युनिलिव्हरने Fair&Lovely चे नाव बदलून Glow&Lovely का केलं?माहितंय?

Unilever ने fair&Lovely चे नाव Glow & Lovely का केलं बरं?

📌 Hindustan Unilever ही भारतातली आणि असं म्हणा कि, जगभरातली सर्वात मोठी FMVG क्षेत्रातली कंपनी आहे.

तिचे वेगवेगळे प्रॉडक्ट खूप प्रसिद्ध आहेत,इतके कि त्यामुळे अख्ख्या समाजाच्या विचारसरणीवर सुद्धा प्रभाव पडू शकतो.

या कंपनीचा एक प्रॉडक्ट आहे तो म्हणजे? Fair & Lovely.

Unilever ने 1975 पासून ही क्रिम भारतात लाँन्च केलेली आहे,विशेष म्हणजे तेंव्हापासून आजपर्यंत अगदी दररोज या क्रिमची जाहिरात होतच आहे,या क्रिमच्या रोजच्या वापरामुळे “चेहरा उजळतो” !असा त्यांचा दावा आहे,.

या एका कारणामुळे या क्रिमचा मार्केट मधला वाटा तब्बल 40% इतका आहे.

मग असं काय झालं? कि,ज्या ब्रॅन्डला गेली 45 वर्ष प्रमोट केलं जातंय त्याचं नाव बदलणं भाग पडलं या कंपनीला.
तर त्याची कारणं जरा सामाजिक आहेत.
बघा,कोणतीही कंपनी जनभावनेच्या आधारावर आपले उत्पादने मार्केटला विकत असते,जर कधी असं झालं, कि,लोक आपल्या उत्पादनाच्या विरोधात झाले,किंवा त्याचे जे फायदे आपण सांगत आहोत,त्याच्या विरोधात झाले,तर मात्र आपल्याला एक उत्पादक म्हणुन त्या प्रॉडक्टच्या पोजिशनिंगचा विचार करावाच लागतो.

तुम्ही कधी फेयर एंड लवली ची,जुनी जाहिरात बघा, त्यात ते नेहमी असा संदेश दयायचे कि,

“आमची क्रिम वापरा मग म्हणजे तुम्ही गोरे व्हाल”

“गोरे झालात तरच यश मिळेल,काळे किंवा सावळे राहीलात तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही”
“तेंव्हा रोज आमची क्रिम वापरा” !

जे महिलांच्या बाबतीत तेच त्यांनी, पुरुषांच्या बाबतीतही करायला चालु केलं,आणि पुरुषांकरिता Fair & Handsome क्रिम आणली .

या मुद्दयाचा प्रभाव पडला आणि क्रिमचा खप वाढला,पण पुढील गोष्टीचा कोणी विचारच केला नाही कि,जे लोक जन्मतःच सावळे आहेत किंवा काळे आहेत त्यांच्या मनावर या गोरं = यशस्वी,
गोरं = चांगलं, काळं = वाईट, या मार्केटिंगचा काय परिणाम होईल?

लोक या गोरेपणाला चांगलं म्हणणाऱ्या कॅम्पेनबद्दल टिका करत होतेच,या कंपन्यांवर “अशी जाहिरातबाजी करू नका”!,”फक्त गोरं म्हणजेच चांगलं” असा प्रचार करू नका” असा दबाव होता,पण होत काही नव्हतं.

पण गेल्या वर्षी अमेरिकेत एका जॉर्ज फ्लॉईड नामक काळ्या माणसाची हत्या झाली, का?तर तो काळा होता, आणि तिथुन “Black lives matter” “काळया लोकांना पण काही महत्व आहे” ही चळवळ सुरू झाली.

त्वचेच्या रंगावरून आम्हाला हिणवू नका,असा सुर उमटायला लागला.

खरं बघायला गेलं तर हे बरोबर होतं.

असे बदलाचे वारे वाहु लागलेत,त्याची आच आपल्या पर्यत पोहचू नये म्हणून सर्वात प्रथम फ्रेंच कंपनी L’oreal. ने ऑफिशीयली असे जाहिर केले कि,इथून पुढे आम्ही आमच्या जाहिरातीत आणि उत्पादनाच्या पॅकिंगवर सुद्धा…. White,Whitening,Fair असे त्वचेच्या रंगावरून वर्णद्वेष करणारे शब्द काढुन टाकत आहोत.

या फ्रेंच कंपनीच्या पाठोपाठ Johnson and Johnson या अमेरिकन कंपनीने देखील असे शब्द असणारे प्रॉडक्ट किंवा जाहिराती बंद केल्या.

या दोन दिग्गज कंपन्यांनी असे बदल केल्यानंतर युनीलिव्हर ने देखील मनाचा मोठेपण दाखवत,आपल्या सर्वात यशस्वी अशा प्रॉडक्टचं नाव बदललं.

हे असं प्रस्थापित झालेल्या ब्रॅन्डच्या नावाला बदलणे सोपं नसतं,पण जी जनता आपले उत्पादनं वापर करणार आहे,तिचाच विरोध असेल तर,बदल करणे स्वाभाविकच आहे.

या एका स्टोरीवरून आपल्याला परत एकदा प्रत्यय आला असेल कि,आपण जनमानसांच्या भावने विरूद्ध जाऊन प्रमोशन करू शकत नाही.

शेवटी ग्राहक हा “राजा” आहे.
त्याच्या विचारांचा “उचित सन्मान” झालाच पाहिजे.

त्याचा सन्मान करा,तुम्ही एक व्यावसायिक म्हणून नेहमी यशस्वी व्हाल.

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

Office : 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “युनिलिव्हरने Fair&Lovely चे नाव बदलून Glow&Lovely का केलं?माहितंय?

  1. धन्यवाद साहेब अत्यंत अचूक आणि प्रभावीपणे तुम्ही माहिती सादर केली उद्योग-व्यवसायातील बारीक गोष्टींवर तुमचं लक्ष असतं आणि म्हणून आमच्यासारखे व्यवसायिक तुम्हाला फॉलो करत असतात खूप खूप धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *