राजकिय मंडळी प्रचारात वापरतात अशी जबरदस्त आणि यशस्वी सेल्स स्ट्रॅटर्जी

Story telling

तुम्हाला सिनेमा बघायला आवडतो? का एखादया विषयावरची डॉक्युमेंटरी? 99% यांचं उत्तर सिनेमा असं देतील.

याचं कारण असं कि, सिनेमामध्ये एखादी स्टोरी असते,प्रेम असतं,घेतलेले कष्ट दाखवतात,तिथे संघर्ष असतो, कोणाचा तरी विजय असतो,यश,अपयश सगळंच असतं.

तर डॉक्युमेंटरी मध्ये फक्त आणि फक्त माहिती दिली गेलेली असते, कोरडया भाषेत, नो इमोशन्स, नो हिरो, नो विलन, त्यामुळे आपल्या मेंदूला ती गोष्ट भावत नाही.

आता आपल्या व्यवसायाच्या मुद्दयाकडे येऊ.

बऱ्याच वेळेला,सेल्स प्रोसेस दरम्यान ग्राहक आपल्याला असा प्रश्न विचारतो की, “मी तुमचा प्रॉडक्ट घेतला तर माझा काय फायदा होऊ शकतो? ”

आता हा प्रश्न समोर आल्यानंतर बरेचसे नवीन सेल्समन,आपल्या जवळ असणाऱ्या उत्पादनांच्या किंवा सर्विसच्या बेनिफिट आणि फीचर्स या दोन गोष्टींचं गाठोडं ग्राहकाच्या समोर उघडून ठेवतात, डॉक्युमेंटरी सारखं.

बघा सगळेजण हेच करतात आणि ग्राहक अशा अनेक सेल्समनसमोर जाऊन आलेला असतो ,,,, तो अशा अनेक दुकानदारासमोर जाऊन आलेला असतो ,जे स्वतःची आरती स्वतः ओवाळून घ्यायला एक्सपर्ट असतात.

आता इथे आपण दुसऱ्या दुकानदार पेक्षा किंवा दुसऱ्या सेल्समनपेक्षा वेगळे दिसण्याचा एक चान्स आपल्याकडे आहे.

बघा काय होतं ?की आपण आपल्या तोंडून आपल्या उत्पादनाचे वैशिष्ट्य सांगत बसणं हे चांगलं पण आहे थोडा वेळ ……… आपण हे असे स्वताच्या तोंडाने स्वतःचं कौतुक करू ,पण परंतु ग्राहक किती वेळे ते ऐकू शकतो? याची पण एक लिमिट आहे, अशावेळी हा प्रकार वापरावा.

📌 ग्राहकाने आपल्याला प्रश्न विचारलाय की तुमचा प्रॉडक्ट किंवा तुमची सर्विस वापरून मला काय फायदा होईल ? “तर आपण आता या ठिकाणी तुमचा असा फायदा होईल” किंवा “तुमचा तसा फायदा होईल हे सांगत बसायच नाही”

अशावेळी आपण ह्या चर्चेला एका तिसऱ्या दिशेने घेऊन जाऊ शकतो,,

तर काय कराल? तर स्टोरी सांगा !

हा प्रॉडक्ट कसा डेवलप केला?कुठुन आणला? कित्ती बारकाई करून आणला? आपल्या प्रॉडक्ट वापरून एखाद्या जुन्या ग्राहकांचा काय फायदा झालेला आहे ????हे आपण विस्तारपूर्वक सांगायचं ,,,,त्या ग्राहकाला झालेला फायदा आपण आपल्या व शब्दांमध्ये वर्णन केला की,आपल्या समोर बसलेला प्रोस्पेक्ट स्वतःला त्या स्टोरीमध्ये हिरोच्या जागी ठेवायला जातो आणि तो असं समजून घ्यायला लागतो किंवा मला देखील असाच फायदा होऊ शकतो.

याठिकाणी जर ती स्टोरी आपल्या गावात घडलेली असेल किंवा जवळपास कुठेतरी असेल? आणि ती त्या प्रोस्पेक्टला लगेचच पहायला मिळू शकते,,,,

म्हणजे “इकडे सूर्य आणि तिकडे जयद्रथ” अशाप्रकारे आपण आपला स्वतःचा पॉईंट येथे सिद्ध करू शकतो.

आणि अशाप्रकारे आपला उत्पादन किंवा आपले प्रॉडक्ट वापरून इतरांना झालेले फायदे ग्राहकांच्या समोर व्यवस्थित मांडू शकतो, ही टेक्निक अनेक जण वापरतात.

टी.व्ही वर येणाऱ्या ऍड बघा,90% ऍड या स्टोरी स्वरूपातच असतात.

आपल्या आजूबाजूला देखील असे अनेक जण असतील …… जे ही टेक्निक वापरून जास्तीत जास्त विक्री घडवायचा प्रयत्न करत असतील, तर समजून घ्या सिद्ध झालेला प्रकार आहे.

त्यामुळे इथून पुढे ग्राहकांच्या समोर स्टोरी मांडा ,त्या स्टोरीज प्रॉस्पेक्ट्सना आवडतात आणि यामुळे आपली विक्री 100% वाढू शकते.

मी “xxxx करत होतो,त्यामुळे मला गरिबी माहित आहे, वगैरे सांगुन नेते पब्लिकची मते मिळवू शकत असतील , तर आपण ग्राहक का मिळवू शकणार नाही?

तेंव्हा स्टोरीटेलींग शिका ! यशस्वी व्हाल !

Use It

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क, औंध,पुणे .
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *