भल्या भल्या ब्रॅन्डसला टक्कर देऊन ऊरलेला ब्रान्ड

#Business _Legends: Medimix ( 28/03/2019)


भारतात आयुर्वेदाचे ज्ञान फार पूर्वीपासुन आहे, कित्येक कुटुंबात हे ज्ञान पिढयान पिढ़या चालत आलेले असते, त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा या हेतूने जे ब्रँडस स्थापीत झाले , त्यापैकीच एक ब्रँड … MEDIMIX .
या ब्रँडने 50 यशस्वी पूर्ण केलीत .
आज जाणून घेऊ या बद्दल .


तामिळनाडू च्या छोटया गावात , असणारं चोलाईल कुटूंब , या कुटूंबाकडे ,,, आयुर्वेदीक ज्ञानाचा खजिना होता , त्याचा वापर ते समाजासाठी करत .
विशेष करून ,, काही तेलाचा उपयोग त्वचारोगावर फारच गुणकारी होता .
त्याच कुटुंबाचे सदस्य .. डॉ .व्हि .पी . सिधन …. रेल्वेत नौकरीला असणारे आयुर्वेदीक डॉक्टर , यांनी हे ज्ञान साबणाच्या स्वरूपात आणायचे ठरवले , साल होतं …
सन 1967 . चर्चा होत होत्या , फॉर्मुलेशन , ब्रँड , उत्पादन प्रक्रिया तयार होत होती . शेवटी सन . 1969 साली हा ब्रँड मार्केट ला आला आणि प्रसिद्ध झाला .

पूर्णपणे Handmade .
Limca Book of Records मध्ये नोंद झालेली कंपनी .
यांच्या इतकी हँड मेड साबणाची रेंज कोणत्याच कंपनीकडे नाही .
…..
एखादी गोष्ट हाताने करायची म्हटलं कि , आपल्याला ते जुनाट वगैरे वाटू शकते .
पण लक्षात घ्या , या जगातले सर्वात महागडे ब्रँड्स हे हॅण्डमेड वस्तु तयार करतात .

यापैकी काही .
Rolex : घडयाळे
Rolls Royce: कार
Cartier : सर्वोत्तम ज्वेलरी .
Lee Cooper : शुज .
Lijiat : पापड .
Italian Leather : चमडा .
इत्यादी .
म्हणुन करिता , जेंव्हा काम चालु करताय आणि मशिन्सचा सपोर्ट नाही ???? देवाने दिलेले दोन हात वापरा .
काही बिघडत नाही .
नाही तरी पुढे जाऊन हॅण्डमेड गोष्टी लाच किंमत मिळणार आहे (चायनीज माल स्वस्तात मिळतो , पण तेच made in Japan घेतला तर ?? )


medimix साबण तयार करताना , 18 प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जातो , त्यामुळे ही साबण अत्यंत गुणकारी ठरली .
इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे … पतंजली 9 घटक वापरते फक्त .
हॅण्डमेड असल्याने मनुष्यबळ आलेच , त्यांच्या संवेदना , भावना यांचा पण मेळ घालावा लागलाच या कंपनीला .
सेम स्टोरी HERSHEY’s या चॉकलेट कंपनीची … ही कंपनीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी खूप कमी मशीनरी वापरते .
म्हणुन तर … या कंपनीचे रेकॉर्ड आहे , यांनी बदल घडवला कँडी ऐवजी सॉफ्ट चॉकलेट यांनी बनवले सर्वप्रथम !


सुरूवातीच्या काळात फक्त दक्षिण भारतात व्यापार करणारी ही कंपनी हळूहळू विस्तारत गेली .
पण अचानक 1980 मध्ये कामगारांनी संप केला .
दोन वर्ष कंपनी बंद राहिली !
* हेच घडतं ना ??
हेच महत्वाचं कारण आहे , भारतातल्या छोटया कंपन्या आजारी पडण्याचं , बंद – संप – उपोषणं – आंदोलनं .
..
यामुळे कित्येक उद्योजक देशोधडीला लागले , कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली , पण लक्षात कोण घेतो ???
..
पण 1983 मध्ये डॉ . सिधन यांचे जावाई, डॉ .ए .व्ही . अनूप यांनी कंपनी परत चालू केली .
परत कामगारांना घेऊनच !

त्यांनी medimix या फक्त हिरव्या बार ऐवजी 4 नवीन प्रकार मार्केट ला आणले .
नवीन जनरेशन बार ऐवजी फेस वॉश ला महत्व देतेय हे लक्षात आले तसे ,,,, तेच आयुर्वेदीक घटक कायम ठेऊन … 3 प्रकारचे बॉडी वॉश आणि 5 प्रकारचे फेस वॉश मार्केटला आणले .
..
..
बदलत्या काळानुरूप … Amazon , flip Cart साठी विशेष 4 +1 पैक तयार केले .
पूर्ण भारतातच नव्हे तर , विदेशात पण कंपनीचा विस्तार केला .


आज त्यांचे दोन प्लान्ट चैन्नईत , एक पेरांबूर मध्ये , आणि एक बेंगलोर मध्ये यशस्वी पणे चालू आहेत .
या वर्षी त्यांचे टारगेट 10000 टन साबण विक्री करण्याचे आहे .
….
….
क्वालिटी बाबत म्हणाल तर … आज घडीला भारतात एकही आयुर्वेदीक साबणाचा ब्रॅण्ड नाही , जो Medimix ची बरोबरी करेल .
यामुळेच तर …. दशकभरा पूर्वी, साबणाचा जनक असणाऱ्या Hindustan Lever ने या ब्रॅण्ड ला खरेदी करण्याचा प्रयत्न केला , पण कामगारांचे हित आणि स्वतःचे अस्तित्व जपणाऱ्या चोलाईल कुटुंबाने त्याला स्पष्ट नकार दिला !

आज डॉ . सिधन यांचे जावाई Dr .A.V . Anoop दक्षिण भारताचे मार्केट सांभाळतात , तर मुलगा प्रदिप चोलाईल उत्तर भारत आणि विदेशातील मार्केट सांभाळतात .
….
….
एका साध्या आयुर्वेदीक डॉक्टरच्या कल्पनेतून उभा राहिलेली ही कंपनी , हा ब्रँण्ड 2020 पर्यंत शेअर मार्केट ला लिस्ट होऊन IPO आणू शकतो .
..
एका कुटूंबाची परंपरा , त्याला एका डॉक्टरने दिलेले व्यावसायिक रूप , कामगारां प्रति जाणीवेतून .. अजूनही
हैण्डमेड साबणच तयार करत रहाण्याची त्यांची जिद्द, टेक ओव्हर च्या आमिषाला बळी न पडता ताठ कण्याने व्यवसाय करण्याची त्यांची प्रबळ इच्छा . या लेखातून कशी वाटली ?? ते कळवा .
..

अशाच प्रकारे आपणही आपल्या कुटुंबात असणारे पारंपारीक ज्ञान सुद्धा व्यवसायात रूपांतरीत करू शकतो , ज्या काळात माहिती तंत्रज्ञान , सोशल मिडीया काहीही नव्हते , त्या काळात डॉ . सिधन यांनी करून दाखवले , आता तर काहीच अडचण नाही . !


Source : AVA group Website

शुभेच्छा .
© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स
5 th Floor, विघ्नहर चेंबर्स,
अभिनव चौक,
..
अशा प्रेरक कथा अनेकांना उद्योजक बनायला प्रोत्साहन देतात तेंव्हा कृपया शेअर करा!
धन्यवाद .

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *