मार्केटला नवीन असताना,कशाप्रकारे एक नाही तर दोन दिग्गजांना थेट धडक दिली जाते : Redbull Story

मार्केटला एकदम नवीन असताना कशा प्रकारे, एक नाही तर दोन दिग्गज कंपन्याना थेट धडक दिली जाते? : Redbull Story

📌 मार्केटला वेग वेगळ्या प्रकारचे सॉफ्टड्रिंक मिळतात पण कधी तुमची नजर रेडबुलच्या कॅन वर गेली आहे का? कोण आहे ते कंपनी ? यांचा एकच प्रॉडक्ट मार्केटला दिसतो ,परंतु अनेक खेळाडूंच्या खेळामध्ये यांची मार्केटिंग दिसत ? काय वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे या कंपनीच्या यशाच्या मागे?

📌 “Redbull” हा एक ऑस्ट्रीयन ब्रॅन्ड आहे , ही एक मल्टीनॅशनल कंपनी असून, त्यानी गेल्यावर्षी 7.5 billion एनर्जी ड्रिंकचे कॅन विकले , आणि निव्वळ नफा 6.5 billion म्हणजे अंदाजे 49000 करोड रुपये ..

📌 यांच्या मालकाच्या दोन F1 (formula one Race teams) ,
5 प्रोफेशनल फुटबॉल क्लब्स ,
1 आईस हॉकी टीम ,
हजारो खेळाडूंना वैयक्तीक स्पॉन्सरशीप
स्वतःचं Inhouse ,Media production Unit, आहे .

📌 ही एक एनर्जी ड्रिंक बनवणारी कंपनी असली तरी यांचा फंडाच वेगळा आहे
ही कंपनी फक्त पैसे बनवण्याची मार्केटींग मशीन आहे !
हे लोकं 0.09 सेंट ( पैश्यात ) तयार होणारं उत्पादन ,3.97 डॉलरला रिटेलला आणि 1.87 डॉलरला होलसेलमध्ये विकतात , म्हणजे होलसेलमध्ये विकून सुद्धा विसपट नफा ! कसं जमवलंय त्यांनी हे सगळं ? वाचा पुढे !

(1) #दुसऱ्याची_आयडीया_आपलं_डोकं :

साल होतं 1982 , Mateschitz नावाचा एक ऑस्ट्रीयन बिझनेसमन भलामोठा विमानप्रवास करून थकून थायलंडला पोहचतो ( या थकव्याला जेटलॅग म्हणतात )तिथे पोहचल्यावर काहीतरी प्यायचं म्हणून एक लोकल ड्रिंक #Krating_Ding ,घेऊन पितो, पाच मिनिटात थकवा गायब…….
त्याला फ्रेश वाटायला लागतं , एका साध्या ड्रिंकमुळे.

त्याचे डोळेच उघडतात आणि दिसते बिझनेस संधी ! कारण असलं काहीही युरोपात मिळत नसायचं !

ठरलं हे ड्रिंक युरोपात घेऊन जायचं !

************************
(2) #Negotiation_and_collaberation:

दरवेळेला एखादी गोष्ट आपणच तयार करायला पाहिजे असं काही नाही, चर्चा करून/ भागीदारी करून किंवा त्या व्यवसायाच्या बदल्यात समोरच्या व्यक्तीला पैसे देऊन स्थिर असणारा बिजनेस पूर्णपणे विकत घेता येतो. फक्त याच्या साठी आवश्यक असते ती म्हणजे चर्चा करण्याची कला यांनी या कंपनीच्या मालकाबरोबर चर्चा करून हे ड्रिंक ऑस्ट्रिया मध्ये लॉन्च करण्याची तयारी सुरू केली.

************************

(3) #Catergory_नाहीये_मग_तयार_करा!

हे ड्रिंक ऑस्ट्रेलिया ला घेऊन जायचं ठरलं तर खरं पण तिथे अशा प्रकारची कोणती कॅटेगरी नव्हती.

खरा बिजनेस मला कुठेही अडत नाही, जी गोष्ट नाहीये ती गोष्ट तयार करणारयालाच तर खरा बिझनेसमन म्हणायचं आणि या माणसाने Energy Drink नावाची एक नवीनच कॅटेगरी तयार करून टाकली आणि आज ही कंपनी एनर्जी ड्रिंक बनवणारी जगातली नंबर1 ची कंपनी आहे , यांना सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी नकार दिला, हे अनेक लोकांजवळ गेले त्यांनाPlan समजावून सांगितला पण हा बिजनेस प्लान युरोपियन लोकांच्या डोक्यात गेला नाही ,इतकं की अगदी कोका-कोला आणि पेप्सी यासारख्या मोठ्या बलाढ्य खेळाडूंनी सुद्धा या कॅटेगरी कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि रेड बुल या कंपनीला एनर्जी ड्रिंक च्या क्षेत्रामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करायची मोठी संधी मिळाली,
म्हणून मार्केटला घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घडामोडीची माहिती एखाद्या व्यवसायिकांना ठेवली पाहिजे. आपण ज्या कडे दुर्लक्ष करतो, कधी कधी तीच गोष्ट मार्केटमध्ये हिट होऊन जाते,

*****************************
(4) #Adoptation_and_Focus_On_Target_Customer:

आता हा प्रॉडक्ट मुळात एक आशियाई देशातला प्रॉडक्ट असल्यामुळे याची चव सुद्धा ईकडच्या भौगोलिक परिस्थिती नुसार होती, पण युरोपातल्या देशात लोकांची चव त्यांची आवड ही वेगळी असल्यामुळे यांनी RedBull ने चवीमध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार बदल केले आणि लोकांना ती चव आवडू लागली ,तेंव्हा 1987 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रिया या युरोपीयन देशात पहिल्यांदा RedBull लाँच झालं, पहिल्या वर्षात यांनी दहा लाख कॅन विकले ,1992 मध्ये पूर्ण युरोपात ,1994 मध्ये इंग्लंडमधे आणि 1997 मध्ये अमेरिकेत यांची लाँचिंग झाली ! बघता बघता सेल वाढला .

********************

(5) #Market_and_Customer_Focus:

चांगल्या व्यावसायिकाला हे ओळखता आलं पाहिजे कि आपला ग्राहक वर्ग कोण आहे ? आणि त्याला अप्रोच कसं करायचं ? यांनी कॉलेजच्या फेमस विद्यार्थ्यांना आपला ब्रँड मॅनेजर बनवलं आणि त्यांच्या मार्फत आपलं प्रमोशन केलं ,खेळाच्या मैदानात फ्री सॅम्पल्स वाटले ,आणि वैयक्तीक खेळाडूंना स्पॉन्सरशीप दयायला चालू केली, एकच प्रॉडक्ट असल्याने नाव मोठं करण्यावर सतत भर दिला, आणि बघता बघता बार ,पब्ज, पाटर्या या मधला Redbull हा एक आवश्यक घटक बनला .
****************************

(6) #Marketing_Based_Business_Model:

हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे ,
एक गोष्ट लक्षात घ्या ,एकदा का ग्राहकाच्या नजरेत आपलं नाव मोठं झालं कि, ग्राहकच आपल्या ब्रँडचा आग्रह दुकानदाराजवळ धरतो,मग कुणी कितीही मोठा माईचा लाल आपल्याशी स्पर्धा करायला आला तरी काही फरक पडत नाही !
म्हणून यांनी उत्पादन आणि बॉटल फिलिंग या दोन कामांना इतरांकडे सोपवलं आणि आपण फक्त आणि फक्त मार्केटिंग आणि सेल्सकडे लक्ष दयायला चालू केलं ,त्यामुळे त्यांचे मोठ्ठे दोन कामं कमी झाले आणि लेजर फोकस तयार झाला ! यातून शिकायचं हे कि ,गाढव मेहनत करत बसायचं नाही ! याला डेलीगेशन /आऊटसोर्सिंग म्हणतात.

यांचं मार्केटिंगचं बजेट ,यांच्या टोटल कमाईच्या 1/3 आहे , त्यामुळेच तर कोणत्याही Extreme Sports मधे आपण Red Bullची ब्रांडींग पहात असाल ! यामुळे मागणी सतत वाढत रहाते ! एक प्रकारचा PULL निर्माण होतो .

*************************
(7) #Acquisition_Of_Teams:

खेळाच्या क्षेत्रात जेंव्हा पासून Adidas ने स्पॉन्सरशीप आणलीये, तेंव्हापासुन कंपन्यांना यातला फायदा दिसून आलाय ,म्हणुन तर रेडबुलने इथे लक्ष दिलं आणि फॉर्मुला 1 रेसच्या टिम ,फुटबॉलचे क्लब डायरेक्ट विकत घेतले,प्लेअर्स ना स्पॉन्सरशीप देताहेत त्यामुळे यांना मार्केटिंगसाठी प्रचंड फायदा झाला.

***********************
(8) #Integration_and_Its_Proper_Use:

स्वतःचा ब्रँड आहे ,खेळाच्या टिम आहेत ,मग स्वतःची एक कॅमेराटिम का नसावी ? म्हणुन यांनी स्वतःचा एक Extreme Media House काढलं,सबकुछ स्वतःचं ,म्हणजे खेळातल्या सगळ्या फोटोचा/ विडीओचा कॉपीराईट यांच्याकडेच ! याचा फायदा यांना मार्केटिंग मध्ये होतोय !

********************

(9) #Story_Performing :

इतर अनेक ब्रान्डस स्टोरी टेलींग वर मार्केटिंग करतात , पण Redbull , Story Performing करून दाखवतं .
सन 2012 मधे यांनी एक Extreme Sport केला होता ,Space मधुन एका खेळाडूने उडी घेतली होती तो खेळाडू Redbull चे पॅराशुट घेऊन उतरला ! या इवेंटला जगभरातून प्रसिद्धी मिळाली !
खर्च : 50 million डॉलर
फायदा : 6 billion डॉलर मूल्याची मार्केटिंग !

याला #Return_on_Marketing म्हणायचं आणि यामधे ही कंपनी मास्टर आहे , म्हणून तर फक्त एक आणि एक प्रॉडक्ट असताना ,Coca Cola आणि Pepsi सारख्या अवाढव्य स्पर्धकांना ही कंपनी पाणी पाजते ते पण …… मिनरल !

*******************

या स्टोरीतून शिकता येण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत , परत एकदा वाचा, विचार करा आणि आपल्या व्यवसायात अप्लाय करा !

मॅनेजमेंट विषयी अभ्यासपुर्ण लेख वाचण्यासाठी आपले पेज लाईक/ फॉलो आणि नक्की शेअर करा , लिंक खाली आहे .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

शुभेच्छा
©निलेश काळे ,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क , औंध ,पुणे.
9518950764
Office : 9146101663 .

Previous Post Next Post

3 thoughts on “मार्केटला नवीन असताना,कशाप्रकारे एक नाही तर दोन दिग्गजांना थेट धडक दिली जाते : Redbull Story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *