मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला टक्कर देऊन Zoom कसं बनलं नं 1 ऍप?

#Business_Coaching

#Zoom_Case_study .

©निलेश काळे .

Microsoft सारख्या जबरदस्त कंपनी कडे Skype हा व्हिडिओ कॉन्फरंसिंग प्लॅटफॉर्म होता,तरिही त्याच्या मागून येऊन Zoom सारखी नवखी कंपनी,मार्केटलिडर बनली.

आज Skype कुठेच नाही.
Google ने Google meet सारखा ऑप्शन दिला,तरिही Zoom ला त्याचा फरक पडला नाही.

📌लॉकडाऊनच्या या दिवसांमध्ये Zoom नावाच्या ॲपला फार सुगीचे दिवस आले ,लवकर प्रसिद्धी मिळाली मी स्वतः दोरी वर टाकली आणि फिशींगच्या समस्या आल्याने फार लवकर बदनाम पण व्हावं लागलं !

📌मध्यंतरी झूम ऍप वापरायला असुरक्षित आहे,चीनमधून त्याच्याद्वारे हेरगिरी केली जाते,खूप वावड्या उठल्या लोकांनी मोबाईल मधून ॲप डिलीट करायला चालू केलं,अनेकांना हे ॲप वापरणे व सुरक्षित वाटू लागलं तर मग चला जाणून घेऊया या ॲपच्या पाठीमागची कहाणी.

📌Eric yuan हे एक सॉफ्टवेअर इंजिनिअर ऐंशीच्या दशकात ते चीनमधून अमेरिकेत जॉब करण्यासाठी गेले .

📌वेळेपासूनच यांच्या डोक्यामध्ये ही आयडीया होती की सर्वसामान्यांना परवडेल असं व्हिडिओ कॉलिंग सॉफ्टवेअर बनवायचं.

म्हणजे पुढे येणाऱ्या एका संधीची प्रचिती या माणसाला खूप वर्ष अगोदरच झाली होती, त्यांनी लोकांना लागेल कमी पडेल असे आयडिया वर काम फार पूर्वीपासून चालू केलं होतं ज्याचा फायदा जगाला आणि Zoom ला पण 2020 मध्ये झाला .

📌 इरिक युआन यांनी अमेरिकेतल्या WebX Commnnications नावाच्या एका कंपनीमध्ये डेवलपर म्हणून नोकरी चालू केली 2002 पासून WebX ने व्हिडीओ कॉलिंग साठी एक सॉफ्टवेअर तयार करायला घेतलं होतं, खरतर ही पहिली कंपनी जिने या सारख्या प्रकल्पावर काम करण्याचा प्रयत्न चालु केला आणि ते त्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी पण झाले.
पण यांचं काम कंपन्यांच्या काम कॉरपोरेट मीटिंग पुरतं मर्यादित होतं.

📌 तरीही देखील या काळात हे सॉफ्टवेअर बर्‍यापैकी यशस्वी झालं , या सॉफ्टवेअर मध्ये बऱ्याच गोष्टीची कमतरता होती, इंटरनेटची स्पीड कमी झाली की मिटिंग मध्ये प्रॉब्लेम यायचा, आवाजाची स्पष्टता नव्हती ,व्हिडीओ क्लिअर दिसत नसे आणि लोकांची एकमेकांबरोबर असणारी चर्चा अर्धवट थांबायची.

📌 इरिक कंपनीमध्ये असताना अनेक वेळा ग्राहकांचे फोन ऐकायचे त्यातून त्यांना एक गोष्ट लक्षात आली की ग्राहकांच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि ही कंपनी ग्राहकांचं पाहिजे असं समाधान करत नाही, एखाद्या व्यवसायासाठी आनंदी ग्राहक ही फार मोठी संपत्ती असते पण या कंपनीने ग्राहकांच्या मागणीकडे ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं,

📌 बऱ्याचदा अनेक व्यवसाय थोडेफार यश भेटलं की हुरळून जातात, पण यांचं नशिब की या कंपनीला Cisco नावाच्या कंपनीने 3.2 बिलियन डॉलर मध्ये विकत घेतलं आणि इरिक प्रवास आता सिस्को बरोबर चालू झाला होता.

📌 खूप जास्त काळ एखाद स्वप्न बरोबर घेऊन जगनं अनेकांना जमत नाही परंतु 1980 च्या दशकापासून फक्त आपलं स्वप्नं हे व्हिडीओ कॉलिंगने दुनियेला जोडण्याच्या संदर्भात ठेवलेल्या इरिकने 2010 साली अजून 40 इंजिनियर बरोबर सिस्को मधील नोकरी सोडली

📌 2011 साली इरिक आणि त्यांच्या मित्रांनी मिळून तीन मिलियन डॉलर्स एवढी ही रक्कम उभा केली आली तिथून पुढे प्रवास चालू झाला Zoom App तयार करण्याचा.

📌 इरिक यूआन यांना सुरुवातीला WebX आणि त्यानंतर Cisco मधील अनुभव असल्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच आपलं लक्ष फक्त ग्रुप व्हिडिओ कॉल आणि चॅटिंग याच्यावरच केंद्रित केलेलं होतं.

📌 पुढे प्रश्न आला भांडवलाचा , आपली मुलं बँकांकडे किंवा महामंडळाकडे कर्ज मागत फिरताना दिसतात पण आपल्याकडे एखादी चांगली दणकट आयडिया असली कि अनेक लोक आपल्याकडे पैसे घेऊन येतात या लोकांना एंजल इन्वेस्टर असं म्हणलं जातं.

📌 खरं तर Zoom ॲप मार्केटला येण्याअगोदर ,मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांचं क्रमाने Skype आणि Hangout नावाची ॲप्स होतीच पण ज्या माणसाने आपली स्वप्नं फार काळ बाळगलेली असतात त्यांच्या समोर मोठाले स्पर्धक सुद्धा काही करू शकत नाहीत,अशाच प्रकारे Eric आणि Team च्या स्वप्नाच्या आड या दोन्ही मोठ्या अवाढव्य कंपनी येऊ शकल्या नाहीत.

📌 याचं पहिलं आणि मुख्य कारण हे होतं की दुसऱ्या कंपन्यांनी Audio first त्यानंतर Videoचा विचार केला पण Zoom ने Video first आणिAudio चा नंतर विचार केला,

📌 Erics चं माननं असं होतं की, जेव्हा दोन माणसांमध्ये आय कॉन्टॅक्ट होतो त्यावेळी ते बोलणं जास्त प्रभावी होते , त्याच्यामुळे त्यांनी जेवढा शक्य होईल तेवढा लवकर दोन व्यक्ती मध्ये असणारा काय कॉन्टॅक्ट घडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले.

📌 2014 ते 2016 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात Zoom ला फंडिंग मिळाली आणि 2016 पर्यंत या कंपनीचं व्हॅल्युएशन एक बिलियन डॉलर पर्यंत गेलं.

📌 एप्रिल 2019 मध्ये Zoom ऍपची लिस्टिंग न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला “लिस्टेड कंपनी” म्हणून झाली.

📌 ज्या दिवशी या कंपनीची लिस्टिंग झाली त्यावेळी त्या कंपनीचं व्हॅल्युएशन 16 बिलियन डॉलर एवढं होतं पहिल्या दिवशी $32 ला ओपन झालेला या कंपनीचा स्टॉक 72% वाढला होता.

📌 आज मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यासारख्या अवाढव्य स्पर्धकासमोर उभा असणारा,हा यशस्वी प्रयोग एका माणसाच्या पागलपणातून उभा आहे.

📌 Zoom ऍपने तीन गोष्टी एकदम बरोबर केल्या

(1) Zoom ने लोकांचा मोठा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अपार कष्ट घेतले .

( 2 ) यांनी असा प्रॉब्लेम शोधला जो खूप लोकांना पडलेला असेल.

(3 ) झुमने नेहमी आपल्या ग्राहकाच्या आनंदाला जास्त महत्त्व दिले.

📌 सध्या ज्याप्रमाणे झूम बद्दल वावड्या उठवल्या गेल्या की हे चायनीज ॲप आहे हे अशा प्रकारच्या वावड्या 2018 साली देखील उठवल्या गेल्या होत्या परंतु झुमने या गोष्टीवर मात केली , बदल केला आणि आपल्या स्वतःचा यशस्वी होण्याचा मार्ग स्वतः सुकर केला.

📌 जेव्हा एखादी कंपनी फार मोठी यश मिळवते त्यावेळी त्याचे विरोधक हे त्याच्या विरोधामध्ये 100% काड्या करत असतात ,त्याचप्रमाणे आपण मध्यंतरी बघितलं ज्या संदर्भामध्ये अशा अफवा उठवल्या गेल्या कि हे ऍप चायनीज आहे .

📌परंतु वरच्या लेखातून तुमच्या लक्षात आले असेल कि जी कंपनी अमेरिकेच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये रजिस्टर झालेली असेल चायनीज कशी असू शकते?

📌 च्या थोड्याफार समस्या ग्राहकांना येत होत्या,मीटिंग दरम्यान जी काही फिशिंगच्या समस्या आल्या, त्याच्यावर झूम सिरीयसली काम करत आहेच परंतु एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की जो व्यक्ती या जगासाठी असणारा मोठा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करत असतो तो एक ना एक दिवस यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही.

📌 आज हे ॲप जगातल्या प्रसिद्ध ॲपच्या लिस्टमध्ये पहिल्या दहामध्ये येते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ॲप “चायनीज नसून अमेरिकन आहे ” .

📌 एकदा विश्वासाला थोडा जरी तडा गेला की,परत विश्वास ठेवणे मुश्कील असतं ,पण सत्य परिस्थिती काय आहे? हे जाणून घेणं आपलं काम होतं, त्याच्यामुळे झूम ॲपचा फॉरेन्सिक अभ्यास करायचं ठरवलं, आणि आज तुमच्यासमोर मांडला आहे.

बाकी या केसस्टडीतून एकच गोष्ट आपण शिकू शकतो,

📕तात्पर्य : “स्पर्धक कितीही मोठा असू दे,आपण आपल्या उत्पादनावर इतरांपेक्षा चांगलं काम केलं,कि कोणी माईचा लाल आपल्याला मागे टाकू शकत नाही ” .

बाकी निर्णय आपण करा .

असेच अभ्यासपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे पेज फॉलो करा !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा ,

© निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सल्टंट ,

9518950764

Office : 9146101663

Previous Post Next Post

One thought on “मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला टक्कर देऊन Zoom कसं बनलं नं 1 ऍप?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *