महिला / भगिनीनों तुमच्या गृहोद्योगासाठी काही टिप्स

अनेक मशीन्स घेऊन एकत्रीत गृहोद्योग असा करा .

आज काल महिला भगिनी देखील बिजनेसच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होताहेत .

एखादा प्रॉडक्ट निवडला जातो,मग गुगलला किंवा ओळखीच्या मदतीने मशीन खरेदी केली जाते आणि ओळखीच्या लोकांना सेवा देण्यापासून उद्योग सुरू होतो .

लिज्जत पापड या ब्रॅन्डमुळे महाराष्ट्राला महिलांच्या बिजनेस क्षमतेची कल्पना आलेली आहेच .

आता हा ट्रेंड सर्वत्र वाढत आहे , तर इथे एक सुधारणा सुचवावी वाटते ती अशी कि केवळ एखादी मशीन घेऊन गृहोद्योग चालु करण्यापेक्षा,एकाच छताखाली अनेक सेवा जर मिळाल्या तर ते अनेक वेळा यशस्वीपणे चालते.

समजा आपण पिठाची गिरणी चालवता, त्याच बरोबर मिरची कांडप,ग्राइंडर,अशी जोड दिली तर ग्राहकाची सोय होते आणि एक व्यावसायिक म्हणून आपल्या पण धंदयात वाढ होते.

ही एकत्रीत सेवा एकाच छताखाली मिळणे ग्राहकासाठी चांगलं असतं त्यामुळेच तर वेगवेगळे मॉल्स . यशस्वीपणे चालतात कारण ?

आता या ठिकाणी आपण चर्चा करतोय त्या मशीन्स म्हणजे,शेवई मशीन,पापड मशीन,इडलीपीठ मिक्सर , आणि ग्राइंडरची,यातलं फक्त ग्राइंडर सोडले तर,सर्व मशीन्स घरगुती professional लाईट कनेक्शन वर चालणाऱ्या मिळतात .

या सर्व मशीन्स अगदीच चांगल्या चालतात, सर्व छोटया मोठया शहरात आणि गावातसुद्धा .

मुद्दा दुसरा ….आपल्या कडे बजेट कमी असेल,तर या मशीन्स आपण सेकंड मध्ये घेऊ शकता काय आहे?? कि,कित्येक लोक महिलांच्या हौसेखातर मशीन्स घेतात,पण नंतर इंटरेस्ट संपला किंवा त्यांना अन्य जिम्मेदाऱ्या वाढल्या तर त्या मशीन्स घरात पडून रहातात आणि अगदीच कमी भावात मिळू शकतात .

या मशीन्स मध्ये खराब होण्यासारखं काही नसतंच,म्हणून आपण त्या मशीन्स घेऊन व्यवसाय यशस्वीपणे चालू करू शकता.

या व्यवसायासाठी,बचतगट,अनेक संस्था आर्थिक मदत करू शकतात, महिलासाठी सरकारची धोरणं ही पुरक आहेत .

पण स्वतः च्या आर्थिक बळावर केल्यास अधिक उत्तम,

या उद्योगासाठी परवाने देखील सेम तसेच लागतात जे इतर पुरुष व्यावसायिकांना लागतात, महिलाना म्हणुन परवान्यांमध्ये काही सुट नाही, बाकी इतर बाबींमध्ये सुट मिळू शकते .

अनेक महिला केवळ स्वतःच्या सर्कल मध्येच हा व्यवसाय करतात, परंतु आपण सोशल मिडियावरून चांगली जाहिरात केल्यास अनोळखी ग्राहक देखील आपल्याकडे येऊ शकतो , हे पक्कं लक्षात घ्या !

timely service, व्यवस्थित रेट्स उत्कृष्ट पॅकिंग आणि विक्री नंतरची सेवा दिल्यास आपला हा व्यवसाय बारामाही चांगला चालेल .

आपण हा multi machine service business स्वताःच्या जागेत किंवा किरायाच्या जागेत सुद्धा हा उद्योग करू शकता .

अजून एक गोष्ट अशी कि, दुसऱ्यांच्या वस्तू तयार करून देता देता , आपण स्वतःचा ब्रँडने पण उत्पादने बाजारात आणू शकता.

हा सेवा उद्योग आहे , त्यामुळे स्वभावातील नम्रपणा आपणास वाढवावा लागेल,जेवढे आपण नम्र तेवढे ग्राहक जास्त,नफा जास्त आणि पैसा जास्त .

अशा प्रकारे आपण हा उद्योग उभारून स्वयंसिद्ध होऊ शकता .
तेंव्हा सिद्धतेसाठी शुभेच्छा ..

© निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्स्टंट्सस
5th Floor, विघ्नहर चेंबर्स
अभिनव चौक, नळस्टॉप
पुणे .
9518950764.

Office: 9146101663

Previous Post Next Post

One thought on “महिला / भगिनीनों तुमच्या गृहोद्योगासाठी काही टिप्स

  1. मला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे
    मी सध्या रोजच्या जेवणात वापरली जाणारी चटणी तयार करून ऑनलाईन विकते याच बरोबर इतर मसाले बनविण्यासाठी मला काही माहिती मिळेल का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *