भर बाजारात नाचक्की,पण तिथेच कशा काय बुक झाल्या 1,50,000 गाडया? वाचा एक inspirational Real Story

2,154 Views

भर बाजारात नाचक्की पण का बुक झाल्या 1,50,000 गाडया? वाचा याची कारणे !

2 नोव्हेंबर 2019 ला इलॉन मस्क ने त्याचा नवीन प्रॉडक्ट पूर्णतः इलेक्ट्रीक Cyber truck नावाची गाडी लॉन्च केली.

(अमेरिकेत जवळपास कुटूंबाकडे सामानाची ने आण करण्यासाठी आपल्या टाटा मॅजीक सारखा ट्रक असतो )
इलॉन मस्कच्या ट्रकची विशेषता त्याने सांगितलीअशी की,त्याच्यावर 9 mm ची बंदूकीची गोळी फायर केली तरी काही होणार नाही असा त्यांचा दावा !

भला मोठा कार्यक्रम, जगभरातील मिडियाची उपस्थिती,प्रेझेंटेशन चालू झालं.
खुद्द इलॉन मस्क स्टेजवर ट्रक घेऊन हजर झाला.
टाळ्या .
कौतूक.
आणि वेगवेगळे प्रयोग चालू झाले.

त्याच्या कर्मचाऱ्याने एक मोठा हातोडा आणला,सायबर ट्रक वर वार केले ! काहीच झालं नाही .

परत कौतूक !

नंतर वेळ आली ग्लास टेस्ट करण्याची .

विडोंग्लासवर एका लोखंडी बॉलने फटका दिला आणि ती विंडो ग्लास तडकली, दुसऱ्या काचावर प्रयोग केला ती पण तडकली .

म्हणजे प्रयोग फसला !

भरे बाजार में ………. ” बेईजत्ती ” .

दुसऱ्या दिवशी Tesla Motors चा शेअर् 6% ने पडला !

पण इतकं होऊनही इलॉन मस्क आहे तो ! त्याने चारच शब्द सiगितले

“We will fix it ”

आणि लोकांनी 1,50,000 गाडया बुक केल्या.

*************************

Elon musk ….

ज्याने सर्वप्रथम PayPal सारखं पेमेंट App बनवलं,इलेक्ट्रीकवरची सुपर कार बनवली,स्वत:चं रॉकेट उडवलं,

तो हार मानणारा माणूस नाही , आणि आपण पण असंच असावं . त्याचं हसू केलं कित्येकांनी पण त्याच्या चार शब्दावर करोडो लोकांनी विश्वास ठेवला .

काय घडलं आणि या एपिसोड मधून आपण काय घ्यायचं ते बघूया .

(1) Contraversy खरंच विकते :

एखाद्या गोष्टी संदर्भात काही वाद अथवा बातमी बनली की , लोकं उत्सुकतेपोटी नेमकं काय घडलं ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतातच आणि फुकटची मार्केटींग होते , त्याबाबत चर्चा होतेच आणि उत्पादनाची विक्री पण वाढू शकते , म्हणून तर आपल्याकडे बॉलीवुड वाले मुद्दाम असे प्रयत्न करताना दिसतात , तसंच झालं आणि करोडो लोकांनी तो एपिसोड युट्युब वर बघितला , आज हा लेख वाचल्यानंतर सुद्धा अनेक जण बघतील .
त्यासाठी

Elon musk launches Cybertruck असे युटयुबला सर्च करा !
*****************************

(2) Leaverage Personal Brand:

इलॉन कडून शिकण्यसारखी दुसरी गोष्ट. म्हणजे त्याने स्वतः ती गाडी लाँच केली..

इलॉनमस्क हा स्वतःच एक ब्रान्ड आहे, त्याने त्याच्या स्वतःच्या इमेजचा वापर केला , किती कंपन्यांचे CEO आपल्याला माहितीयेत ? BMW , mercedez , Toyota , Maruti किती तरी ब्रान्ड आहेत पण Elon musk आपल्याला माहिती झाला का?????तर यामुळेच !
अनेक CEO स्वतः प्रॉडक्ट लाँच करतात ही परफेक्ट स्ट्रॅटजी आहे ,
मी माझ्या कंपनीतला लीडर आहे आणि पुढे येऊन मी हे युद्ध लढणार ! यात वावगं ते काय ?
स्टीव जॉब्स अँपलला,बाबा रामदेव पतंजलीला मुकेश अंबानी जिओला प्रमोट करतच होते किंवा करतात ही लोकं स्वतः प्रॉडक्टची जिम्मेदारी पुढं येऊन घेतातच ना ? मग आपण का घेऊ नये ?

Leverage चा अर्थच तो होतो , कमी श्रमात जास्त फायदा कसा होईल हे बघणे .

******************************

(3) Prelaunch Orders :

ही एक जबरदस्त स्ट्रॅटर्जी आहे .
खरं तर Elon musk च्या या ट्रकचे उत्पादन डिसेंबर 2021 पासून पुढे चालू होणार आहे , अजून एकही अशी गाडी रस्त्यावर नाहीये , पण त्या अगोदरच त्याने दीड लाख गाडया विकल्या पण ,
खरं तर त्याने स्टेजवर येऊन गाडी दाखवली नाही , तर ती डायरेक्ट विकली .
ही बाब आपल्याला जमली पाहिजे !
त्यावेळी आपण खरे यशस्वी झाले असे समजावे .
मोठेपणा म्हणून नाही सांगत पण उद्योगनितीच्या U- MBA या paid व्हाटस अप ग्रुपची सदस्यता पण आम्ही प्री बुकींग करूनच घेतो .
कारण ??
लोकांचा विश्वास !
यात खरोखर फायदा आहे.

*******************************”

(4) Three boxes Theory :

ही एक स्ट्रॅटजी आहे,ज्यात असं सांगितलं जातं कि,एका प्रकारच्या उत्पादनाच्या तीनच व्हारायटी काढा.
तसंच केलंय याने
a) 39,000 dollers
(b)49,000 dollers
(c) 69,000dollers

यात जास्त कोणती विकेल ?
तर b वाली,कारण ती लो मॉडेल पेक्षा फक्त दहा हजारांनी जास्त आहे आणि टॉप मॉडेल पेक्षा 20,000 डॉलर्स ने कमी आहे.
आणि तेच तर इलॉनला पाहिजे आहे .

अजून एक बाब ही कार ( ट्रक पण म्हणता येईल ) जी आहे , ति अनफिनीश्ड वाटते त्यामुळे लोकं त्यावर आपली कलाकुसर वापरून पर्सनलाईज्ड करू शकतात आणि ही एक जबरदस्त स्ट्रॅटर्जी आहे .

********************************

(5) Open up Rival :

ही एक प्रचंड यशस्वी स्ट्रॅटर्जी आहे ,
समोरच्याचे उत्पादन आणि आपले उत्पादन याची समोरासमोर तुलना करून दाखवा !
इलॉन ने त्याच्या मध्ये फोर्ड च्या ट्रक मध्ये रस्सी बांधून स्पर्धा घडवली आणि ट्रकने फोर्डचा ट्रक फरफटत ओढतानाचा व्हिडीओ दाखवला !

अशी तुलना गैर वाटत असली तरी खूप उद्योजक हे दाखवतात आणि इलौन मस्क ने ते पण दाखवले .

आणि माझ्या वैयक्तीक मताने ,, तो हारून पण जिंकला .

याला म्हणावं उद्योजक ,
खटपटया ,
धडपडी ,
आणि कोणालाही भिडायची तयारी
थोडं बहुत खाली- वर तर कोणाच्याही आयुष्यात होतंच असतं,त्याला काय घाबरायचय?
शेवटी Hardened steel ला जास्त वेळ ताप सहन करावा लागतोच ना ?
तेंव्हा कधी असा सार्वजनिक अपमान झाला तरिही खचुन जाऊ नका, दुनिया आपल्यावर विश्वास ठेवते, त्याला फक्त तडा जाऊ देऊ नका !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा .
© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट, Anand Park ,Aundh,Pune.
9518950764.

Business coaching हवीये?तर कॉल करा :

श्री ओमकेश मुंडे सर 9146101663.

Default image
Nilesh Kale
Articles: 84

3 Comments

  1. खूपच आत्मविश्वास वाढवणारी पोस्ट असते आपली खूप छान वाटत विशेष म्हणजे आपण आमच्या गावातील असल्या मुळे अधिकच जवळीकतेने आणि विश्वासाने वाचतो मी पोस्ट ….धन्यवाद

  2. Barobar

  3. Very nice,informative,posts. Thanks

Leave a Reply to Santoshi DhavanCancel Reply