या साध्या सिंपल 11 टेक्नीक वापरा, प्रॉफीट गॅरंटीने वाढेल

*Profit_वाढवणारी_11_तत्वे*.

*© निलेश काळे* .

सेल्समधून नफा वाढवायचाय ना ? मग शेवटपर्यंत वाचा ! आणि अप्लाय करा !

प्रॉफीट / नफा कोणाला नकोय .
आपण रस्त्यावर उभं रहातो तेच पैशासाठी ( मग ते मॉल चालू करून असो कि एखादा गाडा , शॉप चालू करून असो कि डिलीवरी व्हॅन ) .

तो जो आपल्याकडे येणारा पैसा वाढला नाही तर मग काय उपयोग आहे ?

या एका कारणासाठी लावूया खालच्या काही मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जीज !

(1)GET MORE LEADS:
सोनं कसं मिळवतात माहितेय ?
ते अगदी छोट्या छोट्या कणांमध्ये विभागल्या गेलेलंय आणि मातीत मिसळलेलंय , मातीतून ते सोनं चाळून , पाण्याने धुवुन ,गाळून वेगळं काढावं लागतं .
आणि त्याचं स्टॅण्डर्ड प्रमाण आहे ! दहा टन सोन्याचे कण असणारी माती धुऊन , चाळून गाळून 10 ग्रॅम सोने मिळते .

सेम तत्व व्यवसायात पण आहे ,
एक “खरेदी करणारं” ग्राहक मिळवण्यासाठी , शंभराना बोलावं लागतं .

ज्याला Lead म्हणतात , काहीही करून आपल्या .दुकानात येणारे पावलं ( foot falls ) वाढवायचेत !
पुढचं पुढं बघून घेऊया

*******************************************

(2)LEAD CONVERSION

वर सांगितल्याप्रमाणे आपण foot falls तर वाढवले , पण तेवढंच महत्वाचं नाहिये ,ग्राहक जर पैसे घेऊन दुकानात आला असेल तर त्याने त्यातले काहीना काहीतरी आपल्या इथे खर्च करून जायला पाहिजे का नाही ?बऱ्याच नेते मंडळीचा हा प्रॉब्लेम असतो , कि सभेला तर गर्दी आहे पण मतं का मिळत नाही? , ते conversion नं झाल्यामुळे

म्हणून उगाचच “आले वारे _ गेले वारे ” असं चालणार नाही .
तेंव्हा समजा पहिले “शंभरात एक ” अशी खरेदी व्हायची तर ती ,, “शंभरात दोन ” करणे आपलं काम आहे , हे झालं तरच नफा वाढेल .

*******************************************

(3)Increase Transaction

यशस्वी विक्रेता त्याला म्हणावं , ज्याच्या कडे ग्राहक सतत खरेदीला येतोय . काल आला , आज आला , उदया येणार , आल्यावर स्वतःसाठी घेणार , मुलांसाठी घेणार , मुलांच्या मित्रांसाठी घेणार ,, पण नंतर नंतर फिरून फिरून येणार ,,,, ज्याला आपण रिपीट करणे म्हणतो तसे करणार .

म्हणून जेवढा ग्राहक रिपीट होईल तेवढंच जेंव्हा होईल तेव्हा नफा वाढणारेय .

*********************************************

(4) increase size of Transactions

ग्राहक परत परत तर येतोय , पण थोडे थोडे खरेदी करतोय , कमी पैसे देतोय !तो खरेदी करू तर शकतो , त्याची तेवढी पात्रता तर आहे पण करत नाहीये मग आपलं काम आहे त्याला जास्त खरेदी करायला भाग पाडणं .
जास्त मोठी खरेदी = जास्त मोठा नफा .
सिंपल आहे .
********************************************

(5increase your Margin:

दरवेळी जास्त ग्राहकांना सर्विस देऊन जास्त पैसे कमावणेच योग्य नसते , कधी कधी तसे करुन पण उपयोग होत नाही .
मग ???? , मार्जिन वाढवावे लागते , नफयाचे प्रमाण जास्त घ्यावे लागते , आणि ग्राहकाला नाराज न करता हे करता येतेच कि , एकतर Production cost / Purchase cost कमी करून घ्या….

मोठाले व्यापारी , WallMart सारख्या चेन्स स्वस्तात कसं विकू शकतात ? तर त्याचं कारण हेच आहे कि , त्यांची खरेदी किंमत कमी असते , खरेदीत बचत झाल्यामुळे ते नफा वाढवू शकतात , आपण पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ?

*****************************************
(6) Reduce customer gaining cost

काल परवा उद्योग निती- MBA ग्रुपच्या मेंबरशी बोलणं झालं , त्यांचं म्हणणं,, ” सर यावेळी सगळं खेळतं भांडवलंच हललंय ” .
कारण जाणून घेतलं तर यांनी ग्राहकाचे foot falls ( नवीन ग्राहक ) मिळवण्यासाठी एवढा जास्त खर्च केला कि तो त्यांना झेपला नाही !

मार्केटमध्ये कित्तीतरी स्वस्तातल्या आयडीया आहेत त्या वापरा ना ?

उगाचच एवढा खर्च का करता ?

नवीन ग्राहक मिळवण्यासाठी फ्री मधील टेक्नीक वापरून सुद्धा आपण नफा वाढवू शकतो ,

शेवटी बचत झालेले पैसे सुद्धा Pure profit आहे .

****************************************
(7)increase Refeferrals :

खरं तर ही एक मार्केटिंग टेक्नीक आहे . एका समाधानी ग्राहकाने त्याच्या समाधान झाल्याचा अनुभव दुसऱ्याला सांगून ,,, तू पण समाधान मिळवायचय तर ? तिकडे जा ! अशा निरोपासहित नवीन ग्राहक आपल्याकडे पाठवणे ही पद्धत म्हणजे रेफरल्स !
विश्वास बसणार नाही , पण ही जगातली सर्वात जबरदस्त आणि प्रभावी मार्केटिंग आहे , आणि दुसरी गोष्ट ही फ्री आहे !
फक्त समोरच्या पहिल्या ग्राहकाला अति संतुष्ट करून सोडा , बाकी काम तो आपल्या परस्पर करेल .
भारतात जो निवडणुक प्रचार होतो , ती हीच पद्धत आहे .

*****************************************

(8)Eliminate costly services:

सर्विसेस देणं हे परत परत ग्राहक यावा याचे साठी आवश्यकच आहे , परंतु काही विक्रेते एवढी महागडी सर्विस देत बसतात कि , त्याच्यामुळे इथे इन्कम वर ताण येतो .
जसं हॉटेलवर जेवायला कार घेऊन आलेल्या ग्राहकाच्या कारची काच साफ करून देणे ही नॉर्मल सर्विस आहे , पण त्याची गाडी शाम्पू लावून धुऊन देणे ही कॉस्टली सर्विस आहे .

बघा आपण आपल्या व्यवसायातली कोणती फ्री कॉस्टली सर्विस कमी करू शकता ते ?

***********”**************************”(9) Check Break even_every Time:

Break Even ही अशी एक स्टेज असते जिथे आपल्याला ना नुकसान होते ना तोटा !
पण कित्येक विक्रेते प्रत्येक खरेदी नंतर,प्रत्येक प्रमोशन नंतर , ब्रेक इव्हन आला का नाही हे चेक करायची तसदीच घेत बसत नाही , कसं जमेल ?
जोपर्यंत आपण कागद आणि पेन घेऊन सगळ्या गोष्टींचा हिशेब करणार नाही तोपर्यत कुठे काय चाललय ? याचा आपल्याला ताळमेळच बसणार नाही ना ?
म्हणुन नफा वाढवण्यासाठी हे अत्यावश्यक आहे .

(10) Raise price by 5%- 10%:

सध्या सर्वत्र किंमती वाढलेल्या आहेत,नफा वाढवण्यासाठी हा जालीम ऊपाय आहे त्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि तुमची मार्केटमध्ये इज्जत चांगली असेल ? तर काही बिघडत नाही,5 ते 10 % रेट वाढवून घ्या , फक्त त्याचे कारण तयार ठेवा !
लोकं एवढे आरामशीर देतात !

******************************************

(11) Train Regularly

आपण बघत असाल ? जि.प शिक्षकांना कायम ट्रेनिंगमध्ये पळपळ करावी लागते,आर्मीचे जवान रोज ड्रिल करतात ,कमांडोंना सतत ट्रेनिंग करावी लागते .
कशासाठी ?
ते म्हणजे शार्प रहाण्यासाठी ,
मग आपण आपल्या व्यवसायात अपडेट राहण्यासाठी ट्रेनिंग घेता का ?
पुस्तकांचं वाचन आणि सेमिनार , ट्रेनिंग अटेंड करणं,सध्या च्या सतत बदलाच्या युगात अत्यंत आवश्यक बनलंय ,असं केलं नाही तर आपण जमान्याच्या मागे राहून जाऊ !
या सतत च्या अभ्यासामुळे नफा नक्की वाढतो !

चला वाचा आणि कामाला लागा !

©निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
5th Floor विघ्नहर चेंबर्स
अभिनव चौक, नळस्टॉप,पुणे .
9518950764.

Office: 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *