या माणसाने कसं बनवलं mi ला नंबर 1?

एखादी कंपनी डायरेक्ट हृदयात उतरावी,असं फार कमी वेळा होतं.

आज आपण अशाच एका कंपनीची , स्टोरी आणि तिच्यातून घेता येणारे धडे पाहू.

मनु जैन
IIT इंजिनीअर , IIM मधून MBA
केलेला पोरगा त्याने भारतातलं मोबाईलचं मार्केट ढवळून टाकलं

1) नौकरी नव्हे START-UP :
IIT मधून इंजीनिअर झालेल्या मुलांना करोडो रुपयांच्या नौकऱ्या लागतात हे आपल्या ला माहितय , पण तसे न करता मनू जैन यांनी मित्रांबरोबर भागीदारीत Jabong.com चालू केली

2) Vision : अमेरिकतल्या गोल्ड रश मध्ये काही लोक नदीपात्रात सोन्याचे कण गोळा करायचे , आणि एक पठ्ठ्या त्यांना टोपली , कुदळ , फावडे विकायचा ,
तो विक्रेता जास्त श्रीमंत झाला , तसं ज्या मोबाईलवर लोक खरेदी करतात त्याचा व्यवसायच केला यांनी .

3) SHIFT : आपल्याला एका व्यवसायात गती आली कि .आपण इकडे तिकडे पहात नाही , मनू जैन यांनी आपला Jabong मधील शेअर विकले आणि चीन मध्ये गेले
तेथे त्यांनी Lei Jun यांची आणि त्यांनी July 2014 मध्ये भारतात mi या ब्रँडची विक्री चालू केली .

आज …….
7 : उत्पादन प्रकल्प
20,000 कर्मचारी
29% मार्केट शेअर
आणि भारताचा नं 1 , मोबाईल ब्रॅण्ड बनलाय . कसं साध्य झालं बरं ????

यांनी ज्या गोष्टी केल्या त्या योग्य दिशेने केल्या .

A) भारत सरकारची पॉलीसी होती make in india,यांनी भारतात मोबाईलची फॅक्टरी चालू करून त्याची संख्या 7 केली,अगदी मोबाईलच्या हार्डवेअर पासून ते .PCBA ( printed circuit Board Assembly ) पर्यंत भारतातच तयार होतात,यांच्या Box वर मोठया थाटात आणि सुंदर अक्षरात Made in India लिहिलेले असते .

B) यांच्या कंपन्यामध्ये 97% कर्मचारी लोकल खेडयातल्या माहिला आहेत,कोणी 5 वी पास,7 वी, 10 वी पास / नापास,Mi ने त्यांना ट्रेनींग देऊन त्यांच्या आयुष्यात उजेड आणला,ग्रामीण भागात जिथे ज्यांना काम नव्हते त्यांना प्रतिष्ठेचे काम दिले .

c) D2C method : Mi चे हेन्डसेट पूर्वी फक्त ऑनलाईन जास्त विकले जात, या मॉडेलला डायरेक्ट टू कस्टमर म्हणलं जातं ( याचा अर्थ कंपनीतून डायरेक्ट ग्राहकाच्या घरी डिलीवरी )त्यामुळे जी डिस्ट्रीब्युशन चैन असते त्याला वाटा दयावा लागत नाही,याला मॅनेजमेंट च्या भाषेत D2C ( Direct to customer) मेथड म्हणतात त्यामुळे किंमत योग्य ठेवता येते, आणि Mi ला हे फारच उत्तम जमलं.

D) Fan Club : या कंपनीचे प्रत्येक शहरात फॅन क्लब आहेत,जे की यांचे मोफत प्रमोशन करतात ,
Harley Davidson,Enfield Bullet,Apple या कंपन्याचे प्रमोशन असेच त्यांचे फॅन करतात .
राजकारणी लोकांचे जसे , कट्टर समर्थक असतात त्याच प्रकारचा हा फंडा आहे डाबर ला 150 वर्षात जे करता आले नाही ते पतंजली ने 10 वर्षात करुन दाखवलं ही ताकद असते फॅन क्लबची .

E) Great Product : मुळात प्रॉडक्टच जर दमदार असेल , तर फार कष्ट घ्यायचे गरज पडत नाही .
mi च्या हॅण्डसेट ला चीन चा ऍपल असे म्हणतात, वाजवी किंमतीत उच्च दर्जाचे उत्पादन आणल्यामुळे यांना जास्त धावपळ करावी लागत नाही .

F) No Extra Expense : आता आता जरी mi ने टी.व्ही ऍडवरटाईजिंग सुर चालू केली असली, तरी त्यांनी कधीच जास्त खर्च ऍड वर केला नाही,या प्रकारच्या प्रमोशनला Lazy Promotion म्हणतात, त्यामुळे त्यांना त्यांचा Revenue वाढवता आला .

.G) COD invention : भारत हा कॅश कॅरीइंग देश आहे,त्यामुळे जेंव्हा Mi च्या असे लक्षात आले की,कार्डने पेमेंट फार कमी होतेय,तेंव्हा त्यांनी Flipkart शी बोलणी करून कॅश ऑन डिलीवरी ची सुरुवात केली होती, म्हणजे?या कंपनीने D2C मॉडेलची सुरुवात केली .

H) Paranoid focus : एखादया कंपनीचे प्रगतीचे लक्षण हे ,कि तिने सातत्याने सुधारणा करत उत्तम उत्पादने आणावीत, आज 2021 मध्ये Mi वेगवेगळ्या क्षेत्रात भन्नाट प्रॉडक्ट आणतेच आहे,यासाठी कंपनीच्या संस्थापकाचा रोल मेन असतो,अॅपलचे स्टीव जॉब्स,टेस्लाचे इलोन मस्क,फेसबुकचे मार्क झुकरबर्ग ,तसेच mi ची टीम सतत R&D सेंटर मध्येझटत असते,या paranoid focus मुळे कंपन्या प्रगती करतात .

I) यांच्यात देखील अनेक त्रुटी कमतरता असू शकतात,पण ही कंपनी त्यावर पण काम करून दोष लवकरच दूर करेल असे वाटते.

मनू जैन जर,कुठेतरी कोपऱ्यात बसून नौकरी करत बसले असते,तर आज भारताला Xiomi सारखा ब्रांड भेटला नसता,
आज मनू जैन हे भारतासहित सार्क देशांचे पूर्ण मार्केट सांभाळतात , आणि सांभाळतात आपले कर्मचारी तसेच ग्राहकाचे हित .

यांच्यापासून शिकूया,प्रगती करू या.

पोस्ट आवडली तर नक्की शेअर करा.

धन्यवाद .

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलट,
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764 .

Office 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *