मोबाईलवर ग्राहकाशी बोलताना या “दहा” टिप्स वापरा,चांगला सेल होईल.

Mobile वरून ग्राहकाशी बोलताय?मग या दहा टिप्स वापरा :

📌 आपण बरेचदा याच ग्रुपवर असं वाचलेलं असेल की? विक्री घडवून आणण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे समोरासमोर भेट घेऊन किंवा व्हिडिओ कॉल वर चर्चा करून केलेली विक्री असते ,परंतु नवीन ट्रेंड आहे किंवा ही गरज आहे की ?आपण फोनवर बोलूनच विक्री घडवून आणावी लागते ,मग अशावेळी आपल्या हातातील मोबाइलला विक्री करण्याचे परफेक्ट साधन कसं बनवावं? याच्या अतिशय उपयुक्त अशा टिप्स देतोय.

📌 (1) Just Pickup The Phone :

ज्यांना कॉलवर विक्री करायची सवय नाही ,अशांसाठी सुरुवातीचे काही दिवस फार कठीण असतात .

“मी फोन कसा करू”?
” समोरच्याने कट केला तर” ? “समोरच्याने माझी ऑफर रिजेक्ट केली तर ” ?
“समोरचा नीट बोला नाहीतर” ?
” माझा अपमान झाला तर “?
“मग मी कसं समोरच्याला तोंड दाखवू”?

अशा अनेक गोष्टी फोन करण्याअगोदरच आपल्या डोक्यात यायला चालू होतात ,
आणि यांच्यामुळेच बरेच जण समोरच्या ग्राहकाला फोन करून ऑर्डर घ्यायचं टाळाटाळ करतात, पण एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे ?समोरचा व्यक्ती फोनवर आपला गळा दाबून शकत नाही .

त्यामुळेच प्रचंड मोटीवेटेड होण्याची आणि नंतर कॉल करण्याची वाट बघत बसू नका,जस्ट फोन उचला कॉल करा आणि ऑर्डर काढा.

📌(2) Salesman Voice नको:

मोबाईलवर ज्यावेळी आपण बोलायला चालू करतो त्यावेळी समोरचा व्यक्ती आपले हावभाव बघू शकत नाही, त्यामुळे तो आपल्या तोंडावर कशा प्रकारच्या भावना आहेत? हे त्याला समजू शकत नाही पण माणसांमध्ये समोरच्याच्या आवाजावरुन त्याच्या मनातील भावना समजून घेण्याची ताकद असते आणि आपला आवाज बरच काही सांगून जातो.
त्यामुळे टिपिकल सेल्समनसारखा आवाज नसावा ,आपल्या आवाजातील घाई आपल्या आवाजातील आतुरता ही समोरचा ग्राहक पटकन पकडू शकतो त्यामुळे आवाज आणि त्याचा टोन हा अतिशय प्रोफेशनल असावा.

📌(3) Call Timing :

जगातील जवळपास सगळ्याच कंपन्या या आपल्या ग्राहकांबरोबर फोनवर बोलत असतात, त्यांची कॉल करायची एक ऑफिशियल टाइमिंग ठरलेली आहे ,साधारणपणे 10:30 am ते 12:30 pm आणि दुपारी 2:30 ते4:30 या वेळेमध्ये जास्तीत जास्त कॉल केले जातात,
आणि नेमक्या या वेळांमध्ये कोणताही व्यक्ती जास्तीत जास्त बिझी असू शकतो ,त्याला अनेक लोकांना बोलायचं असतं,अनेक लोकांचे कॉल असतात मग आपणही त्याच गर्दीमध्ये कॉल केला तर तो व्यक्ती साधारणपणे इतरांसारखाच आपल्याला बोलणार, आपण इतरांपेक्षा वेगळे ठरायचं असेल तर आपली कॉल करायची टाइमिंग हीसुद्धा वेगळी असली पाहिजे.

एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा व्यापारी किंवा एखाद्या व्यावसायिक सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या वेळेमध्ये ऍक्टिव्ह असतो, मग करा ना फोन ???? सकाळी लवकर करा किंवा संध्याकाळी उशिरा करा ,या वेळेमध्ये त्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही त्याचा मूड चांगला असू शकतो ,अशा वेळेमध्ये त्याला कॉल करा.

📌(4) Stand up and Call:

आपण सिनेमांमध्ये अनेकदा बघितलं असेल की,,,, सीन असा असतो, “एखाद्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा फोन लहान पोलिस अधिकाऱ्याला येतो आणि हा ईकडचा लहान अधिकारी फोन घेतल्यानंतर उभा राहून बोलतो.

बसून बोलणे आणि उभे राहून बोलणे याच्यामध्ये एक शरीरशास्त्रीय बदल आहे, जगातले सगळे नेते /सगळे शिक्षक /सगळे वक्ते हे उभे राहून बोलतात.

आपल्या शरीरामध्ये पोटाच्या वर आणि छातीच्या खाली डायफ्राम नावाचा एक पडदा असतो ,ज्यावेळी आपण उभे राहून बोलतो त्यावेळी त्याची पोझिशन परफेक्ट होते आणि आपल्या आवाजाचा टोन हा कॉन्फिडन्ट येतो ,,,तेच आपण बसून बोलत असू तर डायफ्रामची पोझिशन ही वेगळी असते आणि आपला आवाज आपोआपच बारीक या लागतो त्यामुळे ज्या वेळी आपण फोनवर बोलाल त्या वेळी शक्यतो उभे राहून बोला.

📌(5) Use Headset :

मनुष्य ज्यावेळी हातवारे करून बोलतो, त्यावेळी त्याच्या मनातील भावना उत्कटपणे समोर येतात, त्यामुळे बघा !जे लोक हातवारे करून बोलतात हाताची हालचाल करून बोलतात ,ती लोक निर्भिडपणे बोलतात, ते लोक खरं बोलतात ते लोक जास्त परिणामकारक बोलतात, परंतु आपल्या डाव्या हातामध्ये मोबाईल असेल आणि आपण समोरच्याला बोलत असू, तर आपसूकच आपले हातवारे होणार नाहीत.

जर आपल्या कानाला हेडफोन असतील ,तर आपण निर्धास्तपणे दोन्ही हाताने हातवारे करत बोलू शकतो ,त्याच्यामुळे एक कॉन्फीङन्स तयार होतो आणि आपलं बोलणं परिणामकारक होतं ,त्यामुळे सध्या सुविधा उपलब्ध आहे ,आपण चांगल्या क्वालिटीचे हेडसेट वापरू शकतो, आणि ग्राहकाशी फोनवर बोलत असताना हे हेडसेट वापरणं कधीही जास्त चांगलं.

📌(6) Always close to next step:

समजा आपण समोरच्या व्यक्तीला कॉल केलेला आहे आणि तो व्यक्ति बिझी आहे किंवा आपलं बोलणं थोडं फार झालं, आता इथे त्याला घाई असेल आणि तो म्हणत असेल की “आपण नंतर बोलू या”, तर अशा वेळी काय करावे ?अशावेळी आपण फोन ठेवण्याच्या अगोदर समोरच्या व्यक्तीला त्याच्याकडून पुढच्या कॉल करिता वेळ मागून घ्यावी आणि आपण शार्प त्यावेळेला फोन करावा, त्या व्यक्तीने आपल्याला वेळ दिलेली आहे त्यामुळे तो व्यक्ती आपले बोलणे नाकारू शकत नाही आणि आपला कॉल पूर्ण होऊ शकतो.

(7) Keep your figures in front of you :

तुम्ही कधीच एखाद्या न्यूज चैनल वर असणारी डिबेट बघितलेय का? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे नेते आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आलेले असतात.

याच्यामध्ये अशा पक्षांचे नेते त्यांना उत्तर द्यायचे आहेत ,हे लोकं स्वतः समोर काही कागद घेऊन बसलेली असतात ,या कागदांवर आकडेवारी असते ,काही माहिती असते , जी माहिती ते लोकं लगे लगे समोर मांडतात.

आपण सुद्धा ज्या वेळेला ग्राहकाला फोन करू त्या वेळेला सगळे आकडे, सगळ्या किमती आपल्याला आठवतील असं काही नाही ,त्यामुळे शक्यतो आपल्यासमोर लिखित स्वरूपातील कागदा असावा, त्याच्यावर महत्त्वाच्या आकडे किंवा महत्त्वाच्या तारखा असतील आणि त्या आपण ग्राहकांबरोबर शेअर करू शकतो.

(8) Listen to your sales Call:

एखादी गोष्ट ज्या वेळेला आपण परत एकदा करतो, त्या वेळेला आपण सुरुवातीला झालेल्या चुका यामध्ये नीट बघू शकतो ,कोणत्याही सेल्स कॉलचं देखील असच आहे.

सध्या जवळपास प्रत्येक मोबाईल ला कॉल रेकॉर्डिंग ची सोय आहे ,जर समजा एखादा कॉल आपल्या हातातून निसटला किंवा एखाद्या ग्राहका बरोबरची विक्री यशस्वी होऊ शकली नाही ,तर ती का झाली नाही? आपल्याकडून काही चुकलं का? हे जाणून घेण्यासाठी त्या ग्राहकांबरोबर झालेला संवाद हा आपण परत एकदा नीट ऐकावा !यातून काय होतं ?आपली झालेली चूक आपल्या लक्षात येऊ शकते ,समोरच्याची मानसिकता काय होती ?हे आपल्या लक्षात येऊ शकतं आणि अशाप्रकारे पुढच्या कॉल करिता याचा फायदा होऊ शकतो ! त्यामुळेच आपल्या मोबाईल ला असणार कॉल रेकॉर्डर ऑन ठेवा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या.

📌 ( 10) Make it a Game: _ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीला सिरियसली घ्यायला लागतो, त्यावेळी आपला परफॉर्मन्स किंवा आपली मानसिक का बिघडू शकते , विक्रीकरता केले जाणारे कॉल हे देखील नॉर्मल कॉल सारखेच तरअसतात ,ज्याप्रमाणे आपण एखाद्या मित्राला कॉल करतो आणि त्याच्याशी गप्पा मारतो ,त्याच्यामध्ये जेवढी मोकळीक असते सेम तशीच मोकळीक जर आपण ग्राहकाशी बोलताना ठेवली तर तो कॉल 100% फायदेशीर ठरते , त्यामुळे या गोष्टीला अत्ती सिरीअसली घेऊ नका, असं समजा आपण एखाद्या खेळ खेळतोय ,आणि मग बघा ,आपल्या कॉल मध्ये नक्की फरक पडेल.

📌 आपले कर्मचारी आपल्या ग्राहकांची बोलणार असतील, तर त्यांना देखील या गोष्टीची ट्रेनिंग असायला हवीये ,कारण? त्यांच्याकडून जाणारे कॉल आपल्या खिशामध्ये पैसे आणणार असतात ,त्यामुळे त्यांना देखील कॉल कसा केला पाहिजे ?याचा अभ्यास असावा ,त्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

© निलेश काळे .

Previous Post Next Post

3 thoughts on “मोबाईलवर ग्राहकाशी बोलताना या “दहा” टिप्स वापरा,चांगला सेल होईल.

  1. छान सुंदर शब्दांमध्ये थोडक्यात शब्दांमध्ये टेली कॉलिंग पूर्ण मॉडेल आपण उभे केलेले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *