भल्या भल्या ब्रॅन्डसला टक्कर देणारी, आणि आजही हॅन्डमेड साबण बनवणारी कंपनी : मेडिमिक्स

Medimix


भारतात आयुर्वेदाचे ज्ञान फार पूर्वीपासुन आहे, कित्येक कुटुंबात हे ज्ञान पिढयान पिढ़या चालत आलेले असते, त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा या हेतूने जे ब्रँडस स्थापीत झाले. त्यापैकीच एक ब्रँड … MEDIMIX.

या ब्रँडने 50 यशस्वी पूर्ण केलीत .
आज जाणून घेऊ या बद्दल .


तामिळनाडू च्या छोटया गावात , असणारं चोलाईल कुटूंब , या कुटूंबाकडे ,,, आयुर्वेदीक ज्ञानाचा खजिना होता , त्याचा वापर ते समाजासाठी करत.

विशेष करून,काही तेलाचा उपयोग त्वचारोगावर फारच गुणकारी होता .
त्याच कुटुंबाचे सदस्य .. डॉ .व्हि .पी . सिधन …. रेल्वेत नौकरीला असणारे आयुर्वेदीक डॉक्टर,यांनी हे ज्ञान साबणाच्या स्वरूपात आणायचे ठरवले साल होतं …
सन 1967 चर्चा होत होत्या , फॉर्मुलेशन, ब्रँड,उत्पादन प्रक्रिया तयार होत होती,शेवटी सन 1969 साली हा ब्रँड मार्केटला आला आणि प्रसिद्ध झाला .

पूर्णपणे Handmade .
Limca Book of Records मध्ये नोंद झालेली कंपनी,

( इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कि साबण जरी हॅन्डमेड असला तरिही, या इंडस्ट्रीत पैकिजिंगला खूप महत्व आहे, ते यांनी ठेवलंय , सध्या अनेक जण हॅन्डमेड साबण बनवतात आणि मेनकापडात गुंडाळून विकायचा प्रयत्न करतात, प्रोफेशनली हे चालत नाही)

यांच्या इतकी हँड मेड साबणाची रेंज कोणत्याच कंपनीकडे नाही .
…..
एखादी गोष्ट हाताने करायची म्हटलं कि,आपल्याला ते जुनाट वगैरे वाटू शकते.

पण लक्षात घ्या,या जगातले सर्वात महागडे ब्रँड्स हे हॅण्डमेड वस्तु तयार करतात .

यापैकी काही.
Rolex : घडयाळे
Rolls Royce: कार
Cartier : सर्वोत्तम ज्वेलरी .
Lee Cooper : शुज .
Lijiat : पापड .
Italian Leather : चमडा .
इत्यादी .
म्हणुन करिता,जेंव्हा काम चालु करताय आणि मशिन्सचा सपोर्ट नाही ???? देवाने दिलेले दोन हात वापरा,

काही बिघडत नाही .
नाही तरी पुढे जाऊन हॅण्डमेड गोष्टी लाच किंमत मिळणार आहे (चायनीज माल स्वस्तात मिळतो,पण तेच made in Japan घेतला तर ?? )


medimix साबण तयार करताना , 18 प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जातो , त्यामुळे ही साबण अत्यंत गुणकारी ठरली .
इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे … पतंजली 9 घटक वापरते फक्त .
हॅण्डमेड असल्याने मनुष्यबळ आलेच , त्यांच्या संवेदना , भावना यांचा पण मेळ घालावा लागलाच या कंपनीला .
सेम स्टोरी HERSHEY’s या चॉकलेट कंपनीची … ही कंपनीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी खूप कमी मशीनरी वापरते .
म्हणुन तर … या कंपनीचे रेकॉर्ड आहे , यांनी बदल घडवला कँडी ऐवजी सॉफ्ट चॉकलेट यांनी बनवले सर्वप्रथम !


सुरूवातीच्या काळात फक्त दक्षिण भारतात व्यापार करणारी ही कंपनी हळूहळू विस्तारत गेली .
पण अचानक 1980 मध्ये कामगारांनी संप केला .
दोन वर्ष कंपनी बंद राहिली !
* हेच घडतं ना ??
हेच महत्वाचं कारण आहे , भारतातल्या छोटया कंपन्या आजारी पडण्याचं , बंद – संप – उपोषणं – आंदोलनं .
..
यामुळे कित्येक उद्योजक देशोधडीला लागले , कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली , पण लक्षात कोण घेतो ???
..
पण 1983 मध्ये डॉ . सिधन यांचे जावाई, डॉ .ए .व्ही . अनूप यांनी कंपनी परत चालू केली .
परत कामगारांना घेऊनच !

त्यांनी medimix या फक्त हिरव्या बार ऐवजी 4 नवीन प्रकार मार्केट ला आणले .
नवीन जनरेशन बार ऐवजी फेस वॉश ला महत्व देतेय हे लक्षात आले तसे ,,,, तेच आयुर्वेदीक घटक कायम ठेऊन … 3 प्रकारचे बॉडी वॉश आणि 5 प्रकारचे फेस वॉश मार्केटला आणले .
..
..
बदलत्या काळानुरूप … Amazon , flip Cart साठी विशेष 4 +1 पैक तयार केले .
पूर्ण भारतातच नव्हे तर , विदेशात पण कंपनीचा विस्तार केला .


आज त्यांचे दोन प्लान्ट चैन्नईत , एक पेरांबूर मध्ये , आणि एक बेंगलोर मध्ये यशस्वी पणे चालू आहेत .
या वर्षी त्यांचे टारगेट 10000 टन साबण विक्री करण्याचे आहे .
….
….
क्वालिटी बाबत म्हणाल तर … आज घडीला भारतात एकही आयुर्वेदीक साबणाचा ब्रॅण्ड नाही,जो Medimix ची बरोबरी करेल .
यामुळेच तर …. दशकभरापूर्वी, साबणाचा जनक असणाऱ्या Hindustan Lever ने या ब्रॅण्डला खरेदी करण्याचा प्रयत्न केला,पण कामगारांचे हित आणि स्वतःचे अस्तित्व जपणाऱ्या चोलाईल कुटुंबाने त्याला स्पष्ट नकार दिला !

आज डॉ. सिधन यांचे जावाई Dr A.V. Anoop दक्षिण भारताचे मार्केट सांभाळतात,तर मुलगा प्रदिप चोलाईल उत्तर भारत आणि विदेशातील मार्केट सांभाळतात .
….
….
एका साध्या आयुर्वेदीक डॉक्टरच्या कल्पनेतून उभा राहिलेली ही कंपनी , हा ब्रँण्ड 2022 पर्यंत शेअर मार्केटला लिस्ट होऊन IPO आणू शकतो .
..
एका कुटूंबाची परंपरा,त्याला एका डॉक्टरने दिलेले व्यावसायिक रूप , कामगारां प्रति जाणीवेतून .. अजूनही
हैण्डमेड साबणच तयार करत रहाण्याची त्यांची जिद्द,टेक ओव्हर च्या आमिषाला बळी न पडता ताठ कण्याने व्यवसाय करण्याची त्यांची प्रबळ इच्छा,या लेखातून कशी वाटली ?? ते कळवा .
..

अशाच प्रकारे आपणही आपल्या कुटुंबात असणारे पारंपारीक ज्ञान सुद्धा व्यवसायात रूपांतरीत करू शकतो, आज या कंपनीकडे हॅन्डवाश, फेसवॉश अशी मोठी रेंज आहे.

कोरोना काळात तर कंपनीच्या उत्पादनांना प्रचंड मागणी वाढली.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे?ज्या काळात माहिती तंत्रज्ञान,सोशल मिडीया काहीही नव्हते , त्या काळात डॉ.सिधन यांनी करून दाखवले,आता तर काहीच अडचण नाही !

मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्याकडे खूप सारी मशिनरी नाहीये म्हणून आपण दुबळे ठरत नाही, नीट पोजीशनिंग करता यायला हवी.


Source : AVA group Website.

शुभेच्छा .
© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे,
9518950764
..
आम्ही उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात सेल्स वाढवायला पर्सनल कोचिंग करतो, त्याकरिता संपर्क करा.
श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663.

अशा प्रेरक कथा,अनेकांना उद्योजक बनायला प्रोत्साहन देतात तेंव्हा कृपया शेअर करा .
धन्यवाद .

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *