या दोनच स्ट्रॅटर्जीवर 90% विक्री होते,तुम्ही वापरताय ना?

1,325 Views

या दोनच स्ट्रॅटर्जीवर 90% विक्री होते,तुम्ही वापरताय ना?

Fear of Loss & Hope to gain

वरिल दोन स्ट्रॅटर्जीज एकत्रीत वापरण्याच्या आहेत आणि समोरासमोर बातचीत करताना वापरल्या जातात .

ज्यावेळी आपण निगोशिऐशन करत असतो,ग्राहक मिळेल किंवा निघून जाईल ही दुविधा मनःस्थिती असते त्यावेळी हे ब्रम्हास्त्र काढलं जातं आणि 100 पैकी 90 वेळी हे काम करून जातं .

अख्खी इन्शुरंस इंडस्ट्री या Fear of loss या थेअरीवरच अवलंबून आहे .

इथे ग्राहकाला हेच पटवून सांगितलं जातं कि , तुम्ही आज आत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेतला नाही आणि उदया काही उच नीच झालं किंवा रेट वाढले,मालाचं शॉर्टेज झालं तरी तुमचं फार मोठ्ठ नुकसान होईल .

किंवा उद्या याच गोष्टीसाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील .

अथवा ही नंबर एक भारी स्कीम तुमच्या हातातून निसटून जाईल आणि त्याचा फायदा होईल जो आजच निर्णय घेतोय .

आता हे तुमच्या लक्षात आलंय ना कि अशी स्ट्रेटर्जी असते तेव्हा आठवा त्या अक्षय कुमारच्या policybazzer ऍडरवरटाईज.

खरं तर fear of loss ही स्ट्रॅटर्जी कामाची आहे पण कधी ???????

तर लिमिटेड वापरली तर !
अगदी अन्नात मिठ वापरतात तशी .
नाहीतर,सगळा पचका होऊ शकतो .

स्वेट स्लीम बेल्टची टी.व्ही वर अँड करणारे अँकर बघीतले का कधी ?त्यांचा शेवटी शेवटी भर फक्त हे म्हणण्यावर असतो कि, “स्टॉक संपत आहे, घाई करा , घाई करा आणि स्टॉक संपला !

आणि परत उद्या त्याच स्पीडने तेवढाच स्टॉक घेऊन येतात.

मग तो fear of loss वापरण्याचा काय फायदा झाला ?

आता

Hope to gain

एक पे एक फ्री !
मोबाईल वर कव्हर फ्री !
स्मार्ट टीव्ही वर स्पीकर फ्री !
आमच्या शोरूम मधून कार घेतली तर इन्शुरन्स फ्री !
पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्याला इतकीच फीस !

हा काय प्रकार आहे ?

या टॅक्टीक्स आहेत, आणि यातुन Hope to gain मांडलं जातं.

मला काहीतरी जास्त मिळेल ही भाबडी आशा समोरच्याच्या डोक्यात टाकणे, यालाच “होप टू गेन”म्हणतात

आख्खी मानवजात उदयाच्या आशेवर जगते, ही “आशा” ! फार मोठ्ठं काम करते

या स्ट्रॅटजीज जितक्या परफेक्ट पणे वापराल तेवढे कनर्वजन जास्त !

पण !

एक बाब सदैव लक्षात ठेवा !

काही लोक या स्ट्रॅटर्जीज वापरताना फारच हावरटपणा करताना दिसतात.

त्यामुळे इन्शुरंस सेक्टर मधील मित्रांनो,आपल्या पीच मध्ये 30% fear of Loss ,30% Hope to gain आणि 40% सामान्य बातचीत पाहिजे

फक्त ,,,,,fear of Loss दाखवला आणि ग्राहकाने ते objection,पार केलं तर मग हातात काहीच रहात नाही.

तुम्ही या दोन स्ट्रेटर्जी वापरता का ?

कशा ते सांगा !

*************************
व्यवसायासंदर्भात ज्ञान देणारे लेख मराठीत वाचण्यासाठी आपल्या वेबसाईटला रोज भेट रहा!
www.nileshkale.com

*************************

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

©निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंदपार्क,औंध,पुणे.
9518950764

तुमच्या व्यवसायात विक्री वाढवण्यासाठी सेल्स कोचिंग हवीये?आजच उद्योगनितीला कॉल करा!
ओमकेश मुंडे सर : 9146101663

Default image
Nilesh Kale
Articles: 83

Leave a Reply