“भयंकर अपमानाचा बदला” म्हणून उभी राहिलेली कंपनी… Rupeek

Rupeek : अपमानातुन उभा राहीलेली कंपनी .

तुम्ही कधी लोन काढण्यासाठी बँकेत गेलाय ? मुद्रा वगैरे तर विसरूनच जा हो ! पण साधं,स्वतःकडे असणाऱ्या Assetsच्या अगेन्स्ट,जसं कि,प्रॉपर्टी किंवा गोल्डच्या अगेंन्स्ट म्हणतोय.

कसा आलाय आत्तापर्यंतचा अनुभव? कसे बघतात लोक आपल्याकडे?
दीन, हीन, एखादा आयुष्याला हारलेला माणूस कसा असतो? त्याप्रमाणे फिलिंग येते कि नाही?

फॅमिलीमॅन या गाजलेल्या वेबसिरीज मध्ये काम केलेल्या मनोज वाजपेयी आणि प्रियामणी यांची एक टिव्ही जाहीरात सध्या दिसतेय, सेम फिलींग, आपलंच सोनं, त्याच्यावरच लोन घ्यायचंय तरिही अपमान??????

त्या लोन घेणाऱ्याला मेल्याहून मेल्यासारखं होतं,हे सगळं सोसताना.
इकडे जा, तिकडे जा, हजार प्रश्न, कडक बोलणं…. अरेरे, एखाद्या कर्तृत्ववान कुटुंबप्रमुखाला मान खाली घालायला लावणारा अनुभव असतो, गोल्ड लोन काढणं म्हणजे.

आता सामान्य माणसाच्या आयुष्यात काय एक प्रॉब्लेम असतो काय?काढावं लागतं त्याला त्याच्या लेकराबाळांसाठी लोन,पण इज्जतीच सौदा करून???? आणि का बरं ?

हाच प्रश्न पडला,सुमीत मनीयारला !

आजकालच्या पोरांना प्रश्न पडताहेत,म्हणून तर उभ्या राहताहेत पर्यायी व्यवस्था.

सुमित मनियार,IIT Bombay चा ग्रॅज्युएट, Chartered financial Analyst आणि त्या दादाला एका नॉन बॅकिंग फायनान्शियल फर्मने Loan against property नाकारलं.

आता IIT चा पोरगा तो,त्याने काही उगाच लोन मागितलं असेल का ? नाही ! अपमान झाला.
भयंकर अपमान झाला.
ही आजची पिढी आहे,ती ओरडत नाही, तर पर्याय तयार करते, आणि सुमित मनियार यांनी,डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म तयार केला… ज्याचं नाव आहे Rupeek.

Rupeekचं हेड ऑफिस बंगलुरू येथे असून, ही कंपनी आता भारतभर पसरत आहे.

Rupeek हे ऍप घरपोच गोल्ड लोन पुरवते,त्यांच्या ऍपवर आपली विनंती टाका, अपॉईंटमेंट फिक्स करा,आणि त्यांचा माणूस आपल्या घरी येऊन सगळी कागदपत्राची फॉरमॅलिटी पुर्ण करून आपल्याला गोल्ड लोन करून देईल.

याची सुरुवात झाली ,सन 2015 मध्ये.

आता तुम्ही म्हणाल, लोन दयायला ऍप काढले ठिकेय,पण. यांना भांडवल कोणी दिले? तर … यांना भांडवल दिले ऍंजेल इन्वेस्टर्सनी, Sequoia Capital,Accel partners आणि फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल यांच्या CGC capital ने .

आजपर्यंत भारतातील 25 शहरांमध्ये यांची सेवा सुरु झालेली असून 1 लाख लोकांना लोन वाटप केलंय यांनी.

मित्रांनो आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे,तुम्ही फक्त कल्पना लावा,डिजीटल तंत्रज्ञानाचा आधार घ्या,स्मार्ट सिस्टीम डेवलप कराआणि स्टार्टअप चालु करा,

या जगात खूप इन्वेस्टर्स आहेत,त्यांच्याकडे तुम्हाला द्यायला पैसा सुद्धा आहे,गरज आहे ती फक्त स्वतःची,”लायकी” सिद्ध करण्याची.

आज Rupeek या स्टार्टअपचं वॅल्युएशन 200 million dollars एवढं असून त्यांनी गेल्या अठरा महिन्यात 250 कोटी/प्रती महिना एवढं गोल्ड लोन वाटप केलंय, येत्या काही महिन्यामध्ये दरमहा 1000 कोटी वाटप करण्याचं यांचं टारगेट आहे.

स्वतःला सुमित मनियारच्या जागी ठेऊन बघा,कि एक दिवस बँकेच्या दारात लोनसाठी उभा राहिलेला हा माणूस, झालेल्या अपमानामुळे कसा पेटून उठू शकतो?

हेच तर आहे ना?
दरवेळी मोटीवेशन ऐकूनच प्रेरित झालं पाहिजे,असं काही नाही, सणसणीत अपमान देखील आपल्याला पेटवू शकतो.

गरज असतेय,ती फक्त त्या गोष्टीला पॉजिटीव वळण देण्याची !

आजच्याDigital युगात तुमच्याकडे योग्य आयडिया असेल? त्याबाबतीत तुमची व्हिजन क्लीयर असेल?तर कोणीही लिफ्ट देऊन पुढे नेईल.

“दे रे हरी! पलंगावरी”, म्हणून काही उपयोग नाही.

अपमानाचा बदला घ्यायचाय? तर असा घ्या! पॉजिटीवली !

कुठे काही मार्गदर्शनाची गरज पडली तर नि:संकोचपणे आम्हाला संपर्क करा, शुभेच्छा.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे,
9518950764
office : Mr. Omkesh Munde
9146101663.

Previous Post Next Post

3 thoughts on ““भयंकर अपमानाचा बदला” म्हणून उभी राहिलेली कंपनी… Rupeek

 1. अतिशय सुंदर ,

  जोवर काही तरी नवीन करायचे आहे असं मनात बाळगून पेटून उठत नाही तोवर काहीही होऊ शकत नाही ..

  आशिष अनिल फाटक

  1. ही आजची पिढी आहे, ती ओरडत नाही तर पर्याय तयार करते
   अपमानाचा बदला घ्यायचाय , तर पॉझीटिवली घ्या
   दोन्ही वाक्य म्हणजेच आजच्या पिढीला जबरदस्त मार्गदर्शन . नेहमीप्रमाणेच द बेस्ट निलेशजी

 2. आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे,तुम्ही फक्त कल्पना लावा,डिजीटल तंत्रज्ञानाचा आधार घ्या,स्मार्ट सिस्टीम डेवलप कराआणि स्टार्टअप चालु करा,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *