युट्युब व्हिडिओवर आता dislike चं बटण दबत नाही का ? जाणून घ्या !

Youtube ने Dislike बटण का डिसेबल केलंय .

बऱ्याच जणांनी ही गोष्ट पॉईंटआऊट केली असेल ? कि,युट्युबच्या व्हिडिओज वर Like चं बटण तर दबतंय त्याचं काऊंटसुद्धा होतंय पण डिसलाईक होत नाही.

कारण?

याच्या पाठीमागे एक मानसशास्त्रीय कारण आहे,त्याचबरोबर आर्थिक गणित सुद्धा आहे.

Hunan integrity :

आपण एक माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि जगातल्या जास्तीत जास्त देशांत संविधान उघडून बघा,तिथे माणसाने माणसाला कसं वागलं पाहिजे? याच्या बद्दल काही तत्व दिली आहेत.

उगाचच एखाद्या व्यक्तीला जात,धर्म, पंथ, रंग , वर्ण किंवा त्यांची बोलीभाषा याच्यावरून टारगेट केले जाणे कुठेही मान्य होत नाही.

युनायटेड नेशन्सच्या मसुद्यामध्ये सुद्धा आहे असं म्हटलं गेलेल आहे की, विनाकारण कोणाचाही छळवाद करणे हे कायद्याच्या आणि माणुसकीच्या विरोधात आहे.

म्हणून तर आपण पाठीमागे बघितलं असेल की गोरेपणा मिळवून देणाऱ्या एका फेअरनेस-क्रिम ने देखील स्वतःचं नाव बदललं का बदलले

का बदलले ? तर याच्या पाठीमागे आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक दबाव होता,की “तुम्ही गोरेपणाला मोठेपणा मिळवून देत आहात,मग जे लोक काळे सावळे आहेत त्यांनी काय करायचं ? काळ्या किंवा सावळ्या लोकांनी काय घोडे मारलय ? किंवा याचा अर्थ असा आहे का ? की काळे लोक हे वाईट असतात ? तर नाही म्हणून या कंपनीने हे मोठं डिसीजन घेतल . नाव बदललं .

आता Youtube वर काय होत होतं ? हे समजावून घ्या!

अनेक ठिकाणी नवीन Creator लोकांच्या व्हिडिओला केवळ छळ म्हणून किंवा विनाकारण त्रास द्यायचा म्हणून डिसलाइक बटन दाबलं जायचं, नवीन युट्युबवर याचा विपरीत परिणाम होऊ लागला होता, त्याच्यामुळे अनेक लोक हे मिडीयम सोडून जाऊ लागले आणि अशा प्रकारचा विनाकारणचा छळवाद हा यूट्यूबच्या कानावर गेला.

एखाद्या व्यक्तीची विनाकारण छळवणूक होत असेल किंवा जाणीवपूर्वक छळवणूक होत असेल, तर त्याला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून आणि युनायटेड नेशन्सचे नॉर्मल फॉलो करण्यासाठी म्हणून युट्युबने हे डिसलाइक चे बटन बंद केलेले आहे.

अर्थकारण : या यघटने पाठीमागे युट्युबचे स्वतःचे अर्थकारण देखील आहे,जर नवीन युट्युबर केवळ डिसलाइक जास्त येतात म्हणून स्वतःला चैनल बंद करून थंड बसणार असतील, तर याचा परिणाम यूट्यूबच्या व्यवसायावर देखील होत होता.

युट्युबला हे नको आहे .

YouTube चा व्यवसाय जोरात त्याच वेळेला चालेल, ज्या वेळेला जास्तीत जास्त लोक युट्युबवर येऊन व्हिडिओ तयार करून शेअर करतील, जर त्यांचा व्यवसाय कमी होत असेल तर हे यूट्यूबला हे मान्य नाही त्याच्यामुळे देखील YouTube ने हे पाऊल उचलले आहे .

आता मुद्दा असा येतो की जर व्हिडिओ खरोखरच खराब असेल तर काय ? असे असेल तर त्याला डिसलाइक मिळालं पाहिजे .

तर यूट्यूबने अशी व्यवस्था केलेली आहे की,त्यांच्या आतल्या सिस्टीम मध्ये डिसलाइक मोजल्या जातील, प्रेक्षकांना जर हा व्हिडिओ खरोखरच आवडला नसेल, तर त्याच्या डिसलाइकची मोजणी आपल्या आत होईल परंतु बाहेर दिसणार नाही, यामुळे युट्युब त्यांच्या सिस्टिमद्वारे या व्हिडिओची पडताळणी करून त्याच्यावर कारवाई करू शकते,परंतु एक मोठा वर्ग या मीडियमपासून वंचित राहू नये आणि विनाकारण कोणाचा छळवाद होऊ नये !

हे Dislike बटन बंद करण्याचे मुख्य कारण आहे .

© निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस
5th Floor, विघ्नहर चेंबर्स,
अभिनव चौक,नळस्टॉप, पुणे .
9518950764.

Office; 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “युट्युब व्हिडिओवर आता dislike चं बटण दबत नाही का ? जाणून घ्या !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *