या 5 साध्या सिंपल टिप्स वापरा,विक्रीची स्पीड गॅरंटीने वाढेल .

Sales Speed वाढवा या पाच टिप्स वापरून.

📌आपण आपले प्रॉडक्ट किंवा सर्विसेस विक्री करत असताना, सुरुवातीला स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या ब्रैन्डबद्दल ग्राहकांच्या मनामध्ये ट्रस्ट निर्माण केला पाहिजे, असं झालं नाही, तर नाहीतर विक्री करण्याची स्पीड जी असते, ती मंदावते.

या प्रक्रियेला सेल्स वेलोसिटी असं म्हटलं जातं

📌 आपण स्वतः विचार करा,ज्या कंपनीचा लोगो /नाव/ ब्रँड आपण कधीही बघितला नाही किंवा त्याच्या प्रोडक्टची आपला परिचय नाही, तो प्रॉडक्ट कितीही स्वस्त असला तरी आपण विकत घेऊ का? तर नाही.
मुद्दा असा आहे की मला केवळ एखादा प्रॉडक्ट बद्दल उडत-उडत माहिती जरी असली तरीही ठीक आहे, परंतु अगदीच काहीही माहित नसताना कसल्याही प्रकारचा विश्वास तयार झालेला नसताना मी खरेदी किंवा विक्री करू शकेन अशी अपेक्षा ठेवणे हेच चुकीचं आहे.

📌Constant Update :

सोशल मीडिया वर अनेक जण इतर कोणाचाही विचार न करता किंवा अर्धी कटाक्षाने आणि काळजीपूर्वक सतत जाहिरात करत राहतात यामुळे अनेक लोकांच्या समोर आपली जाहिरात सतत त्याने येत राहते आणि ज्या वेळेला गरज पडते त्या वेळेला लोकांनी आपलं नाव किमान ऐकलेलं तरी असतं अशाप्रकारे थोडासा का होईना विश्वास तयार होतो म्हणून करता एक विक्रेता म्हणून आपलं काम बाकी काहीही नाही तर लोकांचा आपल्यावर विश्वास तयार करणे हेच आहे

सो सोशल मीडियावर किंवा बाहेर आउटडोर ला सातत्याने जाहिरात करून आपण वाचकांचा प्रेक्षकांचा किंवा आपल्याकडे बघणार या लोकांचा विश्वास मिळू शकतो परंतु जर समजा एखादी व्यक्ती ग्राहक म्हणून आपल्या दुकानांमध्ये आपल्या शॉप मध्ये आलेली असेल तर समोरासमोर त्या व्यक्तीचा विश्वास मिळवायचा कसा

📌 विश्वास मिळवण्यासाठी आवश्यक आहे कारण यामुळे आपल्याला विक्री ची स्पीड वाढवता येते आणि आपल्याला ग्राहक मिळविण्यासाठी विशेष खर्च करावा लागत नाही

याकरता पुढील पाच गोष्टी मुख्यत्वाने लक्षात ठेवाव्या

📌 (1)Maintain Eye Contact:

बऱ्याच लोकांना नैसर्गिकत: समोरचा व्यक्ती बोलत असताना इकडे तिकडे बघण्याची सवय असते.

ग्राहक आपल्या समोर बसलेला आहे, तो चौकशी करत आहे आणि आपण त्याची नजर चुकवून, इकडेतिकडे बघत असू ,तर त्या व्यक्तीचा आपल्यावर विश्वास बसणे अतिशय कठीण आहे.

ज्या वेळेला आपण समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर लावून बोलतो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीचा आपल्यावर विश्वास बसायला लागतो.

📌 (2) maintain the level of symmetry:

आपल्याला आपल्या प्रॉडक्ट बद्दल जरा जास्तीची माहिती असते आणि ती ग्राहका जवळ नसते.

म्हणून ग्राहक आणि विक्रेता असा संवाद होत असताना बहुतेक वेळेला विक्रेता जो असतो,तो जास्त स्पीडने आपल्या जवळ असणारी माहिती त्या ग्राहकाच्या समोर ठेवायला लागतो, काही गोष्टी इथे पण चुकतात,आपण जे काही सांगतोय ते ग्राहकाच्या पुर्ण लक्षात येत आहे? किंवा नाही ? याचा विशेष विचार न करता मशीनगन चालवल्यागत माहिती आपण देत राहिलो, तर तो ग्राहक गोंधळून जाईल, म्हणून करता ग्राहकाशी त्याच्या भाषेत बोलायला जाताना त्याच्या स्पीडने बोलायला पाहिजे म्हणजे इथे आपला फायदा होईल.

📌 (3) Tell what they don’t want to hear

एखादा व्यक्ती फटकळ असेल ,तर तो आपल्याला आवडत नाही ,पण दुसऱ्या बाजूने आपण हेदेखील म्हणतो की,ती व्यक्ती सच्चा असेल, कारण? तो काही त्याला वाटेल ती गोष्ट तोंडावर बोलतो.

याचा अर्थ असा की ,आपण ग्राहकाला सुरुवातीसच एखादी अशी गोष्ट सांगून द्यावी, जी कदाचित त्याला आवडणार नाही,मग ती गोष्ट आपल्या व्यवसायाची पॉलिसी असेल किंवा आपली त्या प्रॉडक्टबद्दल असणारी पॉलिसी.

जर आपण ही ग्राहकांना न आवडणारी गोष्ट,अगोदर सांगितली तर आपण त्याच्या नजरेमध्ये एक प्रामाणिक माणूस म्हणून तयार होतो, बाकी काहीही झालं तरी आपला प्रामाणिकपणा आपली विक्री पुढे येणार आहे.

📌 (4)Open things which they don’t consider:

बऱ्याच वेळेला आपण आपला वैयक्तीक असा स्वतःचा स्वार्थ न बघता ग्राहकाची गरज काय आहे? किंवा त्याच्याकडे काय अगोदर काही आहे का?वगैरे बघून त्याला प्रामाणिक सल्ला द्यायला पाहिजे .

समजा आपण कार सेल्समन आहात आणि ग्राहक म्हणाला “त्याला कार घ्यायची आहे” आणि तो कधीतरीच ती कार घराबाहेर काढणार आहे, अशावेळी,अशा वेळी एखादा हुशार सेल्समन त्या ग्राहकाला हे समजावून देईल की “आपण आपली कार कधीतरीच घराच्या बाहेर काढणार असाल ,तर पेट्रोल इंजिन असणारी कार घ्यावी ,कारण डिझेल इंजिन असणारी का रोज वापरावी लागते, आणि जर रोज बाहेर काढली नाही तर ती त्रास देऊ शकते ,पण इथे पेट्रोल इंजिन असणारी कार फारसा त्रास देत नाही,” अशाप्रकारे ग्राहकाने लक्षात न घेतलेली गोष्ट जर आपण त्याच्या लक्षात आणून दिली, तर त्याचा आपल्यावर विश्वास बसायला लागतो.

📌 (5) Admit the Weakness:

हे अनेक लोकांच्या बाबतीत घडतं की ,त्यांना कोणत्या गोष्टींमध्ये कमीपणा घ्यायला आवडत नाही ,परंतु समोरच्या व्यक्तीच्या नजरेमध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण करायचा असेल, तर आपल्याला जी गोष्ट येत नाही,, ती मान्य करण्यात काय कमीपणा? आपल्या ग्राहकांबरोबर घडणाऱ्या व्यवहारा मध्ये असं काही माहित नसेल तर ते खरंखरं सांगण्यात काहीच अडचण नाही.

समजा आपण एखादे किचकट उत्पादन विकत आहात,आपल्याला वरवरची माहिती आहे,ग्राहकाबरोबर जर एखादा टेक्निकल इंजीनीयर वगैरे माणूस आला आणि त्याने आपल्याकडे टेक्निकल गोष्टीची सखोल माहिती मागितली, तर आपण तिथे अडकून जाऊ,,,,,, मग अशा वेळेला उगाचच फंटया मारण्यापेक्षा, मी माझ्या टेक्निकल माणसाला बोलतो,मला इतकी माहिती नाही” असं समोर बोलणं कधीही परवडतं यामुळे त्याचा आपल्यावर विश्वास बसतो…….

ग्राहकाचा आपल्यावर असणारा विश्वास हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे….. बाकी तुम्हाला वेगळं काही करायचंच नाही,त्यामुळे आपलं एक विक्रेता म्हणून काम असा आहे, कि सगळ्यात अगोदर विश्वास तयार करणे, बाकीची विक्री… वगैरे सगळं ऑटोमॅटिक व्हायला लागेल.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663.

Previous Post Next Post

2 thoughts on “या 5 साध्या सिंपल टिप्स वापरा,विक्रीची स्पीड गॅरंटीने वाढेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *