या “तीनच” सोप्या स्ट्रॅटर्जी लावा,तुमचा स्पर्धक तुमचं काहीच बिघडवू शकणार नाही.

Be… Better, faster, Cheaper

नवीन व्यवसाय चालू करू इच्छिणाऱ्या बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे ती त्यांना अतिशय सेफ अशी बिझनेसची आयडिया हवी आहे, जो व्यवसाय भरपूर चालावा , ज्यात प्रॉफिट भरपूर असावं आणि त्यामध्ये स्पर्धा अतिशय कमी असावी… पण असा व्यवसाय खरतर कधीही सापडणार नाही ,,,,,,,,,,जगात फार कमी लोक आहेत ज्यांना या प्रकारच्या सुविधा मिळू शकतात,

ज्या लोकांना काहीतरी असा कुबेराचा खजिना सापडला आणि त्या लोकांनी त्या गोष्टीचा वापर करून फार मोठं व्यवसाय साम्राज्य उभं केलं असे अगदी बोटावर मोजण्याइतपत लोकं आपल्याला मार्केटमध्ये दिसतील…
आपण असं म्हणू शकतो की या लोकांना नशिबाने ब्ल्यू कलर ओशन मिळालं,

Blue colour ocean चा सारासार अर्थ असा कि ,बिलकुल स्पर्धा नसलेलं मार्केट मिळालं (आपल्या आजूबाजुला असे अनेक व्यवसाय असतील ) मग त्या बाकीच्या लोकांनी …. ज्यांना रेड ओशन मार्केट मिळालं त्यांनी काय केलं असेल?

तर अशा लोकांसाठी हे तीन पॉईंट आहेत, जगातल्या 99.99% लोकांनी या पॉईंटचा आधार घेऊनच आपले अस्तित्वात असणारे व्यवसाय मोठे केलेले आहेत,

जेव्हा मार्केटमध्ये स्पर्धा असते त्या वेळेला हे तीन पॉईंट आपल्याला, आपल्या स्पर्धकांवर मात करून विक्री मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

📘Be Better :

मार्केटमध्ये आज आपल्याला 4G मोबाईल मिळतात ,,,टेक्नॉलॉजी सुधारित झालेली आहे,,, आज जर आपल्याला कोणीही अगदी फुकट मध्ये 2Gटेक्नॉलॉजी वापरणारा मोबाईल हातात दिला तर तो आपण घेणार सुद्धा नाही ,त्याचं कारण ?असं आहे की ,जी टेक्नॉलॉजी अधिक चांगली बनली लोकांना ती हवीहवीशी वाटते ,मग जे कोणतेही व्यवसाय नवीन आले ,परंतु पूर्वीच्या मार्केटमध्ये असणाऱ्या व्यवसायापेक्षा जास्त चांगले होते ,,,तर त्यांना मार्केट तात्काळ आपला रिस्पॉन्स देतं.

मग आपण अस्तित्वात असणाऱ्या व्यवसायापेक्षा चांगला प्रॉडक्ट द्या, अस्तित्वात असणाऱ्या सेवा पेक्षा जास्त चांगली सेवा द्या ,म्हणजे एकूणच आपल्याला सुधारणा करायची आहे ,की ग्राहकांना मिळणाऱ्या फायदा मध्ये जर अशी सुधारणा आपण कोणत्याही क्षेत्रात करू शकत असू तर आपल्यासाठी मार्केट हे हात पसरवून स्वागत करायला उभ आहे.
आपण जर असं म्हणालो की , “तो जसा आहे तसा मी पण प्रॉडक्ट काढलेला आहे ” किंवा “त्याची जशी आहे ,अगदी त्याच प्रकारे सेम टू सेम सेवा देत आहे” तर आपल्यासाठी मार्केटमध्ये जागा तयार व्हायला अवघड आहे.

_मार्केटमध्ये फक्त आणि फक्त सुधारणेला वाव आहे ,म्हणून तर अगदी एकमेकांच्या कॉप्या करून सेम टू सेम उत्पादन काढणारे व्यवसाय हे मातीत जाताना दिसतात .

सध्या अनेक व्यवसाय मित्र फक्त कॉपी करण्यामध्ये स्वतःची धन्यता मानतात ,परंतु निसर्गाचा नियम हे सांगतो की आपण इतरांच्या सारखा असून उपयोग नाही ,इतरांपेक्षा किमान दहा टक्के तरी चांगलं असलं तरच मार्केटमध्ये आपल्याला स्थान मिळणार आहे.

म्हणून मार्केटमध्ये सध्या व्यवसाय करणाऱ्या लोकांपेक्षा दहा टक्के…. फक्त दहा टक्के म्हणतोय…चांगलं द्या ! आणि आपल्याला मार्केट स्वीकार करेल.

********************************

📙Be Faster:

_मार्केटमध्ये सध्या नव्याने येणारा स्टार्टअप्स स्पीड वर जास्त लक्ष देतात, आज ग्राहक देखील त्याच प्रकारची अपेक्षा करतोय ,कारण काय झालं? गेल्या शंभर वर्षांमध्ये दुकानदाराने स्वतःला ग्रेट समजायला सुरुवात केलेली होती ,,म्हणजे ??एखाद्या खेड्यामध्ये एक दुकानदार असेल तर तो त्या गावचा पालन करता पोषणकर्ता. जणू तो काही व्हीआयपी आणि ग्राहक तो ज्या वेळेला देईल त्या वेळेला माल घेणार अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती , एकंदरीतच मार्केटमध्ये मरगळ् आल्यासारखे झाले होते, परंतु गेल्या वीस वर्षांमध्ये आपण बघत असाल कि ,व्यवसाय हे वेगळ्या वेगाने वाढत आहेत ,किमान आपल्या भागात या व्यवसायाची स्पीड वाढलेली दिसते, लोक *स्पीडवर* एकमेकांपासून आम्ही कसे वेगळे आहोत ?हे दाखवायचा प्रयत्न करत आहेत .म्हणजे आपल्याला पूर्वीसारखं “जमेल तसं करू” “पुन्हा देऊ” “देता येईल” “बघता येईल” अशा प्रकारचे कारण घेता येणार नाही… इथे हा पॉईंट आहे की ,आपण इतरांपेक्षा जास्त जलद सेवा कशी येऊ शकतो ?हे बघायला पाहिजे,

आज आपण एखादी वेबसाइट जर तीन सेकंदात पेक्षा जास्त वेळ उघडली नाही तर तिथून माघारी फिरतो.

व्हिडिओ प्ले व्हायला वेळ लागला तर तो बघायचा टाळतो.

हॉटेलवाला म्हणाला की मी एक तासाने डिलीव्हरी देईल तर लगेचच, दुसरा ऑप्शन निवडतो.

एकंदरीतच जग हे जलद बनले आहे, लोकांना स्पीड हवी आहे आणि या स्पीडला आपण जर पोचू शकलो नाहीत तर मग आपण इतरांच्या सारखेच बनवून जाऊ म्हणजे ?आपण लोकांपेक्षा जास्त चांगले आणि जास्त जलद या दोन गोष्टीवर भर दिला तर आपला हात कोणी धरू शकणार नाही.

लोकांना ही एक्सप्रेस सर्विस हवीये, म्हणजे लोकांना चांगली पण हवीये आणि लोकांना एक्स्प्रेस पण हवी आहे , आणि हा पॉइंट आपण नेहमी कायमस्वरूपी लक्षात ठेवला पाहिजे, कि इथे वेळेला किंमत आली आहे , त्यामुळे आपण एखादी सेवा देण्यामध्ये आज जरी कमी पडत असू तर लक्ष द्या आणि ती सेवा किती जलद करता येईल? यावर काम करा ,जेणेकरून इतरांपेक्षा आपण अतिशय चांगल्या रीतीने स्पर्धा करू शकतो.

********************************

📕Be Cheaper:

मी नेहमी या गोष्टीवर जास्त भर देत नाही ,परंतु याच्या पाठीमागे एक कारण आहे ,लोक किमतीवर सुद्धा आपल्याकडून खरेदी करायची आहे? किंवा नाही? हे ठरवतात आणि हे ठरवण्याच्या पाठीमागे आपला इंग्रजांच्या गुलामगिरीचा इतिहास आहे.

*History* ;दोनशे वर्षे इंग्रजांनी राज्य केलं ,,,त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांना त्यांनी एकतर कामगार म्हणून राबवलं किंवा त्यांचे नोकर म्हणून राबवलं …याचा अर्थ असा की, एकूणच आपल्या पूर्वजांच्या हातामध्ये कधीही मनमोकळा पैसा नव्हता ,आता ही गोष्ट जरी साधी ,सोपी ,सिम्पल वाटत असेल ,तरीही या गोष्टींचा प्रभाव आपल्या मूलभूत संरचनेवर झालेला आहे ,आपल्या जीन्स मध्ये ही गोष्ट उतरलेली आहे, की जमेल तेवढी काटकसर करून आपला संसार भागवावा .

आता एकदा का आपल्याला ही गोष्ट कळली आहे की भारतीय मानसिकतेमध्ये हा प्रकार कुठून आलाय ?तेव्हा हे लक्षात घ्या की लोकांना जर एखादी गोष्ट स्वस्त करून दिली तर लोक आपल्याकडे धावत पळत येतात, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ?त्याच्यासाठी आपले संपर्क वाढवले पाहिजेत /आपण जरा जास्त संशोधक वृत्तीने शोध घेतला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे की आपल्या ग्राहकांना कमीत कमी दरामध्ये आपण एखादी वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देता येईल.

बघा ,आपण व्यवसाय करतो तो पैसा कमावण्यासाठी ,ही गोष्ट सगळ्यांना मान्य आहे, परंतु ग्राहकांना एखादी गोष्ट सोप्पी करून देण्यासाठी किंवा स्वस्त करून देण्यासाठी ,आपण जर विशेष प्रयत्न केले आणि आपल्या स्पर्धकाच्या मानाने ,त्यांना एखादी गोष्ट स्वस्त करून दिली तर ग्राहक आपल्याकडे परत येणार आहे ,,,,, हे ओळखण्यासाठी मागचं कारण आपल्याला माहित आहे…… मग जर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपली किंमत कमी करायला हवी आणि अशी कमी किंमत केल्यामुळे आपला प्रभाव जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, जास्त लोकांना आपली ओळख होते आणि जास्त लोक आपल्याकडून सेवा घेतात.

आज-काल … कस्टमर बेस हा फार मोठा खजिना बनला आहे_ _आपल्याकडे जास्त लोकांचा कस्टमर बेस असेल तर, आपण मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करू शकतो, त्यामुळे प्रयत्न करा आपल्या सेवा आपली वस्तू आपल्या स्पर्धकाच्या मानाने दहा टक्के स्वस्त कशी देता येईल ?एकदा का आपण या पद्धतीने विचार केला तर, आपल्या स्पर्धकांवर आपण कधीही मात करू शकतो.

📌 वरील पॉईंट पैकी किमान दोन पॉईंट आपल्या व्यवसायामध्ये तरी असावेत, जर आपल्याला तीनही पॉईंट स्वीकारता आले तर ती गोष्ट अजून चांगली आहे ,पण या पॉईंटचा आधार घेऊन आपण जर आपल्या स्वतःची पोझिशनिंग मार्केटमध्ये व्यवस्थित केली तर, ग्राहक आपल्याकडे धावत येणारच आहे ,,,,,, तेंव्हाया पॉईंटचा नीट अभ्यास करा ,ते लिहून काढा आणि याच्यावर स्वतः काम करायला लागा ,या तीन पॉईंटवर आपण काम केलं की आपली विक्री 100% वाढणार ,याची खात्री आपण देऊ शकतो.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *