या “अतिशय छोटया” मिस्टेक्स मुळे ग्राहक खरेदी करत नाही.

1,191 Views

#Business_Coaching

#कोणत्या_छोटया_चुकांमुळे_ग्राहक_सटकतो?

©निलेश काळे

किंमत किंवा क्वालिटी सोडता अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे ग्राहक का निसटतो?

📌 #Smoker_Salesman

एखादया शोरूम मध्ये गेलाय , सगळं काही ठिक आहे , पण अचानक सिगारेटचा वास आला , किंवा सेल्समन ड्रिंक केलेला दिसला कि , ग्राहक लगेच काढता पाय घेतात ,

फैमिली बरोबर आलेला ग्राहक तर थांबत पण नाही , त्यामुळे विक्रीच्या ठिकाणी उभा असणारा व्यक्ती नीट ( समजलं असेलच ) असावा .

म्हणून तर जास्तीत जास्त सेल्समन हे नीट ड्रेस केलेले असतात !

📌 (2) #Body_Odour

आपण आपल्याबरोबर जन्म घेतल्या पासून राहतोय त्यामुळे आपल्याला स्वतःच्या शरीराचा वास येत नाही ,परंतु चांगल्या सेल्समनने नेहमी सॉफ्ट असा सेंट वापरणे आवश्यक असते कारण, नाही म्हटलं तरी आपल्या शरीरातून बऱ्याच वेळा वेगळाच किंवा विचित्रच असा दर्प येऊ शकतो आणि असा दर्प ज्याला इंग्लिश मध्ये ओडर असं म्हणतात तो अनेकांना आवडत नाही.

याच्या बरोबरच दुसरा अँगल :
काही सेल्समन अतिशय जास्त असा सेंट लावतात जास्त सेंट लावण्याचा अर्थ ती व्यक्ती काहीतरी लपवत असते.

म्हणून जास्त सेंट लावायची सवय तुम्हाला असेल तर ते आता सोडून द्या कारण या दोन्ही गोष्टींमुळे ग्राहक आपल्यापासून दूर पळतात !

📌 (3) #छोटा_खोटारडेपणा

समजा समोरचा सेल्समन आपल्या मला काही प्रेझेंटेशन देतेय,प्रेझेंटेशन देण्याच्या दरम्यान ती व्यक्ती आपल्यासमोर काही गोष्टी आपल्याला थोडं बहुत खोटं सांगते ,
जे की आपल्याला ओळखू येतं आणि आपण त्याला कॉस केल्यानंतर सुद्धा त्याने त्याची चूक मान्य न करता ते खोटं खरं आहे असा भासवण्याचा प्रयत्न करू लागला तर आपण तिथून सटकतो.

ग्राहकाच्या समोर जर सेल्समन च्या कडून घडलेला छोटा खोटारडेपणा उघडा पडला ,तर ग्राहक मोठ्या व्यवहाराची रिस्क घेऊ शकत नाही.

गोष्ट साधी असते जर सेल्समन किंवा विक्रेता छोटी फसवणूक अगदी बेमालूमपणे करत असेल तर तो मोठ्या व्यवहारात फसवणार नाही कशावरून?

त्यामुळे सेल दरम्यान छोट्या-छोट्या खोटारडेपनाच्या गोष्टी करू नये त्या गोष्टी ग्राहकाच्या लक्षात आल्या तर ग्राहक तिथून सटकतो !

📌 (4) #Too_Pushy_Salesman

काही सेल्समनच्या डोक्यामध्ये पक्कं बसलेले आहे की जोपर्यंत आपण ग्राहकाला आग्रह करत नाही तोपर्यंत ग्राहक खरेदी करणार नाही ………

असं नसतं बाबांनो !

खूप जास्त आग्रह करणे ,,जास्त मागे मागे लागणे या प्रकारामुळे ग्राहक डिफेन्सीव मोडमध्ये जातो आणि त्याला खरेदी करायची इच्छा जरी असली तरी तो म्हणतो अरे आत्ता खरेदी टाळलेली बरी !

अनेक सेल्समन चांगली विक्रीची संधी अशा खूप मागे लागू पणामुळे हातातली घालवतात त्यामुळे आपण किती लेव्हलपर्यंत ग्राहकाला फॉलोअप घ्यायचा हे ठरवून टाकावं त्याच्यापुढे जास्त ग्राहकाच्या मागे लागू नये तर खरेदी करायची असेल तर नक्की होईल परंतु असा मागे लागू पणामुळे कस्टमर खरेदी करेल याची शाश्वती नसते

📌 (5) #Too_soft_Salesman

असा एक समज आहे की सेल्समन जर उद्धट असेल तर ग्राहक तिथून काढता पाय घेतो, त्याच्या उलट एक बाजू ही पण आहे कि सेल्समन खूपच लोचट असेल ,,

सारखा …. “घ्या ना सर खूपच चांगलय”

” उद्या ऑफर मिळणार नाही ओ सर”.. अशी विना कामाची fear of loss दाखवणारे !

“तुमची काय इच्छा त्याप्रमाणे मॅनेज करून देतो ”

वगैरे वगैरे ..

सेल्समन अशा खूप गोडबोल्या भाषा मध्ये बोलू लागला ,तरीही ग्राहक तिथून शकतो .

कारण साधं आहे.

ज्याप्रमाणे लोक उद्धट सेल्समनला टाळता त्याप्रमाणेच लोक असल्या गोडबोले ,लोभसवाणे दाखवणारे किंवा अतिशय निर्लोभी दाखवणाऱ्या सेल्समनला सुद्धा टाळतात.

याला एक साधी गोष्ट जबाबदार आहे प्रत्येक माणसामध्ये कुठेतरी एक असा न्यायाधीश बसलेला असतो, जो असे फसवे लोक सहज ओळखतो आणि एकदा का आपल्या फसवा चेहरा उघडा पडला ती ग्राहक डिल करत नाही !

📌 (6) #डोळ्यात_डोळे_भिडवून_न_बोलणे

ज्यांना काही लपवायचं नसतं ती व्यक्ती आपल्या डोळ्यात डोळे घालून बोलते, पण जेव्हा सेल्समन हा नजर चुकून बोलत असतो त्यावेळी ती बाब ग्राहकाला न पटणारी होऊन जाते, याचा अर्थ त्या सेल्समनला आपल्या स्वतःच्या उत्पादनाविषयी किंवा सेवेविषयी मनात विश्वास नाहीये, आणि अशी स्वतःबद्दल विश्वास नसणारी व्यक्ती विक्री घडवून आणू शकत नाही ! त्यामुळे ग्राहक क्लोज होत नाही !

📌 *(7)#Facade / #फुकटचा_मोठेपणा:

📌आज बाबीने आपण एकूणच महाराष्ट्रीयन ग्रासीत आहोत , बरेच दुकानदार , ग्राहकांसमोर सुद्धा स्वतःचा मोठेपणा मिरवायला बिलकुल हयगय करत नाहीत , नुसतं स्टिकरवर लिहायचं “ग्राहक आमचा देव आहे” ,, आणि त्याच्यासमोर फुशारकीची मिरवायची !

हे कसं चालेल?

कित्येक ग्राहकांनाही आवडत नाही, ते समोर बोलून दाखवत नाहीत, पण आल्या रस्त्याने दुकानदाराला टाटा बाय-बाय करून पैसेन देता म्हणजे वस्तू किंवा न घेता निघून जातात !

मग त्यात दाखवलेल्या फुशारकीचा काय उपयोग?

📌 वरील लेखात मध्ये सांगितलेल्या गोष्टी अतिशय शुल्लक वाटतील,परंतु या गोष्टींमुळे लोकांना करोडो रुपयांचे नुकसान होत आहे.

मग ते नुकसान कशाला करायचं .

चला या गोष्टींवर थोडासा विचार करून आणि या गोष्टी टाळू या ! सिंपल आहे !

शुभेच्छा.
निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सल्टंट,आनंदपार्क,औंध,पुणे.
9518950764.

office : 9146101 663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *