या एका गोष्टीमुळे,आपले स्पर्धक सुद्धा आपल्याकडे ग्राहक पाठवतील

1,276 Views

या एका गोष्टीमुळे आपले स्पर्धकसुद्धा आपल्याकडे ग्राहक पाठवतील.

Candour

📌व्यवसाय ही गोष्ट अटीतटीची, चढाओढीची,एकमेकांवर मात करण्याची आहेच आणि ती असली पण पाहिजे .

📌 बऱ्याचदा आपला ग्राहक त्याच्या गरजा पुर्ण झाल्यानंतर किंवा पुर्ण होण्याअगोदर आपल्या स्पर्धकाबद्दल किंवा त्याच्या प्रॉडक्टबद्दल किंवा सेवा व्यवसायाबद्द्ल बोलतात .

📌 बघा एक साधारण मानसिकता अशी आहे कि,आपल्याला स्वतःबद्दल कोणी चांगलं बोललं कौतूक केलं तर ते स्वाभाविकपणे आवडतं .

📌 त्यातल्या त्यात आपल्या प्रॉडक्टची स्तुती आवडते, पण तेच जर आपल्या तोंडावर आपल्याच स्पर्धकाची किंवा आपल्या इंडस्ट्रीत असणाऱ्या पण दुसऱ्या वस्तुत डील करणाऱ्या व्यापाऱ्याची स्तुती तर सोडाच पण त्याबद्दल बोललेले पण आवडत नाही !

📌 पण एकदा का आपण बिझनेसमध्ये मॅच्युअर झालों किंवा व्यवसायात थोडं जरी स्थीर झालो तरी ही अशी अस्वस्थता दाखवणं,चिडचीड दाखवणं किंवा चेहऱ्यावर थोडी जरी शिकण दाखवणं आपल्या इमेजसाठी वाईट आहे.

कारण?व्यावसायिक कोणताही असो, आज त्याला त्याच्यासारखाच व्यवसाय करणाऱ्यांच्या बरोबर एखाद्या असोसिएशन मध्ये रहावे लागते.

त्यामुळे एक प्रकारे संरक्षण मिळते.

📌तर मग Candour म्हणजे काय ?

📌 शब्दशः अर्थ शोधलात तर Openness Frankness , playfulness आणि इतरांविषयी सुद्धा चांगलं बोलणं,त्यांचा पण रिस्पेक्ट करणं आपल्याकडे नसेल आणि ती बाब आपल्या स्पर्धकाकडे असेल तर मनमोकळेपणाने त्यांचा रेफरंस देणे,हा गुण आपलीच इज्जतच वाढवतो .

📌यालाच Candor असं म्हणतात .

📌 आपण आपल्या स्पर्धकाविषयी वाईट बोलणे किंवा न्युट्रल रहाणे या गोष्टींनी आपल्याला फायदा तर होणारंच नाही,नुकसान होईल,

त्यामुळेच चला आजपासून आपल्या स्पर्धकांशी थोडंसं मैत्रीने राहू या !

📌 फक्त स्वतःला मोठं करण्याऐवजी पूर्ण कॅटेगरीतील लोकांना एकत्रीतच प्रसिद्ध करणे ,ही ती संकल्पना आहे.

“जेंव्हा अख्खी कॅटेगिरी वाचवण्याचा प्रश्न येतो,तिथे असोसिएशन्सच कामाला येतात, म्हणून आपण त्यांचा पार्ट असणे आवश्यक आहे”.

📘 सध्या मार्च एन्ड जवळ येतोय त्यामुळे IRDA कडे रजिस्टर असणाऱ्या बऱ्याच कंपन्यांनी एकमेकांमध्ये स्पर्धा करण्याऐवजी …
विमा जरूरी आहे ( भलेही मग कोणाकडूनही घ्या ) अशी ऍड करायला चालु केलंय,इथे प्रत्येक कंपनी आमच्या कडून घ्या तर म्हणतेच आहे पण विमा मात्र घ्या,असं पण म्हणणं चालू आहे.

📕मध्यंतरी कोरोनामुळे चिकनची मागणी कमी झाल्यामुळे नाशिकमधील पोल्ट्री व्यावसायीकांनी चिकन शॉपवाल्यांनी एकत्र येऊन … चिकन महोत्सव आयोजीत करून 50 रू,ला फुल्ल नॉनवैज जेवण असा उपक्रम चालु केला होता,इथे प्रश्न अस्तित्वाचा असल्याने सगळे एकत्र आले, किंवा असं म्हणा कि, यावच लागलं.

तर आहे का नाही ?हे महत्वाचं तत्व .

📌 तसं दुसऱ्याची स्तुती करणं अवघडंय पण बघा Candour जमतंय का ?
https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

शुभेच्छा

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंदपार्क,औंध,पुणे.
9518950764.

आपला सेल ढासळतोय?तर आमची प्रोफेशनल टेलीफोनीक कन्सल्टींग घ्या ! आत्ताच कॉल करा.
श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663

Default image
Nilesh Kale
Articles: 83

3 Comments

  1. लेख छान आहे.

  2. अगदी बरोबर.

Leave a Reply