या दोन गोष्टीवर लक्ष ठेवा,धंदयात मंदी येणार नाही, गॅरंटीड !

प्रत्येक व्यावसायिकाने या दोन बाबींवर लक्ष दिले,तर त्याच्या व्यवसायात मंदी येणार नाही ! गॅरंटीड !

© निलेश काळे.

LockDown चे गेली एक दिड वर्ष, हे अनेक व्यावसायिकांसाठी अतिशय कठीण गेले आणि आजही जेव्हा लोक डाऊन सुरू आहे तेव्हा सुद्धा ही परिस्थिती हाताळणं तेवढं सोपं नाही.

हे जे काही सध्या होतंय ना?त्या प्रकाराला जरा आपण समजून घेऊया,

आपण व्यवसायिकांनी कसे तोंड दिले पाहिजे ?आजच आपण अभ्यास करू कि ,ते नेमकं काय असतं ?याच्यामध्ये काय गोष्टी घडतात ?आणि आपण कोणत्या बाजूला उभे राहायला पाहिजे?

मानव इतिहासामध्ये असे अनेक प्रसंग आलेत,अशा अनेक परिस्थिती निर्माण झाल्यात कि तिथे पूर्ण जागतिक व्यवहार एकंदरीत बदललेला आहे.

आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतोय की व्यापार करण्याची पद्धत बदलत चालली आहे,अनेक चांगले चालणारे व्यापार बंद पडू लागलेत, आणि अनेक नवीन व्यवसाय चांगले उत्पन्न घेऊ लागलेले आहेत तर हा जो प्रकार आहे.

या प्रकाराला Paradigm Shift असं म्हंटलं जातं.

📌 गेल्या अनेक लेखांमध्ये मी या गोष्टीचा वारंवार उल्लेख केलेला आहे की आपला व्यवसाय कोणताही असो आपण कस्टमरला ”कॅश ऑन डिलिव्हरी” आणि “होम डिलिव्हरी” या दोन गोष्टी देणे सुरू करायला हवेत याचं कारण असं आहे? की सध्या जी सिस्टिम बदलत आहे त्या बदलांमध्ये या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत.

जे लोक या गोष्टी करणार नाहीत, त्यांचा व्यवसाय आपसूकच बंद पडेल.

Paradigm shift :

ही एक अत्यंत महत्त्वाची मॅनेजमेंट मधील फ्रेज आहे आपण समजावून घेऊया,कि पॅराडाईम शिफ्ट म्हणजे काय असतं? यासाठी एक उदाहरण बघुया

सन 1900 सालापासून घराघरांमध्ये बर्फ वापरणे चालू झाले, या काळामध्ये लोक बर्फाच्छादित भागांमधून शिखरांवर जमलेला बर्फ कापून आणायचे आणि तो आजूबाजूच्या एरियामध्ये विकून टाकायचे.

त्या काळात असं काम करणाऱ्या अनेक कंपन्या वेगवेगळ्या एरियामध्ये, तयार झालेल्या होत्या, या कंपन्या मनुष्यबळाचा वापर करून यशस्वीपणे हा व्यवसाय करत होत्या.

त्यांची हे व्यवसाय करण्याची पद्धत होती आपण याला ICE 1.0 असं आपण म्हणूया

ICE 2.0:

असं हे डोंगरावरचा बर्फ आणुन विकणे हे काम 1900 ते 1930 पर्यंत चाललं, पण 1930 सालात, या इंडस्ट्रीमध्ये एक बदल घडला ,लोक आता आईस फॅक्टरी मध्ये बर्फ तयार करू लागले, आईस फॅक्टरी मध्ये तयार झालेल्या बर्फाच्या लादया लोकांच्या घरोघरी पोहोचवला जायचा आणि मग लोक बर्फाला आपल्या रोजच्या गरजांमध्ये वापरायचे.

या इंडस्ट्रीमध्ये अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या ,ज्या अतिशय यशस्वीपणे मोठ्या प्रमाणावर बर्फ तयार करायच्या आणि त्यात तो बर्फ या घराघरांमध्ये विकायच्या.

ICE 3.0 :

1960 च्या काळामध्ये फ्रिज आले आणि आइस इंडस्ट्रीमध्ये एक नवीन क्रांती झाली,आता लोकांना डोंगरावरून बर्फ काढून आणावा, लागत नसे/आईस फॅक्टरी मधून सुद्धा आईस मागवावे लागत नसे/ तर लोकांच्या घराघरांमध्ये बर्फ तयार होऊ लागला आणि अशाप्रकारे बर्फाची ही इंडस्ट्री विखुरली गेली.

हा *Paradigm shift* होता.

यामध्ये महत्त्वाची बघायची गोष्ट अशी आहे की, जी कंपनी डोंगरावरून बर्फ काढून आणायची, ती कंपनी किंवा त्या कंपन्या पैकी काही लोक 2.2 मध्ये आले नाहीत आणि जे लोक या कंपन्या मोठ्या प्रमाणावर बर्फ तयार करून घराघरात विकायच्या त्यापैकी कोणतीच कंपनी फ्रीजच्या उत्पादनात उतरू शकले नाही.

यांचा काळ तिथेच संपला आणि यांचा व्यवसाय सुद्धा तिथेच संपला.

याचं कारण असं होतं की, हे लोक काळाप्रमाणे बदलू शकले नाहीत,ज्या वेळेला काळ बदलत असतो, त्या वेळेला ज्या कंपन्या बदलू शकल्या नाहीत ,तर त्या बंद पडतात, त्यांचा व्यवसायातलं अस्तित्व संपुष्टात येतं.

*Pivet point* : ज्या पॉइंटला एखाद्या व्यवसायाची इकोसिस्टीम ही पूर्ण बदलत असते त्या पॉइंटला पिवीट असं म्हंटलं जातं.

आता हा पॉईंट वेगवेगळ्या गोष्टीमुळे येऊ शकतो,समाजामध्ये होणारे जी वेगवेगळे बदल असतात त्याला PESTEL Analysis म्हणतात, पामध्ये आपण Political, Economical, Social,Technological, Enviormental, आणि Legal बदल बघू शकतो.

या बदलामुळे अशा गोष्टी घडू शकतात आणि हे सहा बदल जर एखाद्या व्यवसायाने दुर्लक्षित केले तर त्याचा व्यवसाय संपू शकतो.

मध्यंतरी झालेल्या नोटाबंदी मध्ये, भारतामध्ये घडलेल्या एक फार मोठा बदल घडून आला,

ज्यावेळी नोटाबंदी झाली त्या वेळेच्या अगोदर सुद्धा पेटीएम हे ॲप अस्तित्वात होतं, परंतु नोटाबंदीच्या काळामध्ये ज्यावेळेला लोकांच्या हातामध्ये कॅश नव्हती तो काळ याPaytm साठी गोल्डन चान्स ठरला.

त्यानंतर हाच बदल फोन पे/ गुगल पे यासारख्या कंपन्यांसाठी महत्त्वाचा ठरला या कंपन्यांनी हे बदलाचे वारे ओळखले,यांनी स्वतःची सिस्टिम तयार केली आणि लगेचच या सिस्टीम चा फायदा घेतला ,

पण तिकडे जे व्यवसाय फक्त कॅश मध्ये व्यवहार करायचे त्यांचा धंदा मात्र बसला.

याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला बिझनेसच्या इकोसिस्टीम मध्ये असा मोठा बदल होतो त्या वेळेला लोक एकतर फायद्यात राहतात किंवा तोट्यात राहतात.

आता तोट्यात जाणं कोणालाही आवडत नाही म्हणून करता आपण असा विचार केला पाहिजे की, पुढे जर असा एखादा मोठा बदल आपल्या व्यवसायाच्या क्षेत्रात घडणार असेल, तर आपण कसा फायदा घ्यायला पाहिजे?

.तर आपण बघूया नेमकं ज्या वेळेला असा बदल होतो, त्या वेळेला कंपन्यांना काय काय करावं लागतं?

अशा प्रकारच्या कंपन्या चार प्रकारांमध्ये विभागला जाऊ शकतात.

(1) *Product perfect : supply Perfect:*

ज्या वेळेला लोक डाऊन सुरू झालं आणि कोरोनाची साथ पसरायला लागली, त्या वेळेला लोकांना सॅनिटायझर ,हँडवॉश ,साबन, मास्क या गोष्टींचे महत्त्व पटायला लागलं. आणि या परिस्थितीमध्ये ज्या लोकांकडे / कंपन्यांकडे या गोष्टींचे उत्पादन करण्याचं तंत्र विकसित होतं, आणि उत्पादन मार्केटमध्ये पोहोचवण्याची देखील त्यांची व्यवस्था परफेक्ट होती हे लोक अतिशय चांगल्या प्रकाराने या देशांचा परिस्थितीचा फायदा घेऊ शकले.

कारण? ज्या गोष्टींची मागणी अचानक वाढली ते उत्पादन हे अगोदरच तयार करत होते आणि ते उत्पादन मार्केटमध्ये प्रत्येक विक्रेत्याकडे पोहोचवण्याची सिस्टीम तयार करायला हवी होती,ती यांच्याकडे अगदी तयार होती .

म्हणून हीच संधी निर्माण झाली या संधीचा लाभ यांना सगळ्यात अगोदर झाला.

(2) *Product Perfect : supply Needs to change :*

अशा काही इंडस्ट्री असतात, ज्यांचा प्रॉडक्ट परफेक्ट असतो ,परंतु जर असा पॅराडाईम शिफ्ट निर्माण झाला, तर त्यांना सप्लाय करण्याची पद्धत बदलावी लागते.

जसं पूर्वीच्या काळामध्ये करमणुकीसाठी नाटक बघायला एखाद्या थिएटरमध्ये जावं लागायचं, तिथे कलाकार लोक लाइव्ह त्यांची कला सादर करायचे, त्यानंतर पुढे shift निर्माण झाला आणि सिनेमा आले, मार्केटमध्ये प्रसिद्ध झालेल्या या प्रकारामुळे या नाटक बनवणाऱ्या आणि चालवणाऱ्याया कंपन्यांचं अस्तित्व धोक्यात आले .

तेव्हा सिनेमा आले त्या वेळेला लोकांना घरातून निघून त्या सिनेमा हॉल मध्ये जावं लागायचं आणि तिथे थिएटरमध्ये लाईव्ह सिनेमा बघायला मिळायचा, त्यानंतर पुढचा शिफ्ट आला की ,टीव्ही आले आणि लोकांना घरातून बाहेर पडायची गरज राहिली नाही.

लोक आता तोच प्रॉडक्ट,तेच मनोरंजन स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या टीव्हीवर बघू शकत होते,

पुढे एक शिफ्ट निर्माण झाला आणि प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन मोबाइल आणि 4G कनेक्शन आले, आता लोक टीव्हीवर कार्यक्रम बघण्याची ऐवजी OTT प्लॅटफॉर्म, Youtube आणि स्मार्ट फोनचा वापर करून बघू लागले ,म्हणजे ?प्रॉडक्ट तोच राहिला,फक्त त्याची डिलिव्हरी करण्याची पद्धत बदलली आणि ज्या कंपन्या असं करू शकल्या त्या यशस्वी आहेत.

(3) *Product change : supply perfect :*

लोकडाऊन मध्ये अनेक व्यावसायिकांना तसा फटका बसला, त्या फटाक्यांमध्ये कापड उत्पादक कंपन्या पण आल्या त्यांना या गोष्टीचा फार मोठा जबर फटका बसला, परंतु याच्यामध्ये सुद्धा दोन घटक होते I ) काही कंपन्या परिस्थिती चांगली होण्याची वाट बघत बसल्या, त्या नुकसानीत गेल्या आणि ज्या कंपन्यांनी तेच कामगार त्याच शिलाई मशीन आणि सप्लाय चेन वापरून PPE Kit उत्पादन करायला सुरुवात केली त्या कंपन्यांनी खोर्‍याने पैसा कमावला.

याचा अर्थ असा की हा जो शिफ्ट होता, तो शिफ्ट ज्या लोकांनी पटकन ओळखला ,त्यांनी याचा फायदा घेऊ शकले.

आता पुढचा प्रकार बघू

(4) *Product change : supply change :*

रस्त्याच्याकडेला व्यवसाय करणारे भेळवाले वगैरे हे लोक या लोकांच्या कालावधीमध्ये बिलकूल व्यवसाय करू शकले नाहीत, कारण ?लोकांना बाहेर पडायला बंदी होती,

लोकांना सार्वजनिक ठिकाणी बाहेरचं काही खाऊ वाटत नव्हतं, त्यामुळे भेळवाले किंवा फरसाण निर्माते यांचा व्यवसाय पूर्णत ठप्प झाला.

पाणीपुरीवाले यातच आले,यापैकी काही लोकांनी काय केलं ?की पुऱ्या तयार केल्या त्याचे पाकीट बनवलं, चिंचेच पाणी तयार केलं ,त्याचं पाकीट बनवलं आणि हे दोन्ही प्रॉडक्ट त्यांनी किराणा दुकानांमध्ये विकायला ठेवले,

आता भेळवाल्याला किंवा पाणीपुरी वाल्याला स्वतःच्या गाड्यावर विक्री करावी लागायची,त्याला नवीन प्रकारे प्रॉडक्ट डिझाइन करावा लागला, नवीन ग्राहक शोधावा लागला आणि तरीदेखील तो यशस्वी झाला कारण ज्या ठिकाणी त्याला संध्याकाळी फक्त पाच ते दहा वाजेपर्यंत व्यवसाय करावालागू शकत होता ,तो व्यक्ती आता प्रॉडक्ट बदलल्यामुळे आणि ग्राहक बदलल्यामुळे 24 तास ही उत्पादन आणि विक्री करू शकतो.

तर वरील प्रकारावरून आपण समजून घेऊ शकतो की ज्या व्यावसायिकांनी Pivot पॉईंट ओळखला आणि Paradigm शिफ्ट ओळखला, त्या व्यवसायिक त्यांनी फायदा कमावला आणि जे लोक परिस्थिती नॉर्मल होण्याची वाट बघत बसले ते लोक खड्ड्यात गेले.

त्यामुळे मित्रांनो हे लक्षात घ्या की, आपण आपल्या व्यवसायामध्ये Pivot point येतोय का? त्याच्यावर लक्ष ठेवा.

Pivot Point येणार असेल तर, आपल्याला काय बदल करावा लागेल? याच्यासाठी सातत्याने तयारी करत राहा.

त्याला Product Prototype तयार करणे,असे म्हणू शकतो .(म्हणून तर वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या सतत नवीन डिजाईनच्या वाहनावर काम करत असतात)

समजा आज घडीला तुम्ही चांगला नफा कमावत असाल ,तुम्ही या परिस्थितीचा फायदा घेऊन व्यवसाय करत असाल, तरी देखील हे लक्षात ठेवा ! या गोष्टीवर नजर ठेवा, की या परिस्थितीला सुद्धा Pivot पॉईंट येऊ शकतो आणि पुढचा एक असा बदल येऊ शकतो, ज्याच्यामुळे आपल्या व्यवसायाच्या इकोसिस्टीम मध्ये पूर्ण परिवर्तन होईल.

तेव्हा, या दोन गोष्टीवर लक्ष ठेवा, आपल्या व्यवसायामध्ये येणारा pivot पॉईंट आणि Paradigm Shift.

या दोन्हीवर जर आपण लक्ष ठेवलात, त्यावर काम केलात,तर आपण परिस्थितीचे लाभार्थी बनू ! नाहीतर गुलाम !

📌 तेंव्हा,
विचार करा आणि कृती करा |

शुभेच्छा आहेतच !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

www.nileshkale.com

office :
श्री ओमकेश मुंडे सर: 9146101663

Previous Post Next Post

One thought on “या दोन गोष्टीवर लक्ष ठेवा,धंदयात मंदी येणार नाही, गॅरंटीड !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *