माणसाच्या डोक्यात “हे” बटन आहे जे दाबलं कि पटकन खरेदी होते

“माणसाच्या डोक्यात “हे” एक बटन आहे जे दाबलं कि पटकन खरेदी होते” ..

📌 माणसाचा मेंदू किचकट अवयव आहे, ज्याप्रमाणे मनुष्य अवकाशात ग्रहताऱ्यांच्या शोधतोय,त्याचप्रकारे नेमका आपला मेंदू बनलाय कसा?तो कसे निर्णय घेतो ? याचासुद्धा शोध तितक्याच वेगाने घेणे चालू आहे.

रोज वेगवेगळ्या गोष्टींचे शोध लागताहेत,रोज वेगवेगळे निकष समोर येताहेत आणि त्याचा उपयोग आयुष्याच्यातल्या प्रत्येक क्षेत्रात करून घेता कसा येईल ?याचा विचार त्या त्या क्षेत्रातील तज्ञ करत असतात.

मग मार्केटर कसे मागे राहतील????

म्हणुन तर न्युरोमार्केटिंगचा जन्म झाला

नुकताच संशोधनाअंती असा आढळलेले आहे की,माणसाच्या डोक्यामध्ये एक बाईंग बटन असतो जो कोणालाही खरेदी करण्यासाठी/ठरावीक कृती करण्यासाठी भाग पाडतो.

📌 आपल्या मेंदूचे तीन पार्ट आहेत (1) रेप्तीलियन ब्रेन ( सगळ्यात जुना )
(2 ) मिडल ब्रेन( थोडा जुना )
( 3 )cortex brain ( मेंदूचा नवीन पार्ट …. हा पार्ट 4 मिलियन वर्षापूर्वी तयार झाला असे मानतात, तरिही नवीनच )

📌Reptelion Brain

आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की उत्क्रांतीच्या दरम्यान सगळेच प्राणी हे एका अमिबा पासून तयार झालेले आहेत ,एक काळ असा होता की मनुष्य देखील सरपटणारा प्राणी होता, त्याला सुद्धा शेपूट होतं, त्यावेळी जो माणसाचा मेंदू पुर्ण डेव्हलप झालेला नव्हता, पण मेंदू होता ,तोच अजूनही आपल्या मेंदूचा एक पार्ट बनून आहे, मेंदूच्या त्या भागाला रेप्टीलियन ब्रेन म्हणतात किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू असं म्हणलं जातं

उत्क्रांतीच्या दरम्यान माणसाचा मेंदू हा विकसित झाला आणि मिडल आणि न्यू ब्रेन (cortex ) हे दोन भाग तयार झाले.

पण झटक्यात एखादा निर्णय घ्यायचा हे काम हाच रेप्टीलियन ब्रेन करतो

क्रांतीवीर, या पिक्चरमध्ये नाना पाटेकर सारखं म्हणतात … यहाँ पर नही मारने का !यहाँ छोटा दिमाग होता है ! यहाँ पर मारो तो इन्सान को गुस्सा आता है ! तोच तो ब्रेन 😊

Neuro marketing

आपण साधारणपणे ग्राहकांची जी गरज आहे त्या गरजेच्या अनुरूप प्रॉडक्ट किंवा सर्विसेस मार्केटमध्ये आणतो आणि ती त्या ग्राहकांना दाखवतो त्यावेळी ची मार्केटिंग केली जाते त्या मार्केटिंगला नॉर्मल मार्केटिंग असेच म्हणलं जातं.

पण अनेक लोकांच्या हे लक्षात आलं की या मार्केटिंगचा उपयोग होत नाही, हे लक्षात आलं तर मग त्यांनी विचार केला की वेगळ्या प्रकारे मार्केटिंग करूया आणि जन्म झाला, न्यूरोमार्केटिंग या नवीन प्रकाराचा.

मार्केटर इतक्या चतुरपणे जाहिराती करतात की, आपण आपल्याला घ्यायची नसलेली देखील वस्तू खरेदी करून घरी आणतो ,याच प्रकाराला न्युरोमार्केटिंग म्हणतात.

********”*””*********************
थोडं ब्रेन सायन्स बघू

बाहेरचा सगळ्यात मोठा पार्ट तो कॉर्टेक्स ब्रेन असतो ,तो किचकट गोष्टी हँडल करायला बनलेला आहे ,तो ब्रेन लॉजिकली विचार करतो, प्रत्येक गोष्टीच्या मागचा-पुढचा, सारासार विचार करून तो निर्णय घेतो.

मिडल ब्रेन हा इमोशनली विचार करण्यासाठी बनलेला आहे आपल्या सगळ्या इमोशनस तिथून कंट्रोल होतात .

आज आपण जो बघतोय तो रेप्टीलियन ब्रेन : हाच तो ब्रेन आहे जो instinct वर निर्णय घेतो .

” मला वाटलं आणि मी केलं ” !

असा तो प्रकार !

याच ब्रेनला मानवाचं buying button म्हणतात , म्हणुन तर या मेंदूला भुरळ पाडली, याला मार्केटिंग मॅसेज दिसला कि , काहीही विचार न करता कोणताही मनुष्य खरेदीचा निर्णय करतो.

संशोधनाअती असं आढळलंय कि ,रेप्टीलियन ब्रेन पुढच्या पॉईंटसवर जरा जास्त चांगला रियैक्ट करतो.

📌 *(1) ME* : बऱ्याच ऍड अशा शुट केलेल्या असतात, जणू काही ग्राहकाच्या डोळ्याला हेच दिसतंय, अशा प्रकारच्या जाहीराती फार पटकन खरेदीचा निर्णय करायला लावतात , वर सायकलस्वाराच्या नजरेतून काढलेला फोटो बघा !

📌 (2)You:

बऱ्याच ऍड मधे अगदी प्रकर्षाने हे सांगितलेल असतं,जसं ,”Your choice ,you wanted it”!

तुमचं आवडतं ठिकाण

तुमचा आवडता नेता.

वगैरे वगैरे

या ठिकाणी समोरच्या बघणाऱ्याला वाटायला लागतं , “खरंच का? ” माझी चॉईस आहे का ही?.

असेल ,असेल ! मग घेऊ या

📌 (3)Contrast:
या प्रकारात मुद्दाम विरोधाभासी फोटो टाकलेले असतात , जसं वरील फोटोत कैलशीयम सप्लीमेंटची बघा.

म्हणजे? इतके पक्के व्हाल कि? हत्तीच्या पायाला सुद्धा झेलू शकता ! वॉव

📌 (4) Visuals:
ऑप्टीक नर्व्स रेप्टिलीयन ब्रेनला कनेक्टेड असतात , त्यामुळे समोर अॅडमध्ये कसा परिणाम होतोय ?हे दाखवलं कि , काम होतं !

📌 (5) Emotional
या प्रकाराचा वापर रस्त्यावरच्या सुचना देणाऱ्या बोर्डवर सर्रास होतो.

सिगारेटच्या पाकिटावर कॅन्सर बाधीत lungs दाखवणे हा असाच प्रकार आहे .

मोबाईल फोनमधुन डायरेक्ट रक्ताची चिळकांडी उडलेली दाखवायची आणि सांगायचं ” समोरचा ड्रायव्हिंग करतोय तर ???फोनवर बोलु नका ” !

*****************************

वरिल सांगितलेले प्रकार न्युरोमार्केटिंगचे आहेत,जे रेप्टेलियन ब्रेनला , तशा प्रकारे रोखतात किंवा लगेच फेवरेबल ऍक्शन घ्यायला लावतात.

हा मेंदू खरं तर Decision king आहे त्यामुळे यालाच instinct वर निर्णय घ्यायला लावा ! आपलं काम होतं , कारण ???

प्रत्येक माणसाच्या डोक्यात असणारा छोटा मेंदूच,कोणत्याही माणसाचं Buying Button आहे.

ते दाबायला शिका !

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

Business मध्ये विक्री वाढण्यासाठी कोचिंग हवीये? तर खालील नंबर वर संपर्क करा
ओमकेश मुंडे सर : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *