भारताच्या किराणा मार्केट मध्ये मुकेश अंबाणी आणि 7 – 11 या स्टोर्सची एन्ट्री ! काय होणार परिणाम ? वाचा .

“9 ऑक्टोबर पासुन भारतात 7_11 स्टोर्सची सुरुवात झालीये”

मुकेश अंबानी यांच्या Reliance retail आणि अमेरिकेच्या 7-11 या कंपनीने मिळून मुंबईत पहिले Convenience STORE उघडलंय .

बऱ्याच जणांना 7-11 स्टोर्स म्हणजे काय ?त्याचं बिजनेस मॉडेल काय असतं? उद्या भारताच्या इकॉनॉमी वर यांच्या स्टोर्सचा काय परिणाम होऊ शकतो ? हे माहित नसणार आहे, त्यांचे करिता हा ब्लॉग आहे.

भारतात Reliance retail ने यांची मास्टर फ्रांच्यायसी घेतलेली असून, अंधेरी( पूर्व ) येथे,7_11 चं 1700 स्क्वेअर फुटात पहिलं कन्वेनियन्स स्टोर ओपन झालंय.

तुम्ही म्हणत असाल,हे कन्वेनियन्स स्टोर म्हणजे काय भानगड आहे ? ते केवळ 1700 स्केअर फुट एवढ्याच एरियात असेल तर मग त्यात एवढं मोठं काय आहे? आमचे गोडाऊन यापेक्षा मोठे असतात.

तर समजुन घ्या कन्वेनियन्स स्टोर्स बद्दल : कन्वेनियन्स स्टोर्स ही वेगळीच संकल्पना आहे,ही स्टोर्स सुपरमार्केट किंवा मॉल एवढे मोठे नसतात, सुपरमार्केट एवढे सुद्धा नसतात, तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या एखादया होलसेल किराणा शॉप एवढेच असतात,आणि यामध्ये डेली वापराचे किराणा सामान,फ्रोझन फुड, फळे,भाज्या,दुध,कोल्ड्रींक,ब्रेड ‘
बटर, इलेक्ट्रॉनिक, वगैरे लिमिटेड सामानच मिळते.

परंतू या शॉपचं वैशिष्ठ्य असं कि हे शॉप 24 तास ओपन असतात,रात्री 2 वाजता जरी गेलात तरी तुम्हाला तुमच्या गरजेचे सामान मिळू शकते.

म्हणून याला Convenience STORE म्हणलं जातं.

पाश्चिमात्य देशात ही संकल्पना यांनीच आणली.

📗7-11 ही या क्षेत्रातली अमेरिकन कंपनी आहे,पण सध्या यांची मालकी जपानकडे आहे,जगभरातील 18 देशांमध्ये यांचे 77000 स्टोअर्स आहे त.
वर्ल्ड क्लास ट्रेनिंग,पुर्ण यशस्वी असे टर्नकी फ्रँचायजी मॉडेल,पूर्ण कॉर्पोरेट सपोर्ट,अशी यांची खासीयत असल्याने पुढे जाऊन भारतातील किराणा,डेली निड्सची दुकाने यांच्याकरिता हे स्टोर्स तगडी कॉम्पीटीशन ठरणार यात काहीच वाद नाही.

याचं साधं सोपं कारण म्हणजे?ही स्टोर्स D- Mart इतके मोठे नाहीत,आणि यांच्याकडे लिमिटेड वस्तुच असणार आहेत त्यामुळे अंबानीनी यात गुंतवणूक केलीये .

📙 History : या कंपनीची सुरुवात,1927 मध्ये Dallas,Texas मध्ये झाली, तिथे Southland ice नावाची एक बर्फ विकणारी कंपनी होती , कारण? त्या काळात घरगुती फ्रिज नसायचे.
Joe Thompson हा व्यक्ती त्या कंपनीचा कर्मचारी होता.

त्याच्या असं लक्षात आलं कि,आपण लोकांच्या रोजच्या वापराचा बर्फ तर विकतोय,मग बर्फा बरोबरच, कोल्ड्रींक्स,दूध,ब्रेड ,अंडी,सिगरेट अशा वस्तू पण विकायला ठेऊया” ! आणि त्यांनी एकदम छोटं आऊटलेट काढलं आणि त्याचा टायमिंग ठेवला सकाळी 7 ते रात्री 11.

साधारणपणे डेली निडसची दुकाने 8 किंवा 8:30 ला बंद व्हायची,तिथे यांचं दुकान रात्री 11 पर्यंत चालु असायचं,त्यामुळे लोकांना ही कल्पना आवडली.

एका दुकानाचे, दोन _तीन दुकाने फार पट्टकन झाले पण पुढे 1931 मध्ये ग्रेट डिप्रेशन आलं (ग्रेट डिप्रेशन म्हणजे? जागतिक महामंदीचा काळ )आणि या काळात यांच्या प्रगतीचा आलेख मंदावला.

कर्ज वगैरे काढुन ,यांनी व्यवसाय तगवुन ठेवला आणि पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर तेव्हा मार्केट एकदम सुधारलं, त्याचा यांना फायदा झाला. ‘यांनी पुर्ण अमेरिकेमध्ये आपल्या स्टोर्सची वाढ केली.

📗24hrs ची सुरुवात : 1962 च्या अगोदर यांचे ऑपरेशन्स सकाळी 7-ते रात्री 11 पर्यंत चालायचे,तेवढा वेळ पुरेसा होता,पण नंतर नंतर एक प्रयोग म्हणून यांनी रात्रभर दुकान उघडी ठेवली,लोकांना तो प्रयोग आवडला आणि 1962 पासून यांनी अमेरिकेत 24 तासांची सेवा द्यायला सुरुवात केली.

आज अनेक देशांमध्ये यांची दुकाने चोवीस तास उघडी असतात.

📗 Badpatch : थोड बहुत यश भेटलं कि लोक जरा जास्तीचे कॉन्फीडन्ट बनतात ,तसं यांनी वारेमाप फ्रँचायजी द्यायला चालू केल्या,आपल्या स्टोर्समध्ये ऑटोपार्टस आणि पेट्रोल आणि दारू पण ठेवायला सुद्धा सुरू केलं.

जास्त माल ठेवायचा म्हणलं कि, जास्त इन्वेस्टमेंट लागणार, गडबड होणार हे ठरलेलं असतं,1980 पासून यांच्यावरचं कर्ज वाढत गेलं आणि 1990 मध्ये यांनी कर्जबाजारीपणाची फाईल दाखल केली .

आणि मग यांच्या जपानमधल्या Seven& I Holding,japan या यांच्याच फ्रँच्यायजीने यांची 70% मालकी विकत घेतली,तेंव्हापासून आत्तापर्यंत या अमेरिकन कंपनीचं हेडऑफिस जरी अमेरिकेत असलं, तरिही मालकी जपानकडे आहे.

************** ************ ******

📒 Challenges :

बिगबजार बरोबरची यांची भागीदारी 5 ऑक्टोबरला 2021 ला संपली आणि मुकेश अंबानीबरोबर यांचा करार झाला असला तरी भारतात यांना वेगळेच चॅलेंजेस आहेत,ते असे .

📌 यांचे जास्तीत जास्त आऊटलेट्स हे पेट्रोलपंपा शेजारी असतात आणि आजतरी भारतीय ग्राहक पेट्रोल पंपावर जाऊन दुध ब्रेड,किराणा आणण्याच्या मानसिकतेचे नाहियेत,पण उद्याची परिस्थिती सांगता येत नाही.

📌 Convenience stores रोजच्या लागणाऱ्या गोष्टींचीच विक्री करतात,म्हणजे हे लोक कमोडिटी मार्केट मध्ये येणार .
कमोडिटी मध्ये जास्त प्रॉफिट नसतो परत इथे रेटवर स्पर्धा असते.
ते पण एक चॅलेंज यांना असणार आहे.

📌 7-11 च्या स्टोर्स गल्ली बोळातल्या किराण दुकानदार/भाजीविक्रेते/ फळविक्रेते/ आईसक्रिम विक्रेते यांच्या बरोबर स्पर्धा करणार आहे’
या स्ट्रीट वेंडर व्यवसायीची संख्या लाखोत जाईल,तेव्हा या स्टोर्सला देखोळ हे इतकं सोपं असणार नाहीये.

📌 या स्टोर्सचा आजवरचा प्रवास बघता,यांचेकडे रेडी टू इट खाद्यपदार्थांची विक्री जास्त होते, पण,भारतात आजही “food on the go culture” आलेलं नाही.
तेव्हा बघावं लागेल कि,7-11 स्टोर्स भारतात नेमकी काय स्ट्रॅटजी लावेल?

📗 एक गोष्ट मात्र खरी आहे,कि, “इथून पुढे आम्ही इतकाच वेळ दुकान उघडे ठेवणार,बाकी वेळ बंद असणार” अशा पाटया लावुन चालणार नाही.

आता सामना, साध्या सुध्या कंपनीशी नाही ,डीमार्टने बराच पब्लीक खेचलाय,Dunzo,Groffers
या डिलीवरी कंपन्या मार्केटला उतरण्याच्या तयारीत आहेतआणि या कंपनीला जवळपास 90 वर्ष फ्रॅन्चायजीचा अनुभव आहे, परत मुकेश अंबानी त्यांचे पार्टनर आहेत.

📌 तेंव्हा आत्तापासून आपल्या ग्राहकाला वाजवी दरात चांगली सेवा दयायला चालु करा !

थोडी जास्त सर्विस देऊन तो टिकवुन ठेवा म्हणजे? तो ऑनलाईनकडे किंवा अशा भविष्य काळात उघडणाऱ्या Convenience stores कडे पळणार नाही .

शुभेच्छा!

© निलेश काळे.
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *