या दहा टेक्नीक लावून स्टीव जॉब्स ने उभी केली “Apple”

Market it like Steve Job

📌 Build Around Customer

📌200 Billion Dollar कॅश रिजर्व असणारी एक कंपनी उभं करणं एवढी सोप्पी गोष्टय का ?

जे शेकडो वर्षांचा इतिहास असणाऱ्या कंपन्यांना जे जमलं नाही ,ते दोन माणसांनी करून दाखवलं,स्टीव जॉब्स आणि स्टीव वोझनियाक !

📌यश मिळवण्यासाठी उभं /आडवा प्रयत्न करून त्याला उभं करणं

हे सूत्र वापरून उभी राहिलेली ही कंपनी आणि त्याच्या values आपण या लेखात बघूया !

📌यातल्या कित्येक गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि काही वेगळ्या अँगलने समोर येतील ,

📌 आज घडीला जगातला सर्वात Valueable brand हा Apple च आहे .

का ? आहे याचं निट नीटकं अनालिसिस करू .

📌 (1) “_Behind Every Fortune there is a Crime_”

होय वरची ओळ गॉडफादर या मारिओ पुझो यांनी लिहिलेल्या जगप्रसिद्ध कादंबरीतील आहे त्यात ते म्हणतात

” सबसे अतिप्रचंड यशाच्या पाठीमागे कुठे ना कुठे तरी एक गुन्हा असतो “…

गुन्हा जरी नसला तरी एखादी छोटीशी का होईना चालबाजी तरी नक्की असते, हा गुन्हा की माझी ताजी न्यूज जॉब्स यांनी नक्कीच गेले होते .

“झेरॉक्स कार्पोरेशन” फोटोकॉपियर मशीन तयार करते हे सर्वांनाच माहिती आहे , पण याची पैरेंन्ट कंपनी असणाऱ्या Haloid ने पहिला पर्सनल कॉम्प्यूटर तयार केला होता ! पण त्यांना त्याची मार्केटींग नीट करता आली नाही ! आणि आज जगाला हे माहिती आहे कि, स्टीव जॉब्ज ने PC जगाला दिला ! गंमत आहे कि नाही ?
यांनी सगळी टेक्नॉलॉजी विकत घेऊन , फक्त मार्केटिंग केली ! जबरदस्त !

(2) Make_it_Very_Very_Simple:

Appleने ज्यावेळी i-pad ,i-phone लाँच केला , त्या वेळी तो उत्कृष्ट तर होताच पण वापरायला सिंपल पण होता, इतका सिंपल कि,चार वर्षांचं लेकरू पण हाताळू शकेल .

स्टीव जॉब्ज त्यांच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून बोलताना नेहमी म्हणायचे, कामाचं innovation करा !पण ते वापरायला इतकं सोप्पं हवं कि बस्सं !

ही सिंपलीसिटी अनेकांना जमत नाही !

ते जमलं पाहिजे ! पण सिंप्लीसिटी ही ताकद असते ! ऊगाचच विनाकामाचं बोजडपण मार्केटिंग साठी त्रासदायक असतंय !

त्यामूळे एक लक्षात घ्या ! *प्रोसेस एकदम सिंपल करा !* मग ती विक्री करण्याची असो >> डिलीवरी देण्याची असो >> आपल्याला संपर्क करायची असो >> नाहीतर पेमेंटची !
यशस्वी होण्यासाठी हे सगळं आवश्यक आहे ! सोप्पं करा !
पण पुढचा डायलॉग स्टीव जॉब्सचाच आहे…

“You will have to work hard to make it Simple”

📌(3) Don’t Sell the Product sell Emotions

बऱ्यावेळा आपण प्रॉडक्टचे बेनिफीट विकायला जातो !
नॉर्मल आहे हे सगळे !

दुसरी गोष्ट अशी कि,साधारणपणे Endorsement साठी सेलिब्रिटीचा वापर के्ला जातो,

पण ते साधारण प्रॉडक्टसाठी,

Apple ,Nike,Reebok ,Land cruiser ,मर्सिडिज यासारख्या कंपन्या ……. कशी ऍड करतात?

ते प्रॉडक्ट फारसा दाखवत नाहीत,
तर तो वापरताना होणारा आनंद, उत्साह ,उल्हास,हास्य,कम्फर्ट याची अॅड करतात.

मार्केटिंग प्रॉडक्टची नाही तर

ग्राहकाला मिळणाऱ्याअनुभवाची करावी

हि ऍपलने सांगितलेली स्ट्रॅटर्जी आहे .

(4) Go beyond your limit/category

ही गोष्ट नीट लक्षात घ्या .
आपल्या एरियात एखादं महागडं सलून असेल, तिथे जाऊन आलेला आपला मित्र ,, कशी बढाई मारेल ?
“आज xxxx सलून मधे हेअर कट करून आलोय”

त्या सलुन ने त्याची ओळख फक्त सलून पुरती मर्यादित ठेवलेली नसते, तर ते एक स्टाईल स्टेटमेंट असतं.

ऍपल एक सॉफ्टवेअर कंपनी आहे , फक्त एक फोन बनवते ! एक फोन !

पण … आज त्याची इमेज कशी आहे?

ग्रेट ग्रेट कंपनी !

का ?

तर त्यांनी स्वतःची पोजिशनिंग तशी केलीये !

📌 (5)Make Exceptionally Good Product and fan following

कधी मायक्रोसॉफ्टने एखादा प्रॉडक्ट लाँच करायचं ठरवलेय आणि ग्राहकांनी दुकानासमोर रांगा लावल्यात असं चित्र बघीतलंय तुम्ही कधी ? नाही ना ?

का ????

बरं इतर कुठल्याही शोरूम्स समोर इतक्या वेडयासारखे उभे असणारे लोक आपण कदाचितच बघितले असतील का ?… नाही !

पण ऍपल स्टोर समोर रांगा असतात,अतीशय ग्रेट प्रॉडक्ट, ग्रेट एक्सपिरियंस,ऍपलने प्रत्येक पावलावर Value addition केलंय … हे तयार केल्याने असं घडलं !

📌प्रामाणिक कस्टमर याच्या पुढची गोष्ट असते … फॅन/भक्त
हे तयार केले पाहिजेत, तेंव्हा मग आपल्याला कोणीही हलवू शकत नाही.

📌 (6) They Can Predict the future:

उद्या जग कोणत्या दिशेने जाणारंय? हे लक्षात येणं फार मोठी गोष्ट आहे

पण हे प्रत्येकालाच जमतंय असं नाही !

बहुतेक उत्कृष्ट R&D मुळे असेल , पण ही कंपनी दरवेळी एक पाऊल पुढे असते,

मोबाईल्समधे जास्तीत जास्त चांगले फिचर्स सगळ्यात अगोदर i_phone मधे येतात आणि मग नंतर इतर फोन्स मधे त्यामुळे त्यांना इतरांबरोबर स्पर्धा करायची गरजच पडत नाही,
आपण सुद्धा असा विचार करायला शिकलो ,तसं वागलो ,तर आपली सुद्धा मार्केटला असणारी स्थिती उत्तम असेल ! हे नक्की !

(7) No_Horizontical_integration:

Google,Microsoft,facebook यांच्या सारख्या कंपन्या स्वतःचा विस्तार वाढवण्यासाठी नवीन स्टार्ट अप्सला भली मोठी किंमत देऊन Acquire करतात,ही गोष्ट चांगली आहे , पण 200 Billion डॉलर ( मुकेश भाईंची 42 Billion आहे ) एवढी अवाढव्य कॅश असणारी ऍपल टेक ओव्हर किंवा मर्जर करत बसत नाही !

जे काय करायचं ते स्वतःचं R&D यामुळे त्यांचा मार्केटवर होल्ड आहे , असं सहजच म्हणता येईल !

(8)No_Excuse_On_Rate:

या बाबतीत अनेकांचे अनेक मतं आहेत , असं मानलं जातं कि,ऍपल स्वतःचे प्रॉडक्टवर प्रचंड मार्जिन कमावतं .

पैसे द्यायला लोक तयार असताना कमी पैसे का घ्या ?:- हा सिद्धांत तुम्हाला कसा वाटतो ?ही सुद्धा या कंपनीची एक मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी आहे.

(9) Vertical_integration_Hold

📌 Mobile उत्पादन ते रिटेल विक्री यावर स्वतःचं कंट्रोल असलं ………तर सगळा माल आपलाच … नाही का?याला vertical integration म्हणायचं,Apple Stores नी हे चांगलच साध्य केलंय ,Earning/Sq foot मधे यांचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे !

याचा अर्थ काय ?

तर दुकानाचा per sq. foot एरिया प्रमाणे किती कमाई होते ?????..
आता म्हणाल .. ही पण काय अभ्यास करायची गोष्ट आहे ?

📌(10) Dont’ share Vital info

बाकी काही असो कि नाही,यांच्या कडुन एक गोष्ट शिकण्यासारखी आहे,ती अशी कि,ही कंपनी आपलं तंत्रज्ञान इतर कोणाबरोबरही शेअर करत नाही.

आपल्या मराठी व्यावसायिकामधे जरा जास्तीचा दिलदारपणा असतो ! जो घातक आहे !जो धंदयात कामाचा नाही ! इथे स्पर्धकाचीच काय ? तर ग्राहकानी पण किती लिमीट गाठायचीये?हे आपण ठरवुन दयायला हवंय, जेने करुन आपले सिक्रेट्स आपलेच राहतील !

हे सगळे भले_बुरे स्टॅन्डर्डस ऍपलने सेट केलेत,याचा आपल्या व्यवसायात पण वापर करता येईल का? ते बघा !

शुभेच्छा
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस
आनंद पार्क,औंध,पुणे
9518950764
Office 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *