वकिलीचं शिक्षण, चपराशाची नौकरी ते प्रसिद्ध ब्रान्डचे मालक, इंडीयाचे फेवीकॉल मॅनचा प्रवास .

#Fevicolman

आयुष्यात स्वतःला दोष देत जगणारी माणसं आपण बघितली असतील,पण नशीबाला दोष न देता स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर पुढे जाता येतंच कि,
अशीच आहे ही स्टोरी.

भारताचे Fevicol man बलवंत पारेख यांची,ज्यांनी एक काळ चपराशाची नौकरी केली अन् तिथुन पुढे बनवला असा प्रॉडक्ट ज्यांनी त्यांना भारतातला 48 वा श्रीमंत व्यक्ती बनवलं.

आज Fevicol,m-seal,Feviquik,Dr.Fixit हे ब्रान्ड माहित नाही असा माणूस भारतात शोधून पण सापडणार नाही,कारण? हे प्रॉडक्ट भारतीय समाजाच्या रोजच्या आयुष्याला “चिटकलेले” आहेत.

बलवंत पारेख यांनी भारतीयांना बाभळीचा डिंकापासून Synthetic odhesive कडे नेण्याचं काम केलंय .

खरंतर गुजरातच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या माणसाने वकिल व्हावं अशी कुटुंबियांची इच्छा, घरच्यांनी प्रेशर केलं म्हणून भावनगर हुन मुंबईला शिक्षणासाठी आले .

घरात आजोबा वकिल इतर कुणीही धंद्यात नव्हतंच परत फॅमिली बॅकअप पण नव्हतं,म्हणुन त्यांनी गपचुप बसुन Law केलं,डिग्री घेतली,

पण त्या काळातली मुले ही इंग्रजांच्या विरुद्ध सत्याग्रहात उतरली होती,आपण कुठं वकिली करत बसायची ? म्हणून अगदी कवळ्या वयात हे देखील त्यात सहभागी झाले.

वकिली आवडत नव्हती,पण पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर करता काय ? लग्न पण झालं होतं,पैसा पण पाहिज होता तर करता काय ? मग धरली नौकरी…. majority उद्योजकांनी आपल्या कामाची सुरुवात कुठेतरी नोकरी करण्यापासूनच केलीये .

मग,पहिल्यांदा डाईंग आणि प्रिटिंग प्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली आणि नंतर एका टिंबर मर्चंटकडे चपराश्याची नौकरी धरली.

या दरम्यान कांताबेन अन् बलवंतजी आपल्या मित्राच्या वेअरहाऊस मध्ये राहायचे,,,पण या नौकरीतुन काही फारसं मोठं साध्य होत नव्हतं,

पण खरा उद्योजक तोच जो,प्रत्येक स्थितीतून स्वतःसाठी काहीतरी चांगलं शोधुन काढतो, बलवंतजीनीं तिथेच नवीन कॉन्टॅक्ट डेवलप करायला सुरुवात केली,ओळखी वाढवायला सुरुवात केली.

साधी आयडिया त्यांनी वापरली : import आणि Export करणाऱ्या व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट ज्याला हवे त्याला द्यायला सुरुवात केली,अन् या “फ्री” च्या कामातूनच, त्यांना जर्मनीला जायचा चान्स मिळाला, परदेशात जाऊन नवीन टेक्नीक शिकायला मिळाल्या.

PIDILITE इंडस्ट्री स्थापन होण्यात याच विजिटचा मोठा वाटा आहे.

1954 दरम्यान लाकडाचे फर्निचर बनवण्यासाठी वापरला जाणारा इंडस्ट्रीयल ग्लू बिल्कुल अनब्रान्डेंड होता,

1959 साली पारेख डायकेम बरोबर काम करताना, पारेखजींनी याच सिंथेटिक ग्लु मध्ये सुधारणा करून, चांगली ब्रान्डींग करून याला मार्केटमध्ये आणलं आणि इथे जन्म झाला “Fevicol” चा !

अगदी वेळेवर, दुर्लक्षित अशा कमोडिटीला मार्केटला आणण्यामुळे एका अशा पर्वाची सुरुवात झाली,ज्याला अजुनही कोणी हलवु शकलं नाहीये.

त्यानंतर हळू हळू m-seal, Feviquik,Dr.fixit असे अत्यंत यशस्वी प्रॉडक्ट पिडिलाइट ने आणले.

1976 पासुन Fevicol च्या जाहिराती टिव्हीवर यायला लागल्या, 90 च्या दशकात तर या विनोदी जाहिरातींनी रेकॉर्ड केलं होतं .

Fevicol संदर्भात अजुन एक गोष्ट, यांनी प्रत्येक पॅकेजिंग वैशिष्ट्यपुर्ण केली, फेवीकॉलच्या प्रत्येक पॅकेजिंगचं डिजाईन सुद्धा रजिस्टर्डच असतं.

2011 च्या फोर्ब्सच्या यादीनुसार बलवंत पारेख हे भारतातील 45 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले अन् वयाच्या 88 वर्षी 2013 साली श्री बलवंत पारेख यांचं निधन झालं .

एका माणसाच्या व्हिजनमुळे आजही Fevicol आणि PIDILITE industry ची मोनोपली कोणतीच कंपनी मोडू शकलेली नाही.

© निलेश काळे.
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट
5th Floor, विघ्नहर चेंबर्स,
अभिनव चौक,नळस्टॉप,पुणे .
9518950764.

Office: 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *