मार्केटला उठाव नाही,असं आपण म्हणतो,पण तुम्हाला डिमांडचे हे प्रकार माहितीयेत का ?

#Business_Coaching

#Types_of_DEMAND

©निलेश काळे.

📌जगातला कोणताही व्यवसाय घ्या, तो पुढीलपैकी एका मूलभूत तत्वावर आधारलेला असतो हे पुढील तत्त्व आहेत,

1) Need,
2) Want,
3) Demand ,

जे लोक म्हणताहेत आम्ही सेवा करण्यासाठी व्यवसाय करतोय !

तर समजून घ्या तो लबाड बोलतोय !
सेवा करणाऱ्या समाजसेवी संस्था असतात व्यवसाय नाही ! बिल गेट्स ने 99.99 % संपत्ती दान केली पण एक सॉफ्टवेअर सुद्धा फुकट वाटलं नाही कधी .

असो .

वरील तीन गोष्टी पैकी कोणत्या तत्त्वावर व्यवसाय उभा करावा म्हणजे तो फायदेशीर राहील ?असा प्रश्न अनेकजण विचारतात ,तेव्हा त्याचे उत्तर अतिशय साधं आहे, की मार्केट मध्ये असणाऱ्या मागणीचा म्हणजे डिमांड विचार करून त्याच्यावर आधारित व्यवसाय उभा केला तर तो कधीही ही संपत नाही.

📌 आपण आज पर्यंत याची बरीच चर्चा केली आहे की व्यवसाय हा आपल्या हौसेवर किंवा आपल्याला जे आवडतं त्याच्यावर होत नसून, मार्केटमध्ये कशाप्रकारे त्या वस्तूची किंवा सेवेची मागणी होते आहे, याच्यावर खूप वेळा अवलंबून असतो,

📌 Demand वाढली कि , मार्केटमध्ये त्या वस्तूसाठी ओढातान चालू होते , ग्राहक हा दुकानदाराकडे खेचल्यासारखा आकर्षित होतो आणि याला इंग्लिश मध्ये #PULL_System असं म्हणलं जातं.

📌 ही ओढ तयार होते ती डिमांड मुळे,पण या डिमांड वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात, त्यांचा अभ्यास महत्वाचा आहे .

📌Philip koltler यांनी मॅनेजमेंट च्या विदयार्थ्यांसाठी फार महत्वाचं लेखन करून ठेवलय त्याचाच हा सारांश आहे !

📔 (1) Negative Demand
नावा मध्येच याचं बरचं काही सामावलेलं आहे,जी गोष्ट लोकांना नकोशी वाटते,परंतु तरीही देखील करावी लागते ,कारण इथे लोकांची मजबुरी आहे,त्याला निगेटीव डिमांड म्हणतात .

उदा. दवाखान्याचा खर्च, दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हावं लागणे, वकिलाची पायरी चढावी लागणे,etc

हा बिझनेस प्रकार देखील यातच येतो .

याचं कारण असं आहे कि, हसी-खूशी या गोष्टींसाठी कोण तयार होईल ?

इथे लोक मजबूरी म्हणून येतात,जर मजबूरी नसेल ,कोणीही आजारी नाही आणि एखादया हॉस्पीटल ने अनाउन्स केलं कि , आम्ही एरवी डाएलिसीस 1000 रु त करतो , पण अमुक अमुक कारणामुळे पुढचा पंधरवडा 100 रु त करू !

📌 अरे आपल्या घरात कुणी बिमारच नाही ! तर मग अशा प्रकारच्या ऑफर बघून सुद्धा काही फायदा आहे का ? नाही ना ?

म्हणून याला निगेटीव डिमांड म्हणतात .

📘 (2) #Non_Existing_Demand

📌काही व्यवसाय असे असतात की ज्यांची मार्केटमध्ये डिमांड तयार करावी लागते ,ग्राहकांना हे माहीतच नाहीये की ,मला याची गरज आहे का नाही? म्हणजे जी गरज अस्तित्वातच आहे का नाही? हे ग्राहकाला पक्क माहित नाही ,तेव्हा अशी डिमांड निर्माण केली जाते ,कारण विक्रेत्याला त्याची सेवा किंवा वस्तू विकायची आहे !

वास्तुशास्त्रज्ञ ,भविष्यवेत्ते ,ज्योतिषी क्रीम ,पावडर ,लोशन, किंवा अगदीच नवीन कॅटेगरी .

या सगळ्या व्यवसाय प्रकारांना याच्यामध्ये घेता येणं शक्य आहे , कारण याची गरज एकतर मार्केटला तयार केली गेली आहे आणि यांना सातत्यपूर्ण रीतीने तयार करतच राहावे लागते ग्राहकाला सांगावं लागतं , कि बाबा तुला याची गरज आहे आणि त्यावेळेला ग्राहक खरेदी करायला तयार होतो.

याच्यासाठी प्रॉडक्ट मध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन करावं लागतं, आणि मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करावं लागतं.

या दोन्ही गोष्टी केल्या ,तर जी गरज अस्तित्वातच नाही याची सुद्धा विक्री करता येणे शक्य आहे !

मार्केट सेंट होते,अत्तरे होती,सुगंधी तेलं होती तरी बळजबरीने DEO करिता जागा तयार करण्यात आलीच कि , नंतर Deo stick आल्या , नंतर पॉकेट डिओ आले >> सबकुछ तयार केलं गेलं .

📘(3) #Latent_Demand

Latent या शब्दाचा अर्थ सुप्त अवस्थेत असलेली जी मागणी.

ही उघड उघड दिसत नाही ,परंतु अनेकांच्या मनामध्ये आहे.

एखाद्या वस्तूची मार्केटला मागणी आहे पण ती मागणी पूर्ण करू शकेल असं सोलुशन कोणाकडेच नाही,आणि जे प्रोडक्ट मार्केटला आज उपलब्ध आहेत ते या वस्तूची किंवा या प्रॉब्लेम ची पूर्तता करू शकत नाही,

जर आपण या प्रॉब्लेम करिता व्यवस्थित उत्तर मार्केटला दिलं, एखादा प्रॉडक्ट असा तयार करून दिला की,जो या प्रकारच्या मागणीची पूर्तता व्यवस्थित करू शकेल तर लोक त्याचं नक्की स्वागत करतील,

उदा. हे समजावून घ्या की आज कोरोनावर औषध ही सगळ्या लोकांची #Latent_डिमांड आहे.

कारण आज सध्या घडीला जे औषध उपचार उपलब्ध आहेत, ते यासाठी उपयोगाचे नाही. म्हणजे एक मोठं मार्केट या गरजेसाठी उपलब्ध आहे .

( Covid-19 संबंधी जाहिरातीवर गुन्हे दाखल करण्याचा कायदा केला नसता, तर आज सगळ्या प्लॅटफॉर्मवर कोरोना औषधाच्याच फेक जाहिराती असत्या )

या प्रकारची डिमांड सुद्धा मार्केटमध्ये असते याचा आपण एक व्यावसायिक म्हणून शोध घेतला पाहिजे.

📕 (4) #Declining_demand

मार्केटमध्ये प्रत्येक उत्पादनाची एक लाईफ असते ,आपण त्याला प्रॉडक्ट लाइफ सायकल असं म्हणतो.

त्या product Life Cycle च्या टॉपी क मध्ये आपण बघितले की विशिष्ट उत्पादनाची मागणी काही कालावधीनंतर कमी व्हायला लागते, त्या ठिकाणी आपण प्रमोशन करू दे, मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करू दे, किंवा सेल्स ऍक्टिव्हिटी करू दे, काहीही उपयोग होत नाही.

एकदा का समाजामधे या वस्तूची मागणी कमी व्हायला चालू झाली कि , त्याची मागणी वाढवणे खरोखर अवघड होऊन बसतं अशा प्रकारच्या घसरत्या मागणीला declining demand असं म्हणलं जातं.

📌 Land line फोन बद्दल आपण मार्केट मध्ये बघू शकता, या पूर्ण कॅटेगरी ची मागणीच कमी होऊ लागली आहे ,कारण याच्या आपले दोष दूर करून मोबाईल ने स्वतः एक वेगळे अस्तित्व निर्माण केलेय ,

तर मागणी कमी होण्या पाठीमागे काय कारण असु शकतात ?

1) ग्राहकाची आवड बदलणे .
2) innovation ची कमतरता असणे.

Rebranding repositioning करून आपण declining demand ला वाढवू शकतो.

TATA मोटर्स नी , त्यांच्या baleno चं Rebranding केलं !

Bajaj ने चेतक स्कुटर्ससाठी ही स्ट्रॅटजी वापरलीच कि .

Eicher Motors ने मोठ्या प्रमाणावर R&D करून , Bullet ला सोन्याचे दिवस आणले .

ते सबकुछ त्यांचा Decline Sales बघूनच !

📔(5) #Irreguler_Demand

मार्केट मध्ये काही उत्पादने अशा प्रकारचे असतात की,ज्यांची मागणी एका ठरावीक काळापुरतीच
असते,

हे अगदी नैसर्गिक आहे,ठराविक काळामध्ये त्या वस्तूचा वापर लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होतो आणि एकदा का तो काळ संपला की त्या वस्तूचा वापर एकदम कमी होऊन जातो.

मग भलेही विक्रेत्याने या प्रकारच्या वस्तूंवर कितीही ऑफर दिल्या, कितीही जास्त सुविधा दिल्या तरी त्याचा ग्राहकांच्या खरेदी प्रक्रिया वर कसलाच परिणाम होत नाही,

पण ज्या वेळेला तो काळ येतो ज्या वेळेला त्या वस्तूची निकड भासायला लागते त्या वेळेला मात्र दोन पैसे आगाऊ देऊन सुद्धा लोक खरेदी करतात.

नवीन व्यावसायिकाने या गोष्टीकडे आपलं पूर्ण लक्ष दिलं पाहिजे कि वस्तूंचं देखील एक कालचक्र असतं काही विशिष्ट वस्तूंचा त्या सिझन मध्येच विक्री होते ती विक्री होऊन जाते याला सीजन ऑफ द प्रॉडक्ट सेल असं म्हणलं जातं.

या प्रकारच्या मागणीला सीजनल डिमांड असं म्हणलं जातं.

आज जर कोणी रंगपंचमीचे रंग किंवा फटाके 50% डिस्काऊंटवर दयायला चालु केले तर तुम्ही घ्याल का ?

ही सिझनल डिमांड आहे . हे लक्षात ठेवा !

(6) #Unwholesome_demand

हा देखील निगेटिव्ह डिमांडचाच एक प्रकार आहे.

इथे सरकारला किंवा समाजाला असं वाटतं की,या विशिष्ट प्रोडक्टची मागणी कमी व्हायला पाहिजे .

त्यासाठी सरकार आणि समाजसुद्धा आटोकाट प्रयत्न करत असतो,

या डिमांडच्या विरुद्ध अगदी पूर्ण समाज, एक प्रकारे जागृत होऊन कॅम्पेन करत असतो.

परंतु काही लोक या प्रकारच्या उत्पादनाला मोठ्या जोशात खरेदी करायला येतात.

म्हणजे काही लोकांसाठी ही डिमांड वाढायला नकोय आणि काही लोकांना वाढणे फार महत्त्वाची आहे.

गुटखा, तंबाखू ,सिगरेट, दारू या प्रकारचा उत्पादन सरकार प्रमोट करत नाही किंवा कायद्याने त्याच्यावर अनेक बंधने घालून ती मागणी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो ,परंतु काही लोक असे असतात की ते या उत्पादनासाठी अव्वाच्या सव्वा किमती द्यायला तयार असतात.

म्हणून या प्रकारच्या मार्केट डिमांडला अन्होलसम डिमांड असं म्हणलं जातं.

या प्रकारच्या व्यवसायाला विशेष जाहिरात करायची गरज पडत नाही, कारण इथे ग्राहक हा व्यसनी असतो, त्याला कोणीतरी थोडाबहुत अनुभव दिला की तो कायमस्वरूपी ग्राहक होऊन जातो.

📔 (7)#Full_Demand

याच्या नावा मध्येच बरच काही सांगून दिलं गेलंय ,एखाद्या प्रॉडक्ट ची मार्केट मध्ये अत्यंत चांगली मार्केटिंग झालेली असते, ग्राहकांना ती वस्तू किंवा ती सेवा आवडायला लागलेली असते ,

ते याबद्दलची माहिती एकमेकांबरोबर शेअर करत असतात

रेफरन्सने म्हणा किंवा चांगल्या मार्केटिंगमुळे म्हणा याची विक्री काही केल्या कमी होत नाही, या अशा प्रकारच्या मागणीला फुल डिमांड असे म्हणले जाते.

आपले उत्पादन किंवा आपली सेवा ही फुल रिमांड मध्ये रहावी हेच एखाद्या व्यवसायाचं खरं स्वप्न असतं.

📕 (8) #Over_full_demand

ज्या वेळेला मार्केटमध्ये एखाद्या उत्पादनाचं किंवा एखाद्या सेवा व्यवसायाची मागणी प्रचंड असते परंतु ज्या प्रकारे त्याची मागणी असते त्याची पूर्तता करणे त्या व्यवसायाला शक्य होत नाही अशा प्रकारच्या परिस्थितीला ओव्हर फुल डिमांड असं म्हणलं जातं

फुल डिमांड मध्ये जेवढी मागणी असते तेवढा पुरवठा होऊ शकतो परंतु ज्या वेळेला मागणी एका क्षमतेपेक्षा पुढे जाते अशा वेळी उत्पादक कंपनीला किंवा व्यवसायाला त्याची पूर्तता करणे शक्य होत नाही

तसं पाहिलं तर ही परिस्थिती देखील घातक असते कारण अशाप्रकारे वातावरणामध्ये स्पर्धक तयार व्हायला चालू होतात आपण स्वतः ग्राहकाच्या मागणी पुरते उत्पादन करू देत नसल्यामुळे देखील आपण या गोष्टीला अटकाव करू शकत नाही

📌 इथे एक तर स्वतःची क्षमता वाढवून ग्राहकांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात येतात किंवा स्पर्धक उभा राहतोय हे बघत शांतपणे बसावं लागतं, आपल्याजवळ मागणी असतानासुद्धा फक्त तेवढा सप्लाय करता न येणे असा अनुभव यावा अशीही परिस्थिती या प्रकारच्या डिमांडमध्ये असते.

जसं सहा महिन्यापूर्वी सॅनिटायजर आणि मास्कची मागणी अचानक वाढली,ज्या कंपन्या हे पुरवण्याचा प्रयत्न केल त्या सुद्धा भiवावून गेल्या !

मागणी आहे ,पण तेवढा माल आणायचा कुठून ?हा प्रश्न होता .

अशी ही डिमांड ! बुद्धीबळाच्या चालींसारखी असते, इथे आडमुठेपणानं खेळून चालत नाही ! मार्केटची चाल नीट ओळखूनच आपली चाल खेळायची ! तरच यश मिळतंय !

नाही तर मग आहेच आपलं कारणे सांगणं !

“मी खूप प्रयत्न केला,पण मार्केटला रिस्पॉन्सच येईना ! ”

© निलेश काळे .
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क , औंध , पुणे .
9518950764

Office ; 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *