या एका टेक्नीकने जपानला विकसित बनवलं

फक्त एक Lean मॅनेजमेंटची ट्रिक आणि त्याने जपान सारख्या छोट्या देशाला एक विकसित अशी शक्ती बनवलं त्याचं नाव आहे…. KAIZEN

Small incremental Changes for Potential improvement .

( प्रोसेस मध्ये किंवा दैनंदीन कामात घडवलेले अगदी छोटे बदल ज्यामुळे प्रगती साधता येईल)

📌 आपण लीन मॅनेजमेंटची प्रोसेस बघत असताना या टॉपिकला दुर्लक्षित करून कसं चालणार नाही,कारण? लीन मॅनेजमेंटचा हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे.

हा शब्द जपानी आहे याचा अर्थ आहे सतत प्रगती करत राहणे किंवा सतत असा बदल करत राहणे,ज्यामुळे काम पहिल्यापेक्षा जास्त चांगले करता येईल.

बरेच जण फोन करतात सर अजून काय करता येऊ शकतं ?अजून कसा बदल केल्यामुळे जास्त विक्री होईल? किंवा अजून काय केल्याने सिस्टीम सुधारणा करता येईल ?

पण आज जो टॉपिक आहे या टॉपिकमध्ये एखाद्या बिजनेस कन्सल्टंट किंवा उपदेश देणाऱ्या व्यक्तीचे काहीही काम नाही, कारण ? ही एक सेल्फ इम्प्रोवमेंट टेक्निक आहे,इथे जे जाणवेल/योग्य वाटेल त्यात छोटा बदल करता येतो.

एखाद्या व्यवसायात,कंपनीत Kaizen अप्लाय करवुन घ्यायचे काम ,एखादी स्पेसिफीक व्यक्ती, improvement group, किंवा फोकस टीम करू शकते.

या बाबींना एवढं महत्व यामुळेच आहे कारण दुसऱ्या महायुद्धात ज्यावेळी जपान नुकसानीतुन वर येत होता त्यावेळी त्यांनी आर्थिक आघाडीवर कंपन्यांच्या मॅनेजमेंटमध्ये अनेक सुधारणा केल्या,या सुधारणा आजही संपूर्ण जगामध्ये मॅनेजमेंटचे प्रिंसिपल म्हणून वापरल्या जातात.

जेव्हा आपण रोजच्या कामामध्ये एखादी अगदी छोटीशी सुधारणा किंवा बदल करतो,ज्यामुळे आपलं काम अजून सोपं होतं,या एका सुधारणेलाय तर कायझन म्हणलं जातं.

ही गोष्ट खरं तर निसर्गत: आपल्यात आहे, कारण???आपण मानव ज्यावेळी गुहेत राहत होतो,शिकार करत होतो,त्या वेळेपासून ते आजपर्यंत इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा मानवजातीने जास्त प्रगती केलीये,जास्त सुधारणा केल्यात, स्वतःच्या राहणीमानापासून ते अंतराळात जाईपर्यंत या जा संख्या गोष्टी आपण थोड्या थोड्या अंतराने केल्यात जे बदल केले,जो विकास घडवून आणला या सगळ्यात गोष्टींना आपण कायझनच असं म्हणू शकतो ना ?

पण मग सगळ्याच देशांनी एवढी प्रगती का केली नाही ?

तर मानवाचा मेंदू मुळात अशाप्रकारे डिझाईन केलेला आहे की,त्याला दिलेलं काम तो कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी श्रमात मध्ये कसं करायचं ?याच्यासाठी वाटा शोधत असतो .

पण एखादया व्यवसायांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये एखादी सिस्टीम लागू पडते आणि मग त्याच सिस्टीमवर एखाद्या गोष्टीची निर्मिती होते किंवा सेवा दिली जाते,कधीही कोणी प्रश्न उभा करत नाही आणि असे प्रश्न उभे केले नाहीत की त्या सिस्टिमला बदलायचा कोणीही विचार करत नाही.

ज्यावेळी बदल करायचाच नाही ! असं वाटायला लागतं त्यावेळी अधोगती निश्चीत असते.

चांगल्यासाठी बदल करणे हे कोणत्याही समाज घटकासाठी आवश्यक असणारी बाब आहे, व्यवसायामध्ये तर सतत बदल होत असतात टेक्नॉलॉजिकल चेंजेस होतात ,ग्राहकांच्या गरजा बदलतात, काम करायची पद्धत बदलते, मानवाचा विचार करायची पद्धत बदलते ,आणि व्यवसायिक काळानुरूप स्वतःच्या कामात बदल करतो ,तो सतत प्रगती करत राहतो.

ज्या कंपन्यांनी स्वतःमध्ये कसलाही बदल केला नाही,त्या कंपन्या कशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेल्या? याच्या सुरस कथा आपण नेहमी फेसबुक व किंवा अन्य ठिकाणी वाचतच असतो.

बघा अनेक कंपन्यांमध्ये उत्पादनामधे बदल करण्यासाठी R&D नावाचा विभाग असतो,त्या विभागातून अनेक नवीन नवीन उत्पादने तयार होतात, पण तो,जो बदल असतो तो फार मोठा असत,तो फार खर्चिक देखील असतो,आणि तो बदल काही ठराविक लोक घडवून आणतात,परंतु KAIZEN त्याच्या उलट आहे,कायझनची प्रक्रिया ही फार सुलभ आहे आणि यातून होणारे बदल हे अतिशय छोटे असतात.

आणि हे बदल बहुतेक करून टीम मेंबर कडूनच सुचवले जातात, त्यामुळे त्याला विरोध होण्याचा किंवा त्याच्या संदर्भामध्ये काहीही विवाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

📙त्याचा अर्थ R&D = व्यवसायातील एखाद्या स्पेसिफिक टीम कडून करायची/बाब खर्चीक

📕कन्सलटेशन = चांगल्या बिझनेस कोच कडून घ्यायचं/याला पण पैसे लागतातच .

📘KAIZEN = व्यवसायातील सर्व घटक मालक/ कामगार /सेवक सगळ्यांनी मिळून अप्लाय करायचा असतं , अगदी छोटं छोटं = त्यामुळे खर्च होण्याचा प्रश्नच नाही !

आता हे कसं करायचं ?
बघा दुकानात किंवा कंपनीत काम करत असताना कोणाच्याही डोक्यातून अगदी शेवटच्या घटकाच्या डोक्यातूनसुद्धा असे विशेष सकारात्मक बदल बाहेर पडू शकतात, >> ते त्यांनी आपल्या सीनियरबरोबर डिस्कस करावे>>आणि सिनियर्सनी ते बदल आपल्या मॅनेजमेंटकडे सांगावे,
आणि मॅनेजमेंट ने ते बदल व्हेरिफाय करून आपल्या कंपनीच्या किंवा दुकानाच्या किंवा कोणत्याही व्यवसायाच्या मध्ये अप्लाय करावे.

बऱ्याचदा कामगारांकडूनच जर त्यांची मते मागवली की काय बदल करायला पाहिजे?तर त्यांचा परफॉर्मन्स हा नक्की वाढतो.

ही प्रोसेस एका दिवसात करून दुसऱ्या दिवशी विसरून जायची नाहीये, तर ही प्रोसेस रोजची आहे ,रोज काय बदल करता येईल? छोटासा का असेना ?अगदी इतका बारीक कि तो सांगताना पण लाज वाटावी.

छोटे छोटे सकारात्मक बदल केले कि,आपल्याला पण चांगलं वाटतं, काम करण्याची परिस्थिती थोडीशी चांगली होते ,त्यामुळे कामगारांना पण बरं वाटतं,एकंदरीतच पूर्ण व्यवसायातील वातावरण सकारात्मक होऊन जातं, कारण R&D डिपार्टमेंट न सुचवलेले बदल हे कदाचित त्यांना आवडणार नाहीत परंतु त्यांनीच सुचवलेले बदल हे जास्त सकारात्मक ठरतील,त्यामुळे काही मोठं नका करू !
स्वतःला रोज फक्त हा एकच प्रश्न

विचारा कि,”मी आज आज अशी कोणती गोष्ट बदल करू ज्याने व्यवसायामध्ये प्रगती करता येईल?”उत्तर मिळालं कि,सारासार पणे ठरवा आणि करा कि बदल.

कारण??? अगदी छोटी इंप्रुवमेंट जर केली तर,त्याच्यासाठी फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता तर बिलकूलच लागत नाही, कारण?ही सुधारणा छोटी असते.

माणसाच्या डोक्यामध्ये फक्त सुधारणा करायची आहे,हे वाक्य फिट बसलेल पाहिजे आणि सुधारणा व्हायला चालू होते.

📌 जर आपण कधी प्रश्न विचारलाच नाही,जर आपण कधी प्रयत्न केलाच नाही,तर सुधारणा होणार कुठून? आणि सुधारणा होणार कशी? त्यामुळे रोज स्वतःला सतत विचार करत चला, कृती करत चला,कि काय बदल करता येईल?

KAIZEN म्हणजे खूप काही मोठं रॉकेटसायन्स नाहीये, पण त्याचे Tools आणि ते वापरायच्या स्टेप्स ही एक मोठी प्रोसेस आहे.

ते एका लेखात वगैरे समजावून सांगता येणार नाही,पण या संदर्भात खूप सारं मटेरियल युट्युब आणि गुगलवर उपलब्ध आहे,ते वापरा आणि प्रगती करा. कारण तो वापरणारा मात्र प्रचंड प्रगती करू शकतो हे नक्की.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध, पुणे.
9518950764,
Office: 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *