याप्रकारे पोजिशनिंग केलात,तर ग्राहक रेट तोडणार नाही.

या प्रकारे पोजिशनींग करा !म्हणजे ग्राहक रेट तोडणार नाही !

बरेचजण असे असतील कि जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉंच करणार आहेत किंवा केला आहे,त्यांचे करिता ही स्ट्रेटर्जी .

मुद्दा असा आहे कि , सध्या तयार असणाऱ्या मार्केटमध्ये आपण आपला प्रॉडक्ट कोणत्या किंमती ला विकावा अथवा त्याची पोजीशनींग कशी करावी ?

बघा बरेच प्रोफेशनल्स पण इथे चुकतात .

स्वतःच्या सर्विसेस ला कसं पोजिशन करावं हा एक प्रश्न असतोच ,,जसं !
एक वकिल आहे,तो साधारण चेक बाऊंसींग ची केस लढण्यासाठी समजा 5000 रु घेतो,पण तेच शहरातील सर्वात नावाजलेला वकिल त्याचे 50000 रु मागू शकतो .
हरिष साल्वे सारखे वकिल 5 कोटी मागू शकतात .
एकंदरीतच काय तर प्रत्येकाने आपापली पोजिशनींग वेगवेगळी केलेली आहे .

एका व्यवसायाने स्वतःला कसं पोजीशन करावं याच्या बद्दल तीन स्ट्रॅटर्जी आहेत, कारण एकदा का आपण व्यवसाया करिता स्ट्रॅटर्जी ठरवून टाकली की,व्यवसायाची दिशा ठरते,ध्येयासाठी सरळ मार्गाने निघू शकते,व्यवसायाची ध्येये स्वच्छ दिसतात,निर्णय योग्य दिशेने घेता येतात

या स्ट्रॅटर्जीज समजून घ्या .

(1) Cost Leadership : ही एक अत्यंत प्रसिद्ध स्ट्रॅटर्जी आहे .
एक उदाहरण सांगतो त्यावरून ही नीट समजून येईल .
लातूरमध्ये पिंपळे बंधु वडापाव फार प्रसिद्ध आहे , त्यांचा सिंगल वडापाव आजही तीन रूपयाला मिळतो .
जिथे मुंबई सारख्या शहरात सिंगल वडापाव 10Rs- 20 Rs / Piece ला मिळतो , तिथे पिंपळे बंधुनी लातूर सारख्या बाहेरचे भरपूर विदयार्थी असणाऱ्या शहरात चालू करून मार्केट हलवून टाकले .

jio ने डाटा पॅक एकदम कमी किंमतीला करून खणाखण ग्राहक मिळवले आणि इतर कंपन्यांना भाव कमी करायला भाग पाडले .

कसं जमतं या प्रकारची स्ट्रॅटर्जी वापरणाऱ्या व्यवसायाना मार्केट मधे टिकून राहून मार्केट लिडर बनायला ?

तर …

*(1) अशा प्रकारचे Low Cost model जिथं जमतं तिथे पैसा वाचवतात, उत्पादन असेल तर अशा प्रकारच्या आयडीयाज शोधून काढतात कि आणि अतिशय परिणामकारक रित्या उत्पादन करून पैसा वाचवतात त्याचा फायदा किंमती कमी ठेवण्याकरिता होतो.

(2)जेंव्हा Low profit मार्जिनवर एखादा व्यवसाय काम करत असतो तेंव्हा प्रॉडक्ट क्वालिटी फक्त समाधानकारक दिली तर चालते ,
त्यामुळे ग्राहक फारशी कुरबुर करत बसत नाही
जसं indigo Airlines लो फेअरवर काम करते ,,, यशस्वी आहे का नाही ?

या प्रकारच्या स्ट्रॅटर्जी मुळे होतं काय ?
तर
एखादया व्यवसायाला Efficiently कामं करण्याच्या पद्धती सापडतात आणि नवीन स्पर्धकासाठी Entry Barrier निर्माण होते . त्यामुळे विनाकारण ची स्पर्धा वाढत नाही .

स्ट्रेटर्जी नं 2 : Differentiation:

ही जी स्ट्रॅटर्जी आहे,ति वरच्या स्ट्रॅटर्जी पेक्षा पूर्ण भिन्न आहे.
बघा प्रत्येक गावात वा एरियात एखादं असं दुकान वा व्यवसाय असतो,जो अगदी हटके असतो.
या स्ट्रॅटर्जी मध्ये ठरावीक वर्गाकरिता Better value तयार केली जाते,इथे ग्राहकाला High Pricing मध्ये उत्कृष्ट दर्जाचे प्रॉडक्ट ऑफर केले जातात,यामध्ये ग्राहकांच Higher Satisfaction बघीतलं जातं,
जसं सध्याचं वाहन मार्केट बघा , प्रत्येक कंपनी जास्तीत जास्त फिचर्स वाहनात देऊन स्वतःला दुसऱ्यापेक्षा सरस सिद्ध करावं लागतं.
आणि हो असं होतं सुद्धा .
असे Differantiation ची स्ट्रॅटर्जी घेऊन चलणारे व्यवसाय …
मोठया प्रमाणावर R&D करतात , त्यांचे प्रॉडक्ट किंवा सर्वीसेस अती उत्तम प्रकारे function करतात,ते durable असतात,यांच्या सर्वीसेस सपोर्ट अत्यंत उत्तम दर्जाच्या असतात यामुळे काय होते ?तर ,,, कोणीही स्पर्धा करायची हिंमत करत बसत नाही,ग्राहक लॉयल रहातात,आणि शेवटी एकदा वस्तू घरी आणली कि , लोक किंमत विसरतात आणि तिच्या परफॉर्मन्स वर जास्त लक्ष देतात.

त्यामुळे आपण आपल्या व्यवसायात Differenciation स्ट्रॅटर्जी लावली तर आपलं यशस्वी होणं नक्की आहे .

जसं Apple स्वतःच्या प्रॉडक्ट्सला इतर मोबाईल निर्मात्यांपासून दूर ठेवते , ते स्वतःची ऑपरेटींग सिस्टीम कोणा बरोबरही शेअर करत नाहीत .
स्वतःचे फिचर्स अपडेटेड ठेवतात वेगळे ठेवतात , त्यामुळेच अॅपल आण इतर डिफरंशेसन स्ट्रॅटर्जी वर चलणाऱ्या कंपन्या आणि व्यवसाय यशस्वी ठरतात .

स्ट्रॅटर्जी नं (3) Focus:

जेंव्हा एखादा व्यवसाय focus या स्ट्रॅटर्जी वर काम करत असतो त्यावेळी नेमकं काय होतं ? तर एखादया सेगमेंट मध्ये स्पेशल पार्ट ज्याला niche म्हणलं जातं त्यावर काम केलं जातं .
आजकाल स्पेशलीस्ट चा जमाना आहे , प्रत्येक क्षेत्रात जनतेला स्पेशलिस्ट सर्वीस प्रोव्हायडर पाहिजे !.
कोणतही क्षेत्र बघा खेsयात,शहरात वा मेट्रोमध्ये बघा स्पेशलिस्ट प्रोफेशनल,व्यवसायी उद्योजक यांचाच बोलबाला आहे.

अशी focused स्ट्रॅटर्जी ठेवल्यामुळे काय होतं ?
तर
ग्राहकांच्या unique गरजा पूर्ण होतात
आपण त्या त्या क्षेत्रात सुपर स्पेशलिस्ट बनू शकतो.

सर्वसाधारण व्यवसायी आपल्या बरोबर स्पर्धा करूच शकत नाही .

अशा प्रकारे स्वतःच्या व्यवसायाला मार्केट मध्ये कसं पोजीशन करायचं? हे ठरवा ,,, आणि व्यवसायात यशस्वी व्हा !

निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764

personal business Coaching हवीये?तर कॉल करा
office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *