भावकीच्या वादातून जन्मलेल्या दोन कंपन्याची कहानी Adidas & Puma

भावकी भावकी मुळे जन्मलेल्या दोन कंपन्यांची स्टोरी Adidas_and_Puma:

©निलेश काळे .

📌भावकी आणि त्यांच्यातले वाद हा विषय मराठी माणसासाठी काही नवीन नाही .

📌पण आज आपण अशा दोन कंपन्यांची स्टोरी बघुया, ज्यांच्या भावकीतल्या वादामुळे त्या वेगवेगळ्या झाल्या, पण ज्यांनी एकमेकांवर चढाओढ करण्यापायी पूर्ण स्पोर्टस मार्केटिंग इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा पार बदलून टाकला !

📌या कंपन्या आहेत

*Adidas & Puma !*

📌 तर कहानी सुरू होते जर्मनीच्या Harzegenaurach या फक्त 2000 लोकसंख्या असणाऱ्या खेळप्रेमी गावात.

इथे Dasselar family राहायची,

आई आणि तिची दोन मुले Adolf “Adi” Dassler आणि Rudolf Dassler

📌 #Need_a_invention:

या पोरांच्या आईची लॉन्ड्री होती,
पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला होता,त्यामुळे सगळीकडे बेकारी होती ,काळ खराब होता,पण या गावात खेळाचं वातावरण चांगलं होतं,दोन्ही भाऊ युद्धातून वापस आलेले ! आता काय करावं? याची पुढची चिंता !

📌 म्हणुन घर चालवायची एक निकड म्हणून आदी डोसलार ने आईच्या लॉन्ड्रीतच हाताने बुटं बनवायचं काम चालु केलं ! त्याने बनवलेले बुट एवढे हीट झाले कि, एवढया वाईट काळात सुद्धा लोकांनी त्यांचे बुटं विकत घ्यायला चालु केले !

📌 पुढच्या तीन वर्षात काम एवढं वाढलं कि ,धाकटया भावाने मोठ्या रूडॉल्फला कंपनीच्या कामात घेतलं , आता आदी डॅसलर उत्पादन सांभाळायचे आणि रूडाँल्फ मार्केटींग,
कंपनीचं नाव डैसलर शु कंपनी !

📌 यांच्या कंपनीने तयार आणि पेटंटेड केलेले रनिंग शुज एवढे प्रसिद्ध झाले कि, यांना तीन शिफ्ट मधे काम करावे लागायचे !

📌 काम निट नीटकं चालु होतं , पण ….. आदीचा एका सोळा वर्षाच्या मुलीवर जीव ( Kathe Dassler ,पुढे या Adidas च्या CEO झाल्या ) जडला आणि दोन भावाच्या दुनियेत बाहेरच्या तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाला !

पुढे त्या जोडण्यानं लग्न केलं

#Political_Support:

एखादया व्यवसायाला राजकिय सपोर्ट भेटला , तर त्या व्यवसायाची भरभराट स्पीडने होते , तसे 1936 मध्ये जर्मनीने ऑलंम्पीक भरवले, तसा हिटलर खेळाचा चाहता असल्याने त्याने फिजिकल अॅक्टीविटी करण्यावर जोर दयायचा ! आणि नेमकी हीच बाब डॅजलर बंधुंच्या पथ्यावर पडली , या राजकिय सपोर्टचा त्यांना फायदा झाला ! इतका कि त्या दोघांनी पण हिटलरची नाझी पार्टी जॉईन केली.

📌 स्वतःचा बिझनेस कंटीन्यू करण्याकरिता त्यांना हे आवश्यकच होते .

📌 #Right_Move_Right_Time:

1936 च्या ऑल्म्पीक मध्ये Jessi Owens हा अमेरिकन/आफ्रिकन खेळाडू खेळणार होता, त्या काळात ना कसली स्पॉन्सरशीप असायची ना कसला कंपनी सपोर्ट.
आदी डॅसलर आणि जर्मन रनींग टीम च्या कोचने, डॅसलर बंधुंचा फेमस बुट जास्तीत जास्त खेळाडूंना दयायचे ठरवले , त्यात Jessi Owens सुद्धा होता,पण प्रॉब्लेम असा कि Jessi Owens हा कृष्णवर्णीय अमेरिकन होता ( हिटलरचा दुश्मन ) ,पण आदी डॅसलर ने रिस्क घेतली आणि Jessi Owens ने डॅसलर कंपनीचा पेटंटेड स्पेशल खिळे असणारा स्पेशल हॅन्डमेड बुट घालुन रनिंगमधे तीन गोल्ड मेडल मिळवले, त्यात प्रतिष्ठीत 100 मिटरची रेस सुद्धा आली,आणि एका जिंकणाऱ्या प्लेअरवर दांव लावुन डासलर कंपनी एका झटक्यात वर्ल्ड फेमस झाली, त्यांचं नाव झालं, विक्री वाढली आणि ऑलम्पिकमुळे ही कंपनी जागतीक लेवलची शु निर्माता झाली .

#1948_Split:

पण पुढे दुसरे महायुद्ध सुरू झालं आणि हिटलरच्या आदेशानुसार डॅजलर कंपनीने बुटाचे उत्पादन करण्याच्या ऐवजी ,युद्धाला लागणाऱ्या सामग्रीचे उत्पादन करायला चालू केलं .

कधीकधी व्यवसायाकाम समोर पर्याय नसतात, त्यांना राजकीय निर्णयानुसार आपली रणनीती आखावी लागते. आणि या दोन भावांच्या कंपनीबरोबर सुद्धा हेच झालं त्यात Redolf Dassler यांना प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभाग घेण्यासाठी जावे लागले आणि ज्यावेळी तो वापस आले , त्यावेळी दोघा भावाच भांडण जरा जास्तच वाढलं, याच्यामध्ये आदीची पत्नीचा मोठा सहभाग होता आणि शेवटी या दोघा भावांना वेगळं व्हावं लागलं .

त्यांच्यातले वाद इतके टोकाला गेले की दोघांमध्ये प्रेम तर सोडा पण सहानुभूती सुद्धा राहिली नाही.

#दोन_कंपन्या:

जेव्हा दोन भावांमध्ये तिसरी व्यक्ती येते, त्या वेळेला त्यांच्यातल्या व्यवसायाची सुद्धा उभी विभागणी होते आणि तसंच झालं.

Adi आणि त्याची पत्नी यांनी मिळून Adidas ही कंपनी चालु केली आणि Redolf यांनी स्वतःची Puma नावाची कंपनी चालु केली.

📌यांच्या गावांमधून एक नदी व्हायची, विभागणी अशी झाली की नदीच्या एका बाजूला आदिदास आणि दुसऱ्या बाजूला प्युमा या दोन्ही कंपन्या आपले उत्पादन घेऊ लागल्या , वैर एवढं वाढलं की जो व्यक्ती आदिदास मध्ये काम करत असे, त्याला नदीच्या दुसऱ्या बाजूला जायला परवानगी नव्हती .आणि जो यामध्ये काम करत असते त्याला नदीच्या इकडच्या साइडला यायला परवानगी नसायची.

📌 1948 च्या पुढे आदिदास या कंपनीला अनेक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले,800 कामगार आणि वार्षिक 10 लाख जोड बुट एवढं उत्पादन घेत ,ही कंपनी कायम जर्मन फुटबॉल टीम बरोबर राहिली ,त्यांनी अनेक टीमला स्पॉन्सर करून प्रसिद्धी मिळवली आणि 1960 पर्यंत जगामध्ये केवळ आदिदास याच कंपनीचं नाव मोठं होत गेलं कारण तो पर्यंत Nike आणि Reebok चा उदय व्हायचा होता,त्यांना फक्त एकच सिरीयस कॉम्पीटीटर होता तो म्हणजे “प्यूमा”

📌 #Sports_Marketing_Started :

1968 पर्यंत जगाच्या मार्केटवर या दोनच कंपन्यांचा राज्य होतं,सन 1968 मध्ये रशियाच्या मॉस्कोमध्ये जी ओलंपिक भरली त्या ऑलम्पिक मध्ये सुद्धा खेळाडू साधेपणानं भाग घ्यायचे ,पण या दोन कंपन्यांचे प्रतिनिधी तेथे पोहोचले आणि त्यांनी खेळाडूंना फक्त बुट आणि जर्सीच नाही तर बेकायदेशीर रितीने पैसे देऊन,स्पॉन्सरशिप द्यायची सुरुवात केली, आणि अशाप्रकारे या दोन भावांच्या कंपन्यांनी एकमेकांवर मात करण्यासाठी खेळांमध्ये पैसा लावायला सुरुवात केली, आणि खेळामधे ऑफिशीयल स्पॉन्सरशीपची सुरुवात झाली !

#Rivalery_Continued:

या दोन कंपन्या मधली दुश्मनी एवढी वाढली, कि जेंव्हा Rudolf dassler यांचा मृत्यु झाला तेंव्हा Adolf (adi) dassler हे अंतीम संस्कारासाठी पण आले नाहीत,वैरभाव हा केवळ एका पिढी पुरती मर्यादित न राहता पुढच्या पिढ्या मध्ये सुद्धा आला ,आणि आजही 2021 मध्ये सुद्धा तो तेवढ्याच प्रकर्षाने कायम आहे.

#Stick_to_roots : आज भलेही या दोन्ही कंपन्या पूर्ण जगामध्ये आपला व्यवसाय करत असल्या , तरीही यांचे जागतिक हेडक्वार्टर आजही त्यांच्या जर्मनीतील मूळ गावी नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर आहे.

📌या खऱ्या स्टोरी मधून घेण्यासारखं खूप काही आहे,परंतु जर या दोन भावांमध्ये भांडण झालं नसतं,तर ही कंपनी आज फार मोठी राहिली असती.

📌त्यामुळे काहीही झालं तरी आपण आपलं कुटुंब एकसंध राहून फॅमिलीचा व्यवसाय पुढे नेला पाहिजे,हा बोध या स्टोरीतून घेता येऊ शकतो!

📌 आजही या दोन भावांच्या कंपन्या innovation आणि Sport marketing मध्ये नं 1 आहेत ?

“तुम्हाला कोणत्या कंपनीचे प्रॉडक्ट आवडतात”?

©निलेश काळे .
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट ,
आनंद पार्क,औध,पुणे.
9518950764 .
श्री ओमकेश मुंडे : 9146101663

Previous Post Next Post

One thought on “भावकीच्या वादातून जन्मलेल्या दोन कंपन्याची कहानी Adidas & Puma

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *