यशस्वी व्हायला “सवयी” आवश्यक असतात,पण त्या “सवयी” लागण्यासाठी “हा परफेक्ट” फॉर्मुला वापरा.

70 Views

#Mini_Habits मोठ्ठं यश देऊ शकतात.

📌जगातली कोणतीही यशस्वी व्यक्ती बघा,अगदी तुमच्या पाहूण्यामधली किंवा मित्रमंडळीपैकी सुद्धा.
त्यांच्यात एक गोष्ट शंभर टक्के दिसेल कि, ह्या मंडळीच्या काही सवयी फार खास असतात , नशिब ,लक, हार्डवर्क, भाग्य , या गोष्टी सोडा , सातत्यपूर्ण सवयी त्यांना यशस्वी बनवतात .

📌31डिसेंबरला दर वर्षी न चुकता एक लिस्ट आपण करतोच ज्यात पुढच्या वर्षात काय काय चालु करायचंय हे सविस्तर लिहितो , पण त्याच्या पण त्यापैकी किती गोष्टी continue होतात ? हे आपल्या सगळ्यानांच माहितीये , आत्ता हा लेख वाचतानाच एक मिनिट थांबून लगेच आठवा कोणत्या सवयी लावायचा संकल्प केला होता? आणि त्यापैकी किती सवयी लागल्या ?

📌आपल्याला वाटत असेल कि ,अरेच्या खरंच आपण आज करू उदया करू अशी फक्त टाळाटाळच केलीये . काम तर काही झालंच नाही !

📌याला इंग्रजीत Procrastination म्हणायचं ! बिझनेस मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात मानसशास्त्राचे पण काही चॅप्टर येतात त्यात हे कसं टाळावं हे शिकवलं जातं , तोच विषय या पुस्तकात लेखकाने फार सोप्प्या भाषेत मांडलाय !

📌 लेखक म्हणतात कि आपण संकल्प करतो , “उद्या सकाळपासून घरीच का होईना पण् रोज एक तास व्यायाम करायचाय ! “>> झालं मेंदूला ऑर्डर गेली >> पण या मोठया बदलासाठी आपल्याला काहीतरी मोटीवेशन लागतं,बिना मोटीवेशन काही हालचाल होत नाही ! इथे एक गंमत आहे,आपला मेंदू काही ना काही Excuse काढतो,

“आज जरा झोपच झाली नाही ! ,
“जरा पायच दुखतोय थोडा “!,
“आज जरा मुडच नाहीय !, ” किंवा “स्पोर्ट शूजच सापडत नाहीये ” ! मग येतो सगळ्यात भारी जाऊ दे
“उद्या करू”
आणि हा “उद्या” कधीच उजाडत नाही!

पण कसं होईल बरं????? तर आपण स्वतःकडून एवढी कमी अपेक्षा ठेवायची कि,बस्सं त्याच्याबद्दल कारणं दयायलासुद्धा लाज वाटली पाहिजे, सेम गोष्ट लेखकाबरोबर पण घडली, त्यांना 30 मिनिटे व्यायाम करायची सवय लावायची होती,पण ती त्यांच्याकडून काही पूर्ण होत नव्हती,मग एक रात्री त्यांनी स्वतःला असं सांगितलं की उद्या सकाळी उठून आपल्याला फक्त “एकच पुश अप” काढायचा आहे, आणि सकाळी उठून ज्या वेळी लेखकाने एक पुश्प काढला त्यावेळी त्यांना फार काही वेगळं जाणवलं या एक “पुश_अप” तर सहजच जमतोय , मग अजुन थोडे जमले,या एका पुश_अपमुळे लेखकाला त्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच टर्निंग पॉईंट सापडला त्यामुळे या Push-up ला लेखक गोल्डन_पुशप असं म्हणतात ,
आणि या प्रकाराला लेखकांनी मिनी हॅबिट ( एकदम लहान सवय )असं नाव दिलं.

📌 स्टीफन गुज सांगतात कि या लहान सवयीमधे अगदी छोट्या छोट्या तीन प्रकारच्या पावर असतात

(1) #Post_movement_motivation:

स्टीफन ने जसं ठरवलं होतं तसं एक पुशप काढायचा आणि त्यांनी एक पुशप काढल्यानंतर त्यांना बरं वाटलं, म्हणून त्यांनी दुसरा पण काढला, तिसरा पण काढला,असं करत करत त्यांनी पूर्ण अर्धा तास व्यायाम केला, खरेतर फक्त एक पुशअप काढायचं ठरवलं होतं त्याने, पण पुर्ण अर्धा तास व्यायाम केला,कारण?फक्त एक काढून थांबणे म्हणजे,आपण आपल्यालाच लाजिरवाणी वाटण्यासारखी गोष्ट आहे,असं त्यांचा इगो म्हणाला,

एखादी गोष्ट अती थोडी केली कि,आपला इगो आपल्याला म्हणतो,”तुझी औकात फक्त एकच काढायची आहे का “?

आणि आपला स्वाभिमान जागा होतो, आणि अशाप्रकारे आपली हालचाल चालू होऊन जाते.

न्यूटनचा पहिला नियम असं सांगतो कि “जी गोष्ट मोशन मध्ये आहे ती मोशन मध्येच राहते,जोपर्यंत त्याला दुसरी कोणती गोष्ट आडवी येत नाही”.

आणि अशाप्रकारे एक छोटसं पाऊल एका मोठ्या प्रवासाची सुरुवात करून देतं,हे पाऊल इतकं छोटं असतंय कि याला स्टीफन .”stupid_small” म्हणतात .

(2) #small_action_strengthen_self_belief :

स्टीफन म्हणतात ज्या वेळी आपण एखादी छोटीशी का होईना गोष्ट करतो त्यामुळे थोडासा का होईना आपला जो कॉन्फिडन्स असतो तो वाढायला लागतो,म्हणून तर शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळी समोर अर्धा मिनिट वरल्या घाबरणारा पोरगा पुढे जाऊन अर्ध्या तासाचे भाषण द्यायला सुद्धा बिलकुल घाबरत नाही .

याचं कारण बिलकुल अगदीच साधं आहे,छोटी का होईना एकदा केलेली कृती आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स गच्च भरून टाकते, आणि पुढे पुढे त्या गोष्टीची सवय आपोआपच लागून जाते

#(3) #Less_Effort_Same_results:

📌 सामान्य माणसाला एखादी नवीन सवय लावून घेण्यासाठी 15 ते 22 दिवस लागतात,पण एकदा का ती सवय लागली कि ,ती गोष्ट ऑटोमॅटिक व्हायला लागते,नंतर पुन्हा तर त्या गोष्टीसाठी आपल्याला पुन्हा विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.

📌हेच बघा ना लहानपणी ब्रश करण्यासाठी आपण आपल्या आईवडिलांकडून रोज मार खाल्ला असेल,पण आज जर ब्रश करण्यासाठी थोडा जरी उशीर झाला तरी आपली तगमग होते ,आपल्या करमत नाही, म्हणजे झालं असं की ती मारून मुटकून लावलेली सवय आपल्यात एवढी भिनते की आपल्या त्याच्या शिवाय आता करमत नाही !

📌 या तीन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला चांगली सवय लावून घ्यायला काही त्रास होणार नाही , म्हणजेच कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला या तीन गोष्टी पाहिजेच आहेत .

पण पुस्तकाचा मुख्य सार काय आहे ?

(1) #Rule_no_01: #make_it_stupid_small :

जी गोष्ट करायची त्या गोष्टीची पहिली पायरी इतकी लहान बनवून टाका कि ती आपण सहज करू शकू .

इतकी लहान कि आपल्याला ज्या दिवशी खूप काम असेल किंवा वेळच नसेल तरीसुद्धा आपल्याला ती गोष्ट करायला जमुन जाईल.

(2 ) #Be_Happy_with_Minimum:

एखादी गोष्ट खूप लहान जरी केली तरी त्यात काय लाजायचं ? किती लोकांचा प्रोब्लेमच हा आहे की ,त्यांना थोडं किंवा लहान करावं वाटत नाही ! त्यांना फार मोठं फार भपकेबाज करायचं असतंय .

काय गरज आहे? सुरुवातीला थोडकं करून बघा,थोडं केलंय म्हणून दुःख वाटून घेऊ नका ! आनंदी रहायची सवय लावा !

📌 शेवटी एका वाक्यात जर सांगायचं झालं तर पुस्तक हे सांगतय की “आपल्या डोक्याला आपल्याविरुद्ध कट-कारस्थान करू देऊ नका” !

उलट

“आपल्या मेंदूला उल्लू बनवून त्याला लहान सहान प्रयत्नातून चांगल्या सवयी लावा,कंटाळा किंवा चालढकल करू देऊ नका “अशा वेगळ्या चांगल्या सवयीच आपल्याला यशस्वी बनवू शकतात .

📌हे पुस्तक मराठीत उपलब्ध आहे .

📌 या प्रकारच्या पुस्तकांना “सेल्फ हेल्प बुक” असं म्हणलं जातं, या पुस्तकातून भले काही व्यवसायिक तत्वं शिकता येणार नाहीत , पण ही पुस्तक आपल्याला स्वतःला चांगलं बनवायला शिकवतात .

📌तेव्हा पैसे खर्च करून अशी पुस्तकं विकत घ्या आणि यांची पारायणं करा… फायदाच होईल .

वेळ शिल्लक आहे ? तर आपल्या या पेजवर खूप लेख आहेत ते सावकाश पणे वाचून काढा !

शुभेच्छा .

©निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध ,पुणे.

9518950764

Office : 9146101663

Previous Post Next Post

One thought on “यशस्वी व्हायला “सवयी” आवश्यक असतात,पण त्या “सवयी” लागण्यासाठी “हा परफेक्ट” फॉर्मुला वापरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *