जास्त नफा मिळावयचाय? तर या कंपन्यांसारखीच पद्धत वापरावी लागणार.

Vertical integration and Horizontal integration

Vertical integration:

असं म्हणलं जातं कि, घराचा खालचा मजला बांधायला सर्वाधिक खर्च येतो, मग त्यावरिल मजले स्वस्तात होतात.

बिजनेसमध्ये देखील हेच तत्व फार कामाला येतं,ही एक महत्वाची बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे , यालाच integration म्हणतात.

बऱ्याच यशस्वी बिझनेस घराण्याच्या यशापाठीमागे integration हीच महत्वाची स्ट्रॅटर्जी आहे.

बघा एक व्यवसाय,
स्वतः ला मोठा करण्यासाठीच सतत प्रयत्न करत असतो , यामध्ये सर्वात महत्वाच पॉईंट असतो तो म्हणजे , नफा वाढवणे.
नफा वाढवण्यासाठी जी कारणं वापरली जातात,त्यात स्वस्त कच्चं मटेरियल मिळवणं हा महत्वाचा मुद्दा असतो.

तर मग इथे हा पॉईंट कसा कामी येतो ? हे बघूया.

Vertical integration चा अर्थ, आपल्या Core Business मध्ये प्रोसेस जोडणे.

जसं उदाहरणावरून समजून घेऊ .

एक RO वॉटर प्लान्ट शुद्ध पाणी विकण्याचे काम करत असतो .

आता इथे काय काय प्रोसेस आणि मटेरियल लागते?

1) विहिरीच अथवा बोअरचं पाणी,
2) लाईट कनेक्शन सहित जागा,
3) मशिनरी,
4) वाहतुक आणि विक्री व्यवस्था,

बरेच जण पाणी विकत घेऊन , किरायाच्या जागेत,गाडया भाडयाने घेऊन पाण्याचे जार अथवा,बॉटल विक्री करत असतात .

पण इथे नफ्याचा मोठा हिस्सा कच्चा माल विकत आणण्यात आणि विक्री करण्यात खर्च होत असतो .

पण पाणी जर 1) स्वतःच्या मालकीच्या विहिरीतून अथवा बोअर मधून आणलं , 2) स्वतःच्या जागेत फिल्टर केलं , 3) स्वतःच्या गाडयाने सप्लाय केला तर नफ्याचा मोठ्ठा हिस्सा घरातच रहातो .

याच प्रकारे वेगवेगळ्या प्रोसेस स्वतःच्या ताब्यात ठेवून व्यवसाय करणे यालाच Vertical integration म्हणतात.

या प्रकारची स्ट्रॅटजी वापरून व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या रेटला आपण तोडूच शकत नाही .

कच्च्या मालाचं उत्पादन >>प्रोसेसिंग>> अगदी रिटेल selling पर्यंत सर्वच प्रक्रिया स्वतः केल्या जातात .

उदाहरण , Amul चं घेऊया .

📌Amul च्या स्वतःच्या डेअरीज आहेत,तिथे ते स्वतः दूध जमा करतात .

📌दुधावर प्रक्रिया करण्याचे प्लान्ट अमूलकडे आहेत .

📌तिथून आईसक्रिम फॅक्टरीत दुध नेण्यासाठी वाहन व्यवस्था ज्याला लॉजिस्टीक अमूलकडे आहेच .

📌तयार झालेली आईसक्रिम शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी डिलर्सच्या नेटवर्क बरोबर अमूलचे स्वतःचे देखील स्टोर्स आहेत,याचा अर्थ असा कि अमूल स्वतः कित्येक प्रोसेस कंट्रोल करते.

या प्रक्रियेमुळे दुसरी कोणतीही आईसक्रिम कंपनी अमूल एवढा नफा मिळवू शकत नाही ,कारण त्यांना दुध जमा करण्याची सिस्टीमच नाही

ITC चं vertical integration असं आहे कि ITC Ltd ची हजारो एकर गव्हाची शेती आहे,हरियाणा, पंजाब , MP सारख्या,गहू उत्पादन करणाऱ्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हरियाली आणि चौपाल नावाने , गहू खरेदी केंद्रे आहेत.
तिथून गहू आणून ,मिल्स मध्ये “आशिर्वाद आटा ” बनवला जातो .

जेंव्हा गहू स्वत:च्या शेतातला>>खरेदी करायला मोंढयातली दुकाने स्वतःची>> आटा मिल स्वतःची>> ब्रॅंड स्वतःचा ,,, पुढे जाऊन Sunfeast सारखा आट्यापासून बनणारा बिस्कीट बनणारा ब्राण्ड स्वतःचा…. किती ते कंट्रोल?

जगातली सर्वात मोठी कंपनी म्हणून अशात Saudi -Amarco या कंपनीचं नाव समोर आलंय आणि चर्चेत आलंय,, तिने Trillion Dollars ची अर्थव्यवस्था याचं तत्वावर तर बनवलीये…. सबकुछ स्वतःचं

IKEA ही जगातील सर्वात मोठी स्वस्तात फर्निचर बनवणारी कंपनीने बल्गेरिया आणि रोमानीया या देशांमधील जंगलेच विकत घेतली आहेत,तिथून लाकूड आणून, फर्नीचर बनवून,स्वतःच्याच मॉल मध्ये विकते.
मग IKEA च्या नफ्याची बरोबरी इतर कोण करू शकेल ?

D-mart चे सर्व मॉल्स स्वतःच्या मालकीच्या जागेवर आहेत .. मोठा खर्च वाचला,मग द्या स्वस्त … मारा ..स्पर्धक

यात कळीचा मुद्दा हा कि ,जास्त नफा मिळवण्यासाठी सप्लाय चेन आणि जास्त प्रोसेसेस आपल्या ताब्यात असायला हव्यात

हीच Vertical integration स्ट्रॅटर्जी आहे.
यामध्ये forward आणि Backward असे प्रकार असतात,

म्हणजे एकतर सप्लाय कड़े जास्त लक्ष देऊन ती सिस्टीम पक्की करणे किंवा डिस्ट्रीब्युशन आणि रिटेलींग वाढवणे .

*****************************

*Horizontical integration* :

व्यवसाय वाढवणे आणि आपल्याला असणारी स्पर्धा कमी करण्यासाठी ही स्ट्रॅटर्जी आजकाल नवीन स्टार्ट अप्स जास्त प्रमाणात वापरतात,

Takeover :

या पद्धतीत दुसरयाने
वाढवलेली मोठी केलेली कंपनी,सेट असणारा ब्रॅण्ड विकत घेतले जातात, करा खर्च आणि वाढवा आपली पॉवर ,
जसे TATA नी Land Rover आणि जग्वार हे ब्रॅण्ड विकत घेतले, आणि मार्केटमधील वाहन क्षेत्रातीलच दुसरी कंपनी विकत घेऊन मार्केट वाढवले .

Merger : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी,काँग्रेस आणि शिवसेना यांनी जे केलंय त्याला Merger म्हणता येईल.
इथे हे ब्रॅण्डस एकमेकात न मिसळता , एकमेकांना सपोर्ट करतात ,एका विशेष उद्देशाने मोठ्ठ होणे , विरोधकांचा विरोध मोडून काढणे यासाठी ही पद्धती वापरली जाते,

Jio ने ज्यावेळी4G नेटवर्क वाढवायला सुरुवात केली , त्या वेळी लोकांकडे 4G फोनच नव्हते , मग Reliance ग्रुपने Lava हा फोन निर्माता ब्रॅण्डच विकत घेतला.
आणि बाजारात 500 Rs मध्ये छोटा 4G फोन आणला.

यामुळे काय झालं ? तर त्यांना ग्राहक वर्ग वाढवायला मदत झाली.

म्हणून जेंव्हा आपल्याला व्यवसाय वाढवायचा असेल ? तर vertical किंवा Horizontal जे जमत असेल ते वापरा,

मोठ्ठं होण्यासाठी याच अशाच बिझनेस स्ट्रॅटर्जी वापराव्या लागतात तेंव्हा integration चा वापर करा आणि आपला व्यवसाय वाढवा.

©निलेश काळे*
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

Office
श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663

Previous Post Next Post

4 thoughts on “जास्त नफा मिळावयचाय? तर या कंपन्यांसारखीच पद्धत वापरावी लागणार.

  1. खूप छान माहिती
    मी सुद्धा एक छोटा व्यावसायिक आहे.
    मी माझ्या व्यावसायामध्ये वरील सर्व ट्रिक वापरू शकत नाही पण कमी नफा व जास्त विक्री हे तंत्र वापरतोय.

  2. सर, मी कालिदास गोरे, पत्रकार, उस्मानाबाद
    7620204788
    सर, आमच्याकडे महिला मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे आटा चक्की मशीन घेऊन मोठ्या प्रमाणावर आटा उत्पादन शक्य आहे. परंतु इकडे मार्केट नसल्याने अवघड आहे. तरी आपल्याकडे मार्केट असल्यास आम्ही मशीन खरेदी करून आटा सप्लाय करू शकतो. त्यामुळे आपल्याकडे मार्केट असेल तर आम्हास कळवावे ही विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *