्ही तुमचे नाव आमच्या पॅम्प्लेट वर छापू आणि जे कोणी तुमच्याकडून ग्राहक येतील ,त्यांच्या पैशावर तुम्हाला कमिशन देऊ .

ही पद्धत अगदी यात्रा नेणारे मालक लोक धार्मिक यात्रेसाठी माणसं गोळा करण्यासाठी सुद्धा वापरतात .

यामुळे जवळपास सगळ्यांचाच फायदा होतो, त्या माणसाला ठरावीक पगारासारखी रक्कम द्यावी लागत नाही, माणसं गोळा करणारा स्वतंत्र व्यक्ती असतो त्याला पैसे मिळतात त्यामुळे तो जास्त मेहनत घेतो आणि ज्याला यात्रेला जायचं त्याला चांगली सर्विस मिळायची गॅरंटी मिळून जाते.

📌 या ठिकाणी जो यात्रा नेणारा व्यक्ती आहे तो झाला बिझनेसमन, जो प्रवासी माणसं/यात्रेकरू गोळा करणारी व्यक्ती आहे तो झाला ब्रँड मॅनेजर !

****************************

📌 जमिनीच्या खरेदी विक्री मध्ये सुद्धा अशा प्रकारची लोक लागतात, या लोकांचं वेगळं काही अस्तित्व जरी नसेल किंवा यांनी स्वतःला स्थापित करुन एक पक्का व्यवसाय असं रूप दिलेले जरी नसेल ,तरीही यांचं अस्तित्व आहे !

यांचा वापर आपण आपल्या व्यवसायात देखील केला पाहिजे

📌 आता ही व्यक्ती कोणीही असू शकते,ती स्त्री असेल /पुरुष असेल / शाळा कॉलेजमधील मुलं असतील/ वयस्कर मंडळी /असतील विद्यार्थी असतील/ सैनिक असतील/ पोलिस असतील/ डॉक्टर असतील किंवा कोणीही असू शकेल .

📌 इन्शुरन्स क्षेत्रामध्ये/ MLM कंपन्यांमध्ये किंवा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये अशाच लोकांच्या जीवावर धंदा होतो, या क्षेत्रात विक्री घडवून आणणारे ना पगारावर असतात, ना ते व्यावसायिक असत्तात,ते फक्त ब्रॅन्ड मॅनेजर असतात.

📌 Xiomi,Royal Enfield , Mahindra Club,Fasttrack , Harley Davidson, लोकमत सखी मंच,यासारख्या कंपन्या स्वतःचे फॅन क्लब तयार करतात आणि या क्लबच्या माध्यमातून स्वतःची विक्री वाढवतात.

ते काय पगार देतात काय ?
तर नाही त्यांना आगाऊ सोयी दिल्या जातात, कुठे डिस्काउंट दिला जातो, फ्री सर्विसिंग दिल्या जातात किंवा सरळ पैसे सुद्धा दिल्या जातात .

हा रेफरलचाच प्रकार आहे परंतु रेफरल मध्ये आपण जास्त पैसा आणत नाही आणि इथे भाषा पैशाचीच बोलली जाते.

***************************

दुसरे एक उदाहरण घ्या , xxxxx नामक व्यक्तीने राममंदीराच्या उद्घाटनाविरुद्ध PIL दाखल केली होती,आता तो कोण होता? कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा एक्टीव कार्यकर्ता नाही,पदाधिकारी नाही तर मग कोण आहे ? तर तो ब्रांड मॅनेजर आहे,

याचा अर्थ काय ? तर पगारी नौकर नाही ! पण फेवरमधे काम केल्याबद्दल पैसे मिळतात किंवा अजून काही सवलती मिळतात.

आपण सुद्धा आपल्या व्यवसायासाठी असे ब्रँन्ड मॅनेजर नेमू शकतो

अमक्या अमक्या नेताचे मित्रमंडळ.

असे बोर्ड आपण गल्लो गल्ली बघतो, ते हेच आहे .

Underground राहून /उजेडात न येता कामं करणारी माणसं !

*******************

Salesman किंवा मार्केटर उघड उघड पणे आपली जाहिरात करतात तर,असे ब्रांड मॅनेजर गुप्तपणे.

********************

जगात कित्येक गुप्तहेर संस्था कामे करतात, त्यांचं काम पण हेच आहे , surface वर न दिसता आपल्या देशासाठी काम करत रहाणे .

** ************** ***

आपण आपले ब्रॅन्ड मॅनेजर मार्केटला असे वाढवले तर विक्री 100% वाढणार यात वाद नाही.

© निलेश काळे .
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

office :
Omkesh Munde Sir : 9146101663

Default image
Nilesh Kale
Articles: 83

One comment

  1. Tumhi jya lokana promote karta…jyancha business promote karta..tyanche tumhi brnad manager zalat na?

Leave a Reply