या 10 प्रॉब्लेम्सवर आधारित बिझनेस चालु करा ,पैसाच कमवाल

खालील 10 प्रॉब्लेम्स वर आधारित व्यवसाय चालू करा ! चांगले पैसे कमवाल.

आज जगासमोर अनेक प्रश्न आहेत ज्यांची त्यांची उकल करणे अजून शिल्लक आहे .त्या प्रश्नांची उकल जर आपण करू शकलो तर ती कोट्यावधी रुपये कमावण्याची आयडिया होऊ शकते .

1) जाडी कमी करण्याची गोळी(Pill ) जगामध्ये सर्वत्र हा प्रॉब्लेम आहे औषध कंपन्या या बाबतीत संशोधने करत आहेत परंतु अजून कोणासही अशा प्रकारची गोळी तयार करण्यात यश नाही आले .
बघा डाएटींग व्यायाय वगैरे अनेक बाबी आहेत पण पोर्टबल , यशस्वी , आणि विनादुष्परिणाम उत्पादने मार्केट मध्ये फारच यशस्वी होतात म्हणून प्रकारामध्ये जर आपण यश मिळवू शकलो तर खरोखरच ती एक बिलीयन डॉलर आयडीया असेल.

2 पाणी :
इथून पुढे जगामध्ये पाणी ही समस्या खूप मोठी होणार आहे ऑस्ट्रेलियातील काही शहरं ही पाण्यावाचून वंचित झाले ,भारतातदेखील यंदा चेन्नईला दुष्काळाचा मोठा सामना करावा लागला ,बघा सर्वांना पाणी हवे आहे आणि इथून पुढे ते कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे ,आपण अशाप्रकारे संशोधन केले कि ज्यामुळे ही मोठी समस्या दूर होईल तर तो उद्योग नक्की यशस्वी होईल .

3) हेअर प्रॉब्लेम :
बघा या जगामध्ये सध्या टक्कल पडणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढत आहे .आणि अजून अशा प्रकारचं औषध तयार झालेले नाही ज्यामुळे लोकांचे केस परत होऊ शकतील यामध्ये आपण संशोधन केलं आणि प्रभावी औषध तयार केलं तर आपल्यासाठी पूर्ण जगभर मार्केट ओपन आहे.
संशोधनात्मक वृत्तीने पूर्णपणे वैज्ञानिक उत्पादने जर आपण करू शकलो तर ही बिलीयन डॉलर इंडस्ट्री आहे .

4) Al :
बघा पुढचा जमाना हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा असणार आहे सर्व उपकरणांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स येणार आहे आपला बॅकग्राऊंड जर इंजिनिअरिंग असेल तर आपण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या गोष्टींमध्ये गोष्टी मध्ये संशोधन करून एक मोठे यश मिळवू शकता

5) Batteries :

सध्या भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे वारे वाहू लागले आहे. जग हे बऱ्यापैकी पेट्रोलियम पदार्थांचा कडून रिन्युएबल एनर्जी कडे जात आहे आणि ही एनर्जी स्टोर करण्याकरता बॅटरी हे उत्पादन मोठ्या प्रमाणात लागणार आहे ,सध्या उपलब्ध असणारे बॅटरी आणि त्याचे तंत्रज्ञान कालांतराने जुने होऊन जाईल अधिक मोठ्या बॅटरीज अधिक मोठं स्टोरेज हे लागणारच आहे जर आपण या क्षेत्रांमध्ये कार्यरत असाल आणि यामध्ये आपण अधिक संशोधन करून नवीन प्रकारच्या उत्तम उत्तम बॅटरी निर्माण करू शकाल त तर यश आपलेच आहे ,प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क याने या क्षेत्रात अनेक उत्पादने तयार केले आहेत आणि त्याने एक नवीन दालन उघडले त्याची कंपनी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे आपल्याकडे उद्योजक सुद्धा नवीन बॅटरीज निर्माण करू शकले तर ही एक बिलियन डॉलर आयडिया होऊ शकते .

6) शेती उत्पादने :
कमी जागेमध्ये जास्तीत जास्त अन्नधान्य उत्पादन करण्याची आयडिया हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन ,कमी पाणी ,कमी जमीन वापरून शेतीची उत्पादने घेणे हा एक उद्याचा बिझनेस आहे , इजराईल थोडया जागेत पिकवतो ना ? मग आपल्याकडे तर एवढे पर्याय उपलब्ध आहेत , कमतरता आहे ती फक्त अजून मोठं संशोधन होण्याची . अशा प्रकारे आपल्याकडील या उद्योजकांना फार मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे

7) Waste Management :

वेस्ट मॅनेजमेंट हा एक नवीन उद्योग उभारणी घेत आहे ,वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज लावून अनेक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असलेली मुले यामध्ये अत्यंत चांगलं काम करू शकतात ,वेस्ट मॅनेजमेंट हा उद्याचा बिझनेस आहे संपूर्ण जगामध्ये वेस्ट ही तयार होत असते परंतु त्याचे मॅनेजमेंट ही फार मोठी समस्या आहे वेस्ट मॅनेजमेंट क्षेत्रांमधील उद्योगांना 100% चांगले दिवस येणार बघा प्रयत्न करा वेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रात काम करता येऊ शकतं.

8) फूड इंडस्ट्री :
जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे माणसं वाढणार त्यांचे तोंड वाढणार तसंच ही इंडस्ट्री नावाचे जिन्नस त्यांना मोठ्या प्रमाणावर वाढणार म्हणून लोक निगडित आहेत त्यांच्या व्यवसायांना फारस मरण नाही

g) शिक्षण :
या क्षेत्रात वरचेवर सुधारणा होत आहेत , नवनवीन संकल्पना लावून online शिक्षण देणारे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होत आहेत मग ते शिक्षण रेग्युलर असो वा व्यावसायिक यात पैसा आहेच .
मेहनत, प्रमोशन , डिलीवरी या सर्व बाबी संभाळल्या तर शिक्षण देणाऱ्या संस्था आणि व्यक्ती या पैसाच कमावणार यात काहीच वाद नाही .
महाराष्ट्रात अनेक कोचींग क्लासेस नी कॉलेजेस , शैक्षणिक संकुले तसेच विद्यापीठं सुद्धा चालू केली त यावरून समजून घ्या , या क्षेत्राचा विकास होतच रहाणार आहे .

10) प्रिझर्वेशन :
सध्या एकूण उत्पादन झालेल्या बाबीपैकी किती तरी टक्के माल वापर होण्याअगोदरच खराब होतो , म्हणजे काय ? तर एवढा पैसा , वेळ , उर्जा फक्त आणि फक्त प्रिझर्वेशन करण्याच्या तंत्रा अभावी नाश पावतो ,
या क्षेत्रात मोठी भरारी घेण्याची आवश्यकता आहे , जो कोणी उद्योजक या क्षेत्रात काम करेल त्याला मंदी दिसणारच नाही

तसं ही लिस्ट काही परिपूर्ण आहे असं म्हणता येणार नाही . पण काही प्रमाणात तरी अंदाज नक्की येईल .

तेंव्हा यातील काही गोष्टींवर नक्कीच काम करता येईल .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क, औंध , पुणे.9518950764.

ओमकेश मुंडे सर : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *